Wednesday, December 31, 2014

विवेक जागृत करू पाहणारा “ पिके ”

अध्यात्म हा मानवाला गुढतेकडे नेणारा मार्ग आहे. तो माणसातील स्वत्व हिरावून घेतो. माणसाला वाटत असत अध्यात्मवाद हा माझ्या सर्व समस्याच उत्तर आहे. म्हणून तो पुंजापाठ, मंत्रपठण, चालीसा, देवाला नैवद्य दाखविणे असे प्रकार करीत असतो. या सर्व गोष्टी केल्याने व त्यात तथ्य असेल चुटकीसरशी जीवनामरनाचे प्रश्न का सुटत नाहीत? माणसाला कष्ट का करावी लागतात?. कार, संगणक, ध्वनीयंत्रना, दूरदर्शन, मोबाईल्स यांची निर्मिती अध्यात्माने केली आहे का?. याचा विचारही माणूस करताना दिसत नाही. आपण ज्या सुख व समृद्धीसाठी तळमळतो,  नित्यनेमाने पूजापाठ करतो,

Friday, December 26, 2014

घरवापसी कोणाची: मूळनिवासींची कि विदेशींयांची?

भारतामध्ये जेव्हापासून राजकीय सत्ताबदल झाला तेव्हापासून उघडपणे धर्मांतर करण्याचे धाडसत्र सुरु झाले. संघ व त्यांच्या विविध शाखा यांच्यात नवीन उर्जा निर्माण झालेली दिसते. संघ आजपर्यंत दबा धरून गुप्तपणे बजरंग दल, विहिप व दुर्गावाहिनी यांच्यासारख्या अनेक संघटनामार्फत आक्रमकपणे हिंदुत्वाच्या पडद्यामागून सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाचे काम करायचा. चुलीवर झाकण ठेवलेल्या गरम पातेल्यातील पाण्याची वाफ जशी आतमध्येच खवळत गुदमुरत असते, बाहेर येण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो. परंतु पातेल्याचे झाकण उघडताच त्याची वाफ भपकन बाहेर येवून भाजून काढते. काहीसे तसेच  संघाच्या

Sunday, December 21, 2014

कोकणातील दलित चळवळ: परिणाम व सद्यस्थिती


महाराष्ट्रातील दलित चळवळीचे विभागवार अध्ययन करायचे झाल्यास तिचे मुख्यत: पाच विभाग करता येतात. विदर्भ, मराठवाडा, कोकण-मुंबई इलाका, प.महाराष्ट्र व खानदेश हे ते विभाग. प्रत्येक विभागाचा स्वतंत्र एक इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रश्न हे एकसारखेच होते. एकीकडे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जातीयतेविरुध्द लढतानाच दुसरीकडे आर्थिक विषमतेचे लढेही लढावे लागले. कोकण-मुंबई इलाखा वगळता गायरान जमिनीचा लढा तर कोकणातील प्रचलित खोत पध्दतीच्या विरोधात अनेक परिषदा घेवून आंदोलने करावी लागली.

Tuesday, December 9, 2014

भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी हे संघीय षडयंत्र

नरेंद्र मोदीने “गुजरात” माडेलचे गाजर सर्व देशवाशियाना दाखवून संपूर्ण देशाचा विकास हा गुजरात प्रमाणे करु, परदेशातील काळा पैसा देशात आणून भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट करू, भ्रष्टाचा-यांना तुरुंगात टाकण्यात येईल, देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची हमी देण्यात येईल असे अनेक आश्वासन व आमिषे जनतेला दिले होते. सोबतच त्यांनी आपण मागास जातीचे आहोत, एका मागास समाजाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविणे हे तुमच्याच हाती आहे असे भावनिक आवाहन त्यांनी ओबीसींना करीत आपण चायवाला असल्याचे सांगत या देशातील गरिबांचेही मनेही जिंकली जिंकली. या आश्वासनाच्या बळावरच लोकांनी मोदीला न भूतो न भविष्यती

