Sunday, October 28, 2012

सत्यनारायण पूजा ही भट-ब्राम्हणाची रोजगार हमी योजना


देशात सत्यनारायणाच्या पूजेचे स्तोम सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे व बहुजनांच्या घरोघरी पसरलेले दिसते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सत्यनारायनाचे  लोन सगळीकडे पसरले असून त्याची झळ मात्र गरिबांनाच जास्त बसत आहे. सत्यनारायणाच्या या पूजेत गरीब पूर्णपणे पोळून निघत आहे तरीही तो भीतीपोटी कर्ज काढून घरी पूजा घालतो. तर माध्यम वर्ग प्रतिष्ठेच साधन म्हणून सत्यनारायणाच्या पुजेकडे पहात असतो.
स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणारी ही माणसे गाजावाजा करीत मोठ्या दिमाखात ब्राम्हणाला घरी बोलावून पूजा घालतात व ब्राम्हणाला दानात भरपूर खतपाणी देत असतात. हा बहुतेकांच्या घरी दरवर्षी होणारा उपक्रम आहे. या उपक्रमाला सर्व जाती व धर्माचे लोक बळी पडत आहेत. सत्यनारायणाच्या नावाने ब्राह्मणावर करोडोची उधळपट्टी भारतीय समाज करताना दिसतो.
सत्यनारायण व यज्ञ संस्कृतीला तेवत ठेवण्याचे काम तथाकथित हिंदुत्ववादी व व्यावसायिक प्रसारमाध्यमे बिनादिक्कत करीत आहेत. आजची प्रसार माध्यमे ही भट-ब्राम्हणाला रोजगार मिळवून देण्याची साधने  झाली आहेत. टीव्हीवर धार्मिक प्रवचने व फलज्योतीष्य दाखवून भारतीय समाजाला वैदिकांच्या आर्या संस्कृतीचे वेठबिगार बनविण्याची चढाओढ या प्रसारमाध्यमामध्ये लागलेली दिसते. ग्रहांना शांत करण्यासाठी ब्राम्हणांना दान दिले पाहिजे, घरशांती साठी ब्राम्हणाला बोलावून पूजा घातली पाहिजे असे सर्रास व बिनदिक्कतपणे रोज सगळ्या चॅनेल्स वरती सांगण्यात येते. सत्यसाईबाबा, मुरारीबापू, अमृतामयी माता, आसाराम बापू व नरेंद्र महाराज सारखी साधू-साध्वीच्या पाया पडणारे व केवळ मताचे राजकारण करणारे तथाकथित राजकीय पुढारी व प्रसिध्दी माध्यमांना सोबत घेऊन उठसुठ तिरुपतीला व इतर देवांच्या पुजेला जाना-या अमिताभ बच्चन सारखे स्वार्थी अभिनेते अशा प्रकारांना अधिकच जबाबदार असतात. भारतीय बहुजन समाजाची मानसिकता ही अनुकरणीय आहे. मोठ्या लोकांच्या अभिभावाचे तो  आंधळेपणाने अनुकरण करीत असतो. म्हणूनच सत्यनारायण व देवपूजा सारख्या वाढत चाललेल्या प्रकारांना वरील प्रकारची माणसे अधिक जबाबदार आहेत असे खेदाने म्हणावे लागते.
सत्यनारायणाच्या पूजेच्या इतिहासावर नजर टाकली असता पेशवाईच्या अगोदर सत्यनारायणाच्या पूजा होत असल्याचे कोठेही नमूद नाही. परंतु पेशवाई लयास गेल्यानंतरच ब्राम्हणाच्या पोटापाण्यासाठी ही  प्रथा सुरु करण्यात आली. या सत्यनारायणाच्या पूजेत असते तरी काय?. त्यात एक कथा सांगितली जाते. त्या कथेत एक ब्राम्हण अतिशय दरिद्री अवस्थेत राहत होता. खायला अन्न मिळत नसल्याने तो  दारोदारी भिक्षेसाठी भटकत असे. त्याची दुर्दश पाहून देवाला दया आली व त्याने सुख समृद्धीसाठी सत्यनारायणाची पूजा करावयास लावली. पूजा केल्यानंतर मग तो ब्राम्हण सुखी व समृध्द झाला अशी ती  कथा आहे. ही कथा लिहून जनमानसाना सांगणा-या पेशवेकालीन भटाने आपल्या बेरोजगार जातीच्या सुखसमृद्धीचा विचार केला.
हे भटब्राम्हन एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नवनवीन कथा रचून बहुजन समाजात प्रसारित केल्या त्यापैकी, एक उल्कामुख नावाचा राजा होता. त्याच्या राणीचे नाव भद्रशीला, ती तरुण व रुपवती होती. तिच्याजवळ एक साधू आला व म्हणाला कोणतीही इच्छा असल्यास सत्यनारायणाची पूजा घाल, इच्छा पूर्ण होईल. तिने व्रत केले. सत्यनारायणाच्या कृपेने तिला अपत्य झाले, परंतु पुढे सत्यानारायनाचे व्रत व पूजा करणे ती विसरली व तिचे वाईट झाले. ह्या कथा बहुजन समाजाला भीती दाखविण्यासाठी निर्माण करण्यात आल्या. घरी पूजा घातली नाही तर तुमचे हाल कथेतील लोकांप्रमाणे होतील. असी त्यातून सरळ सरळ बहुजन समाजाला भटांनी दिलेली धमकीच आहे. ब्राम्हणांच्या अशा धमक्यातूनच व बहुजनांच्या भीतीतून ब्राम्हणांची न संपणारी रोजगार हमी योजना सुरु झाली.
आजकाल तर काही लोक सत्यनारायणाची निनावी पत्रके छापतात. ही पत्रके वाचून याच्या दोन हजार पत्रिका काढून वाटा, न वाटल्यास आपले बरेवाईट होऊ शकते. आपल्या घरातील व्यक्ती मरू शकते व घरात नेहमीसाठी अशांती राहील असा मजकूर त्यात असतो. पत्रके नाही वाटली तर आपले काही तरी होईल या भीतीनेच मानसिक संतुलन बिघडते व तो पत्रके छापून दुस-यांना पाठवीत असतो. अशा पत्रकाच्या माध्यमातून देवांचा व त्याच्या काल्पनिक दहशतीचा प्रसार व प्रचार सदैव होत राहावा ही अशा पत्रकामागची भूमिका असते. परंतु अशा षडयंत्रानाच बहुजन समाज पूर्णपणे बळी पडत असतो.
26 जानेवारी 1950 पासून मनुवादी धार्मिक आचारसहीता बेकायदा ठरऊन घटनेद्वारा देशाचा राज्यकारबार चालविण्यास सुरुवात झाली. परंतु या 26 जानेवारीलाही ब्राम्हणांनी कॅश करून आपले खिसे भरण्याचे साधन बनविले आहे. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिवशी सत्यनारायणाच्या पूजा सार्वजनिक ठिकाणी व रहिवाशी सोसायटया मध्ये घातल्या जातात. सत्यनारायनामुळे हा देश प्रजासत्ताक व स्वतंत्र झाला असे या देशातील धर्मवाद्याना सुचवायचे व रुजवायचे तर नाही ना?. कारण या देशातील धर्मवाद्यांनी खोट्या गोष्टी वारंवार सांगितल्या व कालांतराने बहुजन समाजाने त्या खोट्या गोष्टी सत्य म्हणून स्वीकारल्या. अंगिकारलेल्या ह्या गोष्टी बहुजन समाज आजही ईमानइतबारे त्या सत्य गोष्टी म्हणून पाळत आहेत.

खोट्या गोष्टीचा प्रसार व प्रचार करण्यात ब्राम्हणांचा जगात कोणीही हात पकडू शकत नाही. तुकाराम महाराजाच्या खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून तुकाराम महाराजांना पुष्पक विमानाने स्वर्गात गेल्याची अफवा पसरविणे, तुकाराम महाराजाच्या गाथा नदीत बुडविल्यानंतर जगनाडे महाराजांनी त्या परत लिहल्या तेव्हा पाण्यात बुडविलेल्या गाथापरत आल्या अश्या अफवा पसरविल्या त्यामुळेच  सत्यनारायनाच्या कृपेमुळे देश प्रजासत्ताक झाला असे बहुजन समाजाच्या मनावर बिंबवायचे आहे अशी शंका निर्माण होणे रास्त आहे. सत्यनारायण जर अस्तीत्वात होता तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकांना फासावर का जावे लागले?. इंग्रजाच्या लाठ्या का खाव्या लागल्या?. सत्यनारायण हा सर्वशक्तिमान व तारणकर्ता  होता तर त्याच्या एका हाकेने हा देश गुलामगिरितून मुक्त का झाला नाही?. लोक स्वातंत्र्यासाठी बळी गेले तेव्हा त्याने अमृतमंथाने का जीवंत केले नाही?. ज्या पेशव्यांनी सत्यनारायनाच्या पूजेची प्रथा रुजविली त्यांचेही राज्य सत्यनारायनाने का वाचविले नाही?. अशा प्रश्नांची  उत्तरे सत्यनारायनवादी मंडळी कधीच देत नाहीत. ते चुपचाप राहतात. अशा प्रश्नाची उत्तरे देणे त्यांना नुकसानीचे असते.
सत्यनारायणाच्या पूजेतून ब्राम्हण मंडळी हजारो रुपयाची माया जमवीत असतात. या सत्यनारायणाच्या पूजेत आर्थिक नुकसान पुजा ठेवना-याचे होते तर फुकटचा गल्ला भट-ब्राम्हण घेऊन जात असतो. पूजेसाठी आणलेले फळे, बदाम, काजू या वस्तु तर असतातच वरुण धोतर व पैसे पण द्यावे लागतात. आजकाल भटपूजारी पूजेत सोन्याच्या वस्तु ठेवायला सांगतात. म्हणजे काहीही श्रम न करता केवळ तोंडाने बडबड करून पैशाची कमाई करणारे भट हे मालदार व धनवान बनतात. मग हे पैसे भ्रष्टाचारातून, फसवणुकीतून वा गुंडगिरीतून आलेले असो ब्राम्हणाला हे सगळे पैसे चालत असतात.    

आजकाल जागृत देवस्थान, नवसाला पावणारे गणपती व प्राणप्रतिष्ठा सोहळे यांचे पेवच फुटलेले दिसते. उत्तर प्रदेशात अशाच एका हनुमान संकटमोचन मंदिरात अतिरेक्यांनी बाम्बस्फोट घडउन आणले, त्यात बरेच भाविक मरण पावले तेव्हा तो संकटमोचक व जागृतदेव कोठे झोपला होता?. त्याने आपल्या भक्ताचे प्राण का वाचविले नाही?. दोन वर्षापूर्वी मांढर देवीच्या यात्रेत अनेक जन मृत्यूमुखी पडले तेव्हा त्या भक्तांना देवीने का वाचविले नाही?. जो देव व देवी आपल्या परम भक्तांना वाचऊ शकत नाही मग हे कसले जागृत देव व संकटमोचक?. कॅसेटकिंग गुलशन कुमार हा तर शिवाचा निस्सीम भक्त, सत्यनारायणाची पूजा घालायचा, देवी देवतावर तर त्याने अनेक चित्रपट व कॅसेट काढल्या अशा या देवाच्या परम भक्तावर देवाच्या दरवाज्यासमोरच गॅगस्टर्संनी गोळ्या घालून जागीच ठार केले तेव्हा तथाकथित सत्यनारायण व शिवाने आपल्या लाडक्या गुलशन कुमारला का वाचविले नाही?. आजकाल तर गॅगस्टर्सं खून करण्यापूर्वी सत्यनारायनाची पुजा घालतात आणि मगच खून करतात. देव कोणाची पाठराखण करतो वा कोणाचा नाश करतो याचे उत्तर शोधुनही सापडत नाही. मग देवाच्या पाठीशी वेळ व्यर्थ तरी का घालवावा?. तेवढाच वेळ आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे दिला तर आपला मुलगा पुढे जाईल याचे भान बहुजन समाजाला नसणे हेच धर्म मार्तंडाच्या पथ्यावर पडत आहे. देवाची संकल्पना ही केवळ मानसिक शांतीसाठी अस्तीत्वात आली असेल तर यज्ञ व पुजा विधीच्या माध्यमातून भट-ब्राम्हणावर दानाची उधळपट्टी ती कशासाठी?.

रामदेवराय हा रामभक्त होता. नियमित देवाची व ब्राम्हनांची पुजा करीत होता. अल्लाउद्दीन खिलजी हा आपल्या दहा-पंधरा हजार सैनिकाबरोबर विध्याद्री उतरून महाराष्ट्रात आला व थेट रामदेवरायच्या देवगिरीवर चाल करून हरिभक्त रामदेवाच्या अफाट संख्येच्या सैन्यावर हल्ला करून त्याला पराभूत केले. त्यानंतर लोकांच्या कत्तली केल्या, मंदिरे लुटली तेव्हा चमत्कार करणारा व दृष्टांचे संहार करणारा देव सत्यनारायण कोठे होता?. प्रत्येक देवास चार ते सहा हात असूनही त्या देवांनी त्याला का रोखले नाही?. ज्ञानेश्वर महाराज हा अल्लाउद्दीन खिलजी व रामदेवराय यांचा समकालीन. ज्ञानेश्वराने रेड्याला बोलायला लावले व भिंत चालवली असे काहीजन प्रसार व प्रचार करतात. एवढी शक्ती ज्ञानेशवरात होती असे मानले तर अल्लाउद्दीन खिलजीच्या सैनिकासमोर त्याने भिंती आडव्या का केल्या नाही?. आपल्याशक्तीने सैनिकांना रोखले नाही?. अल्लाउद्दीन खिलजी तुझ्यावर चाल करून येत आहे. अशी एक सूचना त्याने रामदेवरायास का दिली नाही?. ब्राम्हणांच्या बाता म्हणजे थोतांडपणाचा केवळ कळस असतो. एखादा नवस फेडायचा विसरला की देव त्याच्यावर कोपतो, त्याचा सत्यानाश करतो, सत्यनारायण घरात नाही घातला व वास्तुशांती केली नाही तर घराला भूतबाधा येते, घरात सैतानी राज्य वास करते असे सांगून भोळ्या बहुजनाला फसविण्यात येते. या देशात ब्राम्हण हाच एकमेव सैतान आहे. या सैतानाला जोपर्यंत भारतीय बहुजन समाज डोक्यावर घेऊन मिरवत राहिल तोपर्यंत हा बहुजन गुलामीच्या कात्रीत सदैव अडकून राहील. ख-या अर्थाने बहुजन समाजाला मानसिक रित्या स्वतंत्र व्हायचे असेल तर त्याने ब्राम्हण नावाच्या सैतानाला आपल्या आसपासही भटकू देऊ नये कारण हा सैतानी किडा सा-या समाजाला पोखरून टाकीत असतो.

सरकारी कार्यालयात कोणत्याही धर्माची पुजा करणे हे घटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्वाची पायमल्ली करणे आहे. परंतु सरकारी कार्यालयामध्ये बिनधास्तपणे सत्यनारायनाच्या पुजा घातल्या जातात. यात सरकारी पैसा व वेळेचा अपव्यव होत असतो. एक ब्राम्हण कर्मचारी हवा तयार करीत असतो, बहुजन कर्मचारी कार्यक्रमाचे ओझे वाहत असतात तर दूसरा ब्राम्हण पूजेचा बाजार मांडून पैसे कमावून जात असतो. सरकारी कार्यालयात कोणतेही काम न करता काही कर्मचारी सत्यानारायण पूजेच्या तयारीसाठी लागलेले असतात. पुजा झाल्यानंतरच्या दुस-या दिवशी पूर्णपणे आराम करीत असतात. म्हणजे एकूण तीन दिवस सरकारचे व्यर्थ जात असतात. हे सरकारला कसे काय चालते?. लोकांनी आपल्या घरी रात्री व दिवसा केव्हाही पुजा करावी त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. घटनेने ते स्वातंत्र्य सर्वांना बहाल केलेलेच आहे. परंतु शासकीय कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम घेऊन शासकीय कामचुकारपणा असून ते शासकीय नियमाविरुध्द आहे. सरकारी कार्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेवर सरकार बंदी का आणीत नाही?. सरकारच घटनेची पायमल्ली का करते?. की सरकारच या ब्राम्हणी सैतानाला भिते?.
भारताच्या एका कोप-यात समुद्रात लक्षद्वीप नावाचे बेट आहे. या बेटावर जाण्याचा प्रसंग आला. या बेटावर पूर्णता मुस्लिम लोक राहतात. हिंदू प्रमाणे तेही सरकारी कार्यालयात पुजा घालू शकले असते परंतु ते सरकारी कार्यालयात कोणताही धार्मिक विधी व पुजा करीत नाहीत. ते खरे राज्यघटनेचे पालन करून धर्मनिरपेक्षतेचे तत्व पाळतात.
गरिबांच्या आरोग्यशिक्षण, निवारा या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी सरकार काहीही पावले ऊचलत नाही परंतु मंदिर व पूजेत जास्तच लक्ष घालताना दिसते. धर्मस्थळाच्या विकासाला प्राथमिकता देऊन नवाचा विकासाला मात्र दुय्यम स्थान देण्यात येते. आज देशात नवनवी मंदिरे बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यापासून ते उद्योगपती सर्वांनी या कार्यात वाहून घेतले आहे. राजकारणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दान देतात. मंदिर पूर्ण होई पर्यन्त कोठेही न दिसणारा ब्राम्हण
पूजेच्या नावाने पूर्ण मंदिर ताब्यात घेत असतो. आज जिथे वस्ती तिथे मंदिर ही संकल्पना देशात रुजउन व सत्यनारायणाच्या पुजाना प्रोत्साहन देऊन भट-ब्राम्हणाला रोजगाराच्या संधी उपलब्ध्द     करून दिल्या जात आहेत परंतु या देशात असलेल्या ८५ टक्के बहुजन समाजाच्या हिताचे व त्याच्या रोजगाराचे कोणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे  बहुजन समाजाने आता मंदिराच्या पुजारी पदासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी करणे गरजेचे आहे.

                                                            लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment