Tuesday, July 24, 2012

तिबेटची वेदना कुणाला कळणार?


तिबेटी संस्कृती वाचविण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. पण त्यासाठी चीनबरोबरचे व्यापारी संबंध तोडण्याची अमेरिकेची तयारी नाही. नाईलाज झाला म्हणूनच बराक ओबामा यांनी दलाई लामांची भेट घेतली. कुलदीप नय्यर विचार णखी एका तिबेटी भिक्षूने ल्हासा येथे स्वत:ला जाळून घेतले. अशातर्‍हेने किती माणसं मेली याची मोजदाद करणेही लोकांनी सोडून दिले आहे. पण तिबेटमध्ये दरदिवशी तीव्र संताप व्यक्त होत असतो. चीनच्या कम्युनिस्ट संस्कृतीला तिबेटचे भिक्षू या पद्धतीने विरोध दर्शवीत आले आहेत. पण तरीही बीजिंग मात्र थंड डोक्याने आपली जीवनपद्धती तिबेटवर लादत आहे आणि त्याही परिस्थितीत तेथील जनता बौद्ध धर्माला घट्टपणे चिकटून आहे. आत्मदहन हा बौद्ध धर्मात उच्च दर्जाचा त्याग समजला जातो. तिबेटींच्या धर्मगुरू दलाई लामा यांनी आत्मदहनापासून दूर रहा असा सल्ला भिक्षूंना दिला आहे. 'त्यांच्या यातना आपण समजू शकतो आणि त्यांच्यावर याबाबत टीका करताना आपल्या मनात अपराधीपणाची भावना आहे' असे मत दलाई लामांनी एका वृत्तपत्रीय मुलाखतीत व्यक्त केले आहे. 'पण आपण अशी टीका केली नाही तर तिबेटचे अनेक भिक्षू याच मार्गाचे अनुसरण करतील' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सारे जग मात्र थंडपणे या सर्व घडामोडींकडे बघत आहे. कुणी आवाज उठविला तर दडपशाहीने आवाज बंद पाडण्यात येत आहे. महान तिबेटींना धार्मिक स्वातंत्र्य व मानवी हक्क प्रदान करण्यात येत नाही या कारणास्तव चीनवर बहिष्कार टाकण्याचा विचारही कुणी करीत नाही. कारण चीनमधील सत्ताधारी सर्वशक्तिमान आहेत आणि चीन हे श्रीमंत राष्ट्र आहे. पाश्‍चात्य राष्ट्रांनी दलाई लामांना आपल्या प्रदेशात प्रवेश करण्यास बंदी केली आहे. कारण चीनकडून त्यांना स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे. तिबेटींच्या प्रश्नाला पाठिंबा देण्याची भारतालाही भीती वाटते. तिबेटमधील भारताचे वाणिज्य केंद्र सुरू करण्याची भारताची मागणी चीनने धुडकावून लावली तरी भारताने त्याचा साधा निषेधही नोंदवला नाही.
तिबेटी जनतेसाठी भारत बरेच काही करू शकतो असे मत दलाई लामांनी व्यक्त केले आहे. पण भारताने मात्र तिबेटपासून दूर राहणेच पसंत केले आहे. तरीही तिबेटने आपली लढाई सुरूच ठेवली आहे. तिबेटपासून अमेरिकेतील कोलोराडो येथे असलेला कॅम्प हेल हा भाग खूप दूर आहे. पण तरीही हे दोन प्रदेश एकमेकांशी वेगळ्या कारणाने जोडले गेले आहेत. तिबेटचे २000 योद्धे हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संघर्ष करण्यासाठी तेथे गनिमी युद्धाचे शिक्षण घेत आहेत. या योद्धय़ांना तिबेटमध्ये फार प्रगती करता आली नाही. पण त्यांनी चीनच्या लष्कराच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दुर्दैवाने तिबेटच्या स्वातंत्र्य लढय़ामागे भारताचा हात आहे अशी चीनची भावना आहे. 'तिबेट हा काश्मीरप्रमाणेच आमचा प्रमुख प्रश्न आहे' असे मत परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी व्यक्त केल्याने चीनचा संशय बळावला आहे.
भारताने तिबेटवर चीनचे प्रभुत्व मान्य केल्याबद्दल तिबेटींच्या मनात भारताविषयी संतापाची भावना आहे. भारताने याबाबत तिबेटी जनतेचे मत विचारातच घेतले नाही अशी त्यांची तक्रार आहे. चीनने तिबेटमध्ये दडपशाही सुरू केल्यामुळे दलाई लामांनी १९५४ साली भारतात आश्रय घेतला. तिबेटबाबत भारताकडून ठाम भूमिका घेतली जात नाही, अशी दलाई लामांचीही भावना आहे. चीनचे तिबेटवर अधिराज्य असणे हे काही तिबेटचे स्वातंत्र्य नाही. ते सरकारचे राजकीय नियंत्रण आहे आणि तिबेट हा चीनवर अवलंबून असलेला प्रदेश आहे असे म्हणता येईल. दिल्लीने तिबेटचे अधिपत्य चीनकडे सोपवले पण सार्वभौमत्व सोपवलेले नाही. पण चीनशी चांगले संबंध ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नात दलाई लामांना मात्र संकटे झेलावी लागत आहे. नुकतीच त्यांनी वयाची ७७ वर्षे पूर्ण केली. त्यांना त्यांच्या समाजासह हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे राहणे भाग पडले आहे.
तेथील लोकांनी भारताच्या परवानगीशिवाय बाह्य जगताशी संबंध ठेवू नयेत अशी त्यांना ताकीद देण्यात आली आहे. दलाई लामांच्या हालचालींवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यांना वक्तव्ये देताना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेही ते फार कमी बोलतात. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना ते म्हणाले, 'तिबेटला स्वायत्तता मिळणे हाच त्यांच्या प्रश्नावरील यथार्थ तोडगा आहे.' काही काळापूर्वी त्यांनी हा पर्याय चीनपुढे ठेवला होता. पण चीनने तो धुडकावून लावला.
१९६२ साली भारत-चीन यांच्या दरम्यान युद्ध झाले तेव्हा पं. नेहरूंनी तिबेटबद्दल अवाक्षरही उच्चारले नाही. तिबेटमध्ये जी वंशविच्छेदाची कारवाई सुरू होते त्याकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधण्याचे कामही पं. नेहरूंनी केले नाही. भारताच्या भूमिकेविषयी दलाई लामांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. तिबेटमध्ये चिनी लोकांना वास्तव्य करण्य तिबेटी संस्कृती वाचविण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. पण त्यासाठी चीनबरोबरचे व्यापारी संबंध तोडण्याची अमेरिकेची तयारी नाही. नाईलाज झाला म्हणूनच बराक ओबामा यांनी दलाई लामांची भेट घेतली.
                          लेखक : कुलदीप नायर   

No comments:

Post a Comment