Wednesday, December 3, 2014

कर्तुत्वशुन्य नेतृत्व व दिशाहीन आंबेडकरी चळवळ

बहुजन समाज जितका दुभंगुन राहील तितकाच तो अधिकाधीक दुबळा होईल, त्याच्या दुबळेपनामुळे तो आपल्याला हाकवन्याजोगा होत राहील व नंतर त्याला पाहिजे त्या दिशेने वळवता येईल.  सत्ताधा-यांचे असे हे एक सूत्र असते. सत्ता हि शासन, प्रशासन व प्रशासनामार्फत जनतेला कंट्रोल करण्याचे साधन असते. याबरोबरच ती समाजव्यवस्था, धर्म व अर्थव्यवस्थेवरही वर्चस्व गाजवीत असते. त्यामुळेच सत्ता हि सत्ताधा-यासाठी सर्वस्व असते. म्हणून वर्चस्वाच हे गाजर नेहमी आपल्या हातात ठेवण्यासाठी सत्ताधारी लोक वेगवेगळी माध्यम शोधीत असतात. भारतात धर्म, देव व संस्कृती हि त्यांची माध्यमे तर आहेतच परंतु बहुजनात लाचार व स्वार्थी लोकांचा समूह निर्माण करून त्यांचा ते आपल्या सोयीसाठी माध्यम म्हणून वापर करीत असतात.

Sunday, November 23, 2014

येथे नक्षलवादी सुबक बनवून मिळतील -ले. संजय पवार (लोकसत्ता दीनांक.२३.११.२०१४)

lok11प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही। मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही॥
ढोल गँवार शूद्र पसू नारी। सकल ताडना के अधिकारी॥
(सुंदराखंड। तुलसीदासकृत 'रामचरितमानस'मधील एक चौपाई)
संत तुलसीदासाच्या रामचरितमानसात 'ताडना'चे म्हणजेच बडविण्याचे अधिकारी म्हणजेच अलीकडच्या शासकीय भाषेत 'लाभार्थी' कोण? तर ढोल, गँवार म्हणजे अशिक्षित, शूद्र म्हणजे अस्पृश्य जाती, पशू म्हणजे प्राणी आणि नारी म्हणजे स्त्री! ('उठता लाथ, बसता बुक्की' हा त्याचा पुढचा अवतार असावा!) नेहमीप्रमाणे तुलसीदासाचा 'ताडना' म्हणजे 'तारणे' असा असलेला खरा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून 'ताडना' म्हणजे 'बडविणे' असं पसरवून तुलसीदास व रामचरितमानस नाहक बदनाम केलंय, असा युक्तिवाद काही लोक करतात. अशिक्षित, शूद्र, पशू, नारी यांना 'ताडना' म्हणजे 'तारणे' समजू शकतो; पण मग 'ढोल' कसा 'तारणार' आणि कशासाठी?

Thursday, November 13, 2014

मोदीच्या बौध्द धर्म प्रेमामागील वास्तव (लोकमत: पुण्याप्रसून वाजपेई)

जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी क्योटो येथील तोजी बौद्ध मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किंकाकुजी बौद्ध मंदिरालाही भेट दिली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे सार्क राष्ट्रांची परिषद होणार आहेस त्याही वेळी ते काठमांडू येथील बौद्धनाथ किंवा स्वयंभूनाथ स्तुपाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथे अमनिभा मोनॅस्टरीला भेट देण्याची इच्छा ते व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे सर्व उगाचच घडत नाही. त्यामागे निश्चित असा हेतू आहे. मोदी यांनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली त्यामागेसुद्धा त्यांचा असाच निश्चित हेतूृ होता. ज्या-ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत, त्या-त्या राष्ट्रांना ते जाणीवपूर्वक भेटी देत आहेत. या राष्ट्रांसोबत नवीन नातेसंबंध निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेपासून उत्तर प्रदेशातील मायावतीसारख्या दलित नेत्यांना मोदींना बौद्ध धर्माचे असे अचानक प्रेम का वाटत आहे, हा प्रश्न सतावतो आहे. बौद्ध धर्माने प्रभावित राष्ट्रांशी असलेल्या संबंधांना नवी व्याप्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघ परिवाराचा विस्तार करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी जी शिकवण दिली होती, तिचे तर मोदी अनुसरण करीत नसावेत?

