Saturday, December 14, 2013

हिंदू - हिंदुस्थान व हिंदुवादाचे मूळस्थान

“हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदू शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. याउलट तथाकथित ब्राम्हण नेते वी. दा. सावरकर  यांनी 
आपल्या साहित्याद्वारे हिंदू ह्या शब्दाची फारच स्तुती केलेली दिसते. सावरकर हे हिंदू शब्दाची उत्पत्ती व विकास बहुजन समाजापासून लपवून ठेवण्याची कारस्थानी करतात. वी. दा. सावरकराचीच री राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने व शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांनी ओढली.

भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. ‘हिंदू’ कसल्याही प्रकारे धार्मिक शब्द नसून कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही. मुस्लीम आक्रमणानंतर हिंदू या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात हिंदुवाद हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला ‘हिंदू’ हा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे.

बहुसंख्य हिंदू लोक हिंदू शब्दाचे मूळ व त्याची उत्पत्ती या संबंधात अनाभिंज्ञ आहेत. भारतात हिंदू ह्या शब्दाचा वापर मुख्यत: वैदिक वंशाचे लोक (ब्राम्हण) व मुस्लीम अधिक करताना दिसतात. बहुसंख्य मुस्लीम हे कट्टर धर्मवादी असतात. मुस्लिमांच्या धर्मवादामुळे ते दुस-याकडे बघताना धर्माच्या चष्म्यातून बघतात. स्वातंत्र्योत्तर भारताच्या झालेल्या फाळणीला ते हिंदू व मुस्लिमांची फाळणी मानतात. त्यामुळे जावेद अख्तर पासून ते असगर अली इंजिनियर, सलमान खान, आमिरखान, इतिहासकार जावेद हबीब  व बुखारी यांच्या तोंडी नेहमी हिंदू, हिंदुस्तान व हिंदुस्थानी हे शब्द ऐकायला मिळतात. हिंदू शब्दाचा प्रचार करण्यात मुस्लिमांचा सिहाचा वाटा आहे.
संविधानाच्या उद्देशिका मध्ये नमूद केलेले  “आम्ही भारताचे लोक व अनुच्छेद १ मध्ये या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याच्या संघ असेल असे स्पष्ट केले आहे. तरीही संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीला मानणारा मिडिया भारत या शब्द ऐवजी हिंदुस्थान या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भाग आहे असे मानायला पाहिजे.

वैदिक लोक ‘हिंदू’ या शब्दाला इतर धर्माच्या विरोधात अधिक प्रमोट करताना दिसतात. वस्तुत: हिंदू व इंडिया हे दोन्ही शब्द परकीय आहेत. ‘हिंदू’ हा संस्कृत शब्द नसून तो कोणत्याही भारतीय भाषेत आलेला नाही. ग्रीक लोक इंदू नदीला सिंधू म्हणत असत. इंदू नदी ही पाकिस्तान व भारतात वाहते. ग्रीकांच्या काळापर्यंत केवळ सिंधू हा शब्दप्रयोग होत असे. परंतु त्यानंतर भारतात आलेल्या पर्शियन लोकाना “स” चा बरोबर उच्चार करता येत नसल्यामुळे ते ‘स’ ला ‘ह’ म्हणत त्यामुळे पुरातन पर्शियन लोक सिंधूला हिंदू म्हणू लागले. भौगोलिक दृष्ट्या सिंधू नदीच्या आसपास राहणारे लोक म्हणजे हिंदू अशी त्यांची नामावली होवून गेली. हिंदू या शब्दाचा कोणत्याही धार्मिक परंपरेशी नातेसंबंध नाही. भारतावर आक्रमण करणा-या अरब व मुघल यांनी सिंधू नदीच्या पलीकडे रहाना-या सर्व लोकांना हिंदू म्हणने सुरु केले. ग्रीकांनी इंदूचे सिंधू  केले तर अरब व मोगलांनी सिंधूचे हिंदू केले.

हिंदू या शब्दाची मूळ उतपत्ती कशी झाली असावी?. मोरक्कन मुस्लीम प्रवासी इब्न बतुता यांच्या रीहला या पुस्तकात “अल हिंद” हा शब्दप्रयोग आलेला आहे. “अल हिंद” हा शब्द अरेबिक आहे. इब्न बतुता याचा कालावधी १३०४-१३६९ हा आहे. तुघलकांच्या काळात सहा वर्ष त्याने काद्री म्हणून काम पाहिले होते. म्हणजेच केवळ तेराव्या शतकापासून हिंदू हा शब्द उच्चारला जात आहे. इब्न बतुताने इंदू नदीच्या आसपास राहना-या लोकांना ‘अल हिंद’ असे नाव दिले. हिंदू हा पर्शियन शब्द असून तो सिंधू या शब्दाला समानार्थी आहे. इंदू ही नदी आशियातील सर्वात मोठी नदी होती. झेलम, चिनाब, रवी, बियास व सतलज ह्या तिच्या उपनद्या होत. ‘सप्त सिंधू’ ह्या शब्दाचा पर्शियन मध्ये ‘हप्त हिंदू’ असा शब्द प्रयोग केला जातो. या दोन्ही शब्दाचा अर्थ ‘सात नद्या’ असा होतो.
जसजसी मुस्लीम राजवट उत्तरे कडून भारताच्या इतर भागात पसरत गेली तसतसे मुस्लिमांनी त्या त्या भागात जावून हिंदू व हिंदूस्थान या शब्दाचा वा नावाचा स्थानिक लोकासाठी व भूभागासाठी संबोधित करने सुरु केले व मुस्लीम नसलेल्या सर्व लोकासाठी हिंदू हा एकच शब्द वापरला. त्यामुळे हिंदू या शब्दासी कोणत्याही धर्माचे वा संस्कृतीचे वा विशिष्ट समुदायाचे देणे घेणे नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू या शब्दात केवळ ब्राम्हण (वैदिक), जैन, सिख व बौध्द समुदायाचा समावेश होतो. भारतातील ब्राम्हण वर्ग सोडता संपूर्ण बहुजन समाज (मागासवर्गीय समाज) हा जैन व बौद्ध धर्मियामध्ये विभागलेला होता. त्याचे “हिंदू धर्म” या संकल्पनेसी काडीचाही सबंध नाही. हिंदू संज्ञा ही मुस्लीम राज्यकर्त्यांना प्रशासकीय सुलभतेसाठी अतिशय उपकारक ठरली. मुसलमानांनी हिंदू ह्या शब्दाचे उच्चारण सगळ्या भारतीयासाठी केले असले तरी ब्राम्हणांनी वैदिक धर्माच्या माध्यमातून आपला वेगळेपणा जपून ठेवला त्याची नोंद घेणे आवश्यक आहे.
‘हिंदू’ हा शब्द १६ व १७ व्या शतकापर्यंत तुरळक तुरळक प्रमाणात वापरात येत होता. परंतु १८ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटीश राजवटीच्या कार्यकाळात युरोपियन कंपनीच्या व्यापा-यांनी व कंपनीने भारतातील मुस्लीम सोडून सर्व लोकास (कोणाचाही धर्म न बघता) हिंदुस्थानी हा शब्द वापरणे सुरु केले. बाहेरून आलेले मुस्लीम व ख्रिश्चन धर्मियासोबत सोबत स्थानिक लोकासी तुलना करताना ते सर्वांना हिंदू धर्मीय संबोधू लागले. लिहिण्याची व संवादांची आधुनिक साधने उपलब्ध झाल्यामुळे ‘हिंदू’ चा प्रसार झपाट्याने होत गेला. अशा प्रकारे मुळच्या स्वतंत्र धर्मीय जैन, बौध्द व सिख धर्मियांच्या मानगुटीवर हिंदू या नवीनच धर्माचे लेबल चिकटविण्यात आले. भारतीय संविधानानेही जैन व बौध्द धर्मियांना हिंदू धर्मीय म्हणून उल्लेख केला. परंतु २००३ च्या सुप्रीम कोर्टाने जैन धर्म हा स्वतंत्र धर्म असल्याचा निवाडा दिला.
त्याही अगोदर १९०९ साली ब्रिटीश व्हाईसराय लार्ड मिंटो समोर सेठ हरिचंद माणिकचंद यांनी ब्रिटीश कौन्सिलमध्ये जैन धर्मियांना अल्पसंख्याक दर्जाची मागणी करून राखीव जागांची मागणी केली व त्यांची ही मागणी मान्य करून कौन्सिल मध्ये जैनांना राखीव जागा देण्यात आल्या होत्या. 
जवाहरलाल नेहरू आपल्या Discovery of India या पुस्तकात म्हणतात,
"Buddhism and Jainism were certainly not Hinduism or even the Vedic Dharma. Yet they arose in India and were integral parts of Indian life, culture and philosophy. A Buddhist or Jain, in India, is a hundred per cent product of Indian thought and culture, yet neither is a Hindu by faith. It is, therefore, entirely misleading to refer to Indian culture as Hindu culture.

Encyclopaedia Britannica नुसार  The word Hinduism was first used by the British writers in the year 1830 to describe the multiplicity of the faiths of the people of India excluding the converted Christians. (Volume -20, Reference -581)
वेद हे बहुंसंख्य भारतीयांना आपलेसे कधीच वाटले नाही व आजही वाटत नाही. परंतु रामायण, महाभारत व भगवतगीता हे बहुसंख्याकाना अधिक जवळचे वाटतात. वैदिकांचे इंद्र, वरुण, अग्नी, सोम हे देव कधीच बहुसंख्याकांचे देव झाले नाही तर बहुसंख्याकांचे देव खंडोबा, म्हसोबा यांना वैदिकांनी कधीच आपले देव मानले नाही. परंतु बहुजनांच्या देवाचे पुजारीपद घेणे हा ब्राम्हणांनी केवळ आपला धंदा व पोट भरण्याचे साधन समजले आहे. ब्राम्हण वर्गाने वैदिक व सनातन धर्मासी आपले सबंध कायम ठेवल्यामुळे आजच्या काळात हिंदू ही संज्ञा ब्राम्हणांना नव्हे तर केवळ बहुसंख्य बहुजन समाजाला लागू पडते. आजच्या काळात हिंदू धर्म अस्तित्वात असताना ब्राम्हणातर्फे सनातन व वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याची धडपड हा त्यांचा हिंदू नसल्याचा सज्जड पुरावा होय. वैदिक व बहुसंख्य समाजाच्या लोकांचे आडनावे हे वेगवेगळी आहेत. जोशी, कुलकर्णी अशी आडनावे बहुजन समाजात नसतात परंतु बहुजनांच्या सर्व जातीमध्ये सगळ्याच प्रकारची सारखीच आडनावे असलेली दिसतात. त्यामुळे अल्पसंख्य वैदिक व बहुसंख्याक बहुजन यांची धार्मिक नाळ सारखी नसून ती विरोधीच आहे. वैदिक धर्म हा केवळ ब्राम्हणासी सबंधित आहे त्याचे बहुजन समाजासी नाते जोडणे हा केवळ पाखंडीपणा व स्वार्थाचा कळस गाठणे व बहुजनांना मुर्ख ठरविण्याचा अट्टाहास करने होय.

भारतीय राजकीय पक्षांनी लोकांना धर्म व जातीमध्ये विभाजित ठेवणेच योग्य ठरविले आहे. त्यासाठी ते जुनाट कल्पना, चालीरीती व धर्मवेडेपणातील कट्टरपणा  कायम ठेवण्यासाठी वा जतन करण्यासाठी प्रोत्साहन देतात. वेगवेगळे उत्सव साजरे करण्यासाठी  स्वत:जवळ असलेला पैसा त्यात ओततात. वर्णाश्रम व जातीपरंपरा कायम ठेवणे, लोक विभागलेले असणे व परस्परांचा हेवा व मत्सर कायम राहणे हे राजकीय नेते व पक्षांना सत्ते मध्ये राहण्यासाठी फायदेशीर ठरत असते. धर्म व जातीचा फायदा सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी  धर्मवादाचा कट्टरपणा व जातीचा अहंकार वृन्दिगत होत जाईल व हिंदू नावाच्या उत्पत्तीचा इतिहास दाबून ठेवण्यात येईल यात कसलीही शंका उरत नाही.

बापू राऊत

९२२४३४३४६४ 

No comments:

Post a Comment