Friday, September 21, 2012

अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात ....



भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील मुख्य चेहरे असलेले अण्णा हजारे व अरविन्द केजरीवाल यांच्यात शेवटी फुट पडली. ही उभी फुट पडायला हवी होती की नाही हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. वास्तविक अण्णा हजारे यांनीच पर्यायी राजकीय व्यवस्था देण्याचे जंतरमंतर वरुण घोषित केले होते. राजकीय दबाव गट निर्माण करण्याची आवश्यकता तेव्हा अण्णा हजारे यांना वाटली असावी.
कदाचित अण्णाच्या या घोषनेला अनुसरूनच केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपली राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याची भूमिका बदलत आपला नव्या राजकीय पक्षाच्या निर्मितीला आपला पाठींबा असणार नाही व होऊ घातलेल्या पक्षाने आपला फोटो व नाव वापरू नये असे घोषित केले व त्यानंतर त्यांनी लगेच बाबा रामदेव यांची भेट घेत भ्रष्टाचाराची चळवळ सयुंक्तपणे चालविण्याचे सुतोवाच केले. इथेच मोठा गोंधळ, कूटनीती व मोठी साजिश दडलेली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेले ते षडयंत्र आहे.
जनलोकपाल बिलाला कांग्रेस व भाजपा या दोन्हीही राजकीय पक्षाचा विरोध आहे. हे दोन्ही पक्ष कधीही जनलोकपाल येऊ देणार नाहीत कारण दोन्ही पक्षात भ्रष्टाचाराला जन्म देणारे लालची नेते आहेत. जनलोकपाल बिलाला विरोध करना-या कांग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाच्या विरोधात जनतेला राजकीय पर्याय उपलबध्द करून  देण्याचे अरविन्द केजरीवाल यांना वाटले सावे. परंतु अण्णा समर्थित राजकीय पक्षाचा उदय म्हणजे भाजपाचे मृत्युपत्रच होते त्यामुळे मधल्या काळात भारतीय जनता पक्षाला सत्तेवर बसवू पाहना-या राष्ट्रीय स्वंसेवक संघ, भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील भाजपाधार्जिणे कार्यकर्ते /नेते यांना अण्णा टिमने घोषित केलेला राजकीय अजेंडा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर बसविण्यात अडचणीचा वाटत होता. त्यामुळे जलदगतीने हालचाली करून अण्णा हजारे व भाजपाधार्जिण्या किरण बेदी यांचे मन वळविण्यात येऊन अरविन्द केजरीवाल यांच्या विरोधात भूमिका घेण्यास अण्णा हजारेस भाग पाडले असे एकंदरीत घडामोडीवरून दृष्टीस पडते. संघाला कधीही भ्रष्टाचार विरोधी चळवळीसी देणेघेणे नाही त्यांना केवळ भाजपीय सत्तेच्या मार्फत हिंदू राष्ट्रवादाचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे रेटायचा आहे.
कणखरपणा दाखविणा-या अरविन्द केजरीवाल सारखा खंबीर कार्यकर्ता अण्णा हजारे ने सोडून देणे  हे अण्णासाठी जमेची बाजू नसून तोटाच आहे. कारण केजरीवाल व प्रशांत भूषण वगळता बाकी अण्णा टीम उदा. संतोष हेगडे, अविनाश धर्माधिकारी, विश्वन्भर चौधरी व नरेंद्र दाभोळकर इत्यादी सरकारच्या द्बकाव्याला भिणारी व शरण जाणारी आहे.  ते सरकार व राजकीय नेत्यांना टक्कर देण्याइतके सक्षम नाहीत व महाराष्ट्र वगळता अन्नाच्या पाठीशी कोण आहेत हेही स्पष्ट नाही. एक दंडा पाठीवर पडला तर घराच्या बाहेर न निघणा-या कार्यकर्त्याकडून हजारेची चळवळ कशी काय चालेल?. हा एक प्रश्नच आहे.?. कदाचित अण्णा हजारेच्या चळवळीचे थडग्यात रूपांतर व्हायला आता वेळ लागणार नाही. अण्णा हजारे केवळ प्रामाणिक, इमानदार व स्वच्छ चारीत्राचे आहेत परंतु ते  स्वत: व्हयूनीतिकार, रणनीतीकार व विद्वान नाहीत त्यामुळे  अन्नाची चळवळ आता राष्ट्रीय स्वंसेवक संघ व रामदेव बाबाच्या मार्फत चालून त्याची परिणीती भाजपाला सत्तेत बसविण्यात होईल..  एकंदरीत अण्णा हजारेच्या चळवळीची विश्वाहर्ताच पूर्णता धुळमूल होईल असे दिसते. भ्रष्टाचार विरोधी चळवळ की जिच्याकडे लोकांनी आशेने बघणे सुरु केले होते तिचा असा अंत होईल..................असे कोणालाही वाटले नसेल.

                                          बापू राऊत
                                          9224343464

No comments:

Post a Comment