Wednesday, November 12, 2014

"उध्दव ठाकरे" तुम्ही चुकलातच !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकानंतर केवळ महाराष्ट्रातील जनतेचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे होते. महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल हाती येवू लागताच व या निकालात आपल्या हातामध्ये काहीच लागणार नाही याची जाणीव होताच चाणाक्ष शरद पवाराने आपली राजकीय खेळी खेळत भाजपाने पाठिंबा न मागताच व काहीही अटी न लावताच बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा शरद पवारांचा धूर्तपणा केवळ आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना वाचविण्याचा केविलवाणा केलेला प्रयत्न होता. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या एकूण जागा बघता व
निवडणूकपूर्व परिस्थिती लक्षात घेता निवडणूक निकालानंतरच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षात बसण्याची घोषणा करायला पाहिजे होती. असे झाले असते तर भाजपाला तुमच्याकडे मदतीची याचना करत यावे लागले असते.
जसजसा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय कुटनितीचा संपूर्ण अभाव दिसू लागला तसतसा भाजपाच्या नेत्यांनी गुगली टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेवटपर्यंत भाजापा नेत्यांनी झुलत ठेवले. या तू-तू मै-मै च्या खेळात भाजपा यशस्वी झाली परंतु यात उद्धव ठाकरे व शिवसेनेचा पूर्णत: भाजीपाला झाला. बाळ ठाकरेच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा वारसा मिळाला नाही असे लोकही कुजबुजू लागले. केविलवाण्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांच्या दिल्लीवारी करीत राहिले. दिल्लीत पोहोचल्यावर शिवसेनेच्या नेत्यांना भाजपाचा कोणताही नेता भेट देत नव्हता. तसे शिवसेनेचे नेते माघारी मुंबईमध्ये परत येत होते. हा सारा तमाशा महाराष्ट्रातील मराठी माणूस पहात होता. हे सारे कशासाठी होत होते?. सत्तेची हाव, सत्तेची मदलालसा व सत्तेतून मिळणारा अतोनात पैसा यासाठी हा सगळा खेळ होता. हे एव्हाना लोकांनाही कळून चुकले होते. म्हणून शिवसेना व त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर विनोद व चुटकुल्यांचा वर्षाव होत होता. सत्तेसाठीच्या या बावळटपणामुळे उद्धव ठाकरे यांचा राजकीय कमकुवतपणा मात्र उघड झाला हे निश्चित.
सामान्य शिवसैनिकांना नेत्यांच्या अशा बावळटपणाची सवय नव्हती. कारण आजपर्यंतचा त्यांचा नेता असलेला बाळासाहेब ठाकरे हा कोणाला शरण जाणारा नेता नव्हता. बाळासाहेब ठाकरे खंबीर नेते होते (बाळासाहेब ठाकरेचे विचार पटत नसले तरी). एकदा त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला कि तो त्यांचा शेवटचा शब्द असायचा व त्यानंतर होणा-या परिणामाची ते पर्वा करीत नसत. हा ठाकरीबाणा उद्धव ठाकरेंना जपता आला नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा व संघ यांना देशातील प्रादेशिक पक्ष संपवायचे असून देशात द्विदल पध्दती म्हणजे देशात दोनच राष्ट्रीय पक्ष ठेवायचे आहे. त्या दिशेने वाटचाल चालू असून कांग्रेसलाही ते हवेच आहे. असे झाले तर या देशाची सत्ता हि नेहमी आलटून पालटून उच्च वर्णीय ब्राम्हण व भांडवलदार बनियाकडेच राहील. हे दोन्ही पक्ष बहुजन समाजात आपले दलाल व पिट्टू तयार करतील व त्यांच्याद्वारे बहुजन समाजाला काबूत ठेवतील. येणा-या काळात हे अधिक स्पष्ट होईल.
बाळ ठाकरे नंतर शिवसेना संपेल असे म्हणणारे विचारवंत शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी पक्ष जमीनदोस्त होईल असे भाकीत करणार नाहीत. कारण जातीवादी राजकारणात मराठ्यांचा पक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रात तरी त्याचे अस्तित्व कायम असेल. आता उद्धव ठाकरेंची खरी कसरत आहे ती मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनाचा झेंडा कायम ठेवण्याची. विधानसभेचा निकाल बघता शिवसेनेला ते शक्य होणार नाही असेच चित्र दिसते. आजपर्यंत शिवसेनेला मिळणारी गुजराती, मारवाडी व उत्तर भारतीय मते हि भाजपकडे वळतील. त्यातच मराठी मते हि मनसे, शिवसेना व राष्ट्रवादी अशा सर्व पक्षात विभाजित होतील. त्यामुळे भाजपाचा भगवा जय श्रीरामाच्या घोषणेत मुंबई महापालिकेवर फडकण्याची अधिक शक्यता आहे. अशा परिस्थिती मध्ये उध्दव ठाकरे यांची परत कसोटी लागणार आहे. कारण भाजप हा पक्ष कोणाशीही युती करणार नाही व स्वतंत्रपणे लढेल व त्यासाठी ते कामालाही लागलेले दिसतात.
आज राजकीय सत्तेशिवाय कोणीही जगू शकू नाही कारण राजकीय सत्ता हि आजची महाशक्ती झाली आहे. राजकीय विचारधारेची सगळ्यांनीच ऐसितैसी केली आहे. कांग्रेसकडे कोणतीच अशी विचारधारा नाही. त्यांच्या राज्यात जशी तालिबानी हिंदू धर्मांधता वाढली व संघाच्या कार्याला  आश्रय मिळतो तसाच ते  मुस्लीम मुलतत्ववादाला अभय देतात. कांग्रेसवाले फुले आंबेडकराचे नाव घेतात परंतु त्यांची कृती हि या महापुरुषांच्या विचाराविरोधीच असते. दलित जनतेच्या अज्ञानाचा व त्यांच्या भावभावनेचा जसा दलित नेते व संघटना गैरफायदा घेतात तसाच फायदा आता इतर सर्व पक्ष घ्यायला लागले आहेत.
ओबीसींची शिवसेनेने आतापर्यंत फसवणूकच केली. मंडल आयोग अंमलबजावणी व जातीगत जनगणना ह्या ओबीसीच्या मुख्य मागण्या होत्या. जनगणनेच्या आधारावरच मंडलची टक्केवारी ठरायची होती. ओबीसीच्या ग्राह्य मागण्यांचा त्यांनी कधी विचारच केला नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेने ओबीसीची पूर्णत: फसवणूक केली. उद्धव ठाकरे हे ओबीसींच्या मागण्याची आतातरी दख्खल घेतील कि नाही? कि नवा मुद्दा शोधून परत ओबीसींची फरफड करतील हे येणारा काळच सांगेल. लेख संपविताना एका मुद्याची दखल घेणे फार गरजेचे आहे, तो म्हणजे या देशात साधू, संत-समागम व सत्संग, मंदिरे यांचा झालेला सुळसुळाट. या साधू संतांनीच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून देण्यात सिहाचा वाटा घेतला आहे. रामदेव, आसाराम, श्री श्री रविशंकर, रामपाल, डेरा सच्चा सौदा, नरेंद्र महाराज अशा अनेक साधूंचे करोडो भक्त या देशात विखुरले आहेत. या साधूंच्या आदेशाबाहेर हे भक्त कधीच जात नाहीत. हे साधू ज्याला पाठिंबा देतील ते या देशात सत्ताधारी होतील. संत व सत्संग हि संघाची निर्मिती आहे. त्यामुळे लोकशाहीला नवा धोका निर्माण झाला आहे. दुसरा धोका हा मिडिया ( वर्तमानपत्रे व टीव्ही) कडून आहे. निवडणुका ह्या मीडियासाठी पैसा कमाविण्याचा धंदा झाला आहे. खोटी माहिती सांगण्यात व सत्य लपविण्यात हा मिडिया तरबेज झाला आहे. मीडियाची नैतिकता लयाला गेली असून तो भांडवलवादी व संघवादी झाला आहे. त्यामुळे तो आता लोकशाहीचा चौथा खांब राहिला नाही याची दखल घेणे गरजेचे आहे.
लेख संपविताना ब्रेकिंग न्यूज आली, महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. नाईलाजास्त्व  शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून बसावे लागत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजापाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेनी केला. मोडेन पण वाकणार नाही, अफझल खानाला व त्याच्या फौजेला धडा शिकवूच अशा वल्गना करणा-या उद्धव ठाकरेचे आज पूर्णत: हसू झाले. त्यामुळेच म्हणावेसे वाटते उध्दव ठाकरे तुम्ही चुकलातच !

बापू राऊत

९२२४३४३४६४

Thursday, October 9, 2014

मासीक लोकजागर जुन  २०१४
 

 

Sunday, September 28, 2014

मा.कांशीरामजींचे अप्रकाशित विचार प्रकाशित करण्याची गरज

महापुरुषाचा विचार हा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरत असतो. त्यामुळे समाजक्रांतिकारक अशा महापुरुषांच्या विचाराचे जतन ग्रंथांच्या रूपात जतन करून ठेवणे आवश्यक असते. समाजामध्ये आमुलाग्र क्रांती करण्याचा तो एक ठेवा असतो. या ग्रंथरूपी ठेव्यातूनच आंदोलनाला नवी दिशा मिळत असते. महापुरुषांच्या विचाराची संग्रह निर्मिती करने हे केवळ चळवळीचे साध्य नसते तर चळवळीला गतिमान करण्याचे ते एक प्रमुख साधन असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक आंदोलन हे गतिशील व गतिमान करण्याचे मर्म पुढच्या पिढीला त्यातून मिळत असते. त्यामुळे एक ऐतिहासिक गरज म्हणून महापुरुषांच्या विस्कळीत व अप्रकाशित साहित्यांला प्रिंट किंवा डिजीटल स्वरुपात साठवून ठेवणे फार गरजेचे आहे. महापुरुषांचे प्रायमरी स्वरुपातील साहित्य (primary data) म्हणजे त्यांनी विविध सभांमधून केलेली भाषणे, वर्तमानपत्रात त्यांचे प्रकाशित झाले लेख, त्यांच्या प्रगट मुलाखती हे असते. तर सेकंडरी (secondary data) स्वरूपातील साहित्य हे प्रायमरी साहित्याचे संकलित स्वरूप असते. हे संकलित स्वरूपातील साहित्य व्यक्तीनी, समूहांनी किंवा सरकारने ग्रंथ वा सीडी च्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असते.
कांशीराम नेहमी म्हणत असत, “जो लोग इतिहास से सबक नही सिकते, फिर इतिहास उन्हे सबक सिखाता है”. त्यामुळे इतिहासाचे महत्व हे कसे वादातीत आहे स्पष्ट होते. आज आम्ही आमच्या महापुरुषांचा इतिहास लिहिण्यासाठी सरकारवर अवलंबून आहोत. बाबासाहेबांच्या विचाराचा इतिहास हा अंदाजे एकूण ४० ते ५० खंडामध्ये प्रकाशित होणे आवश्यक होते. परंतु आतापर्यंत ते केवळ २१ खंडा पर्यंतच सीमित झालेले आहे. म्हणजे बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास अजूनपर्यंत लिहिला गेला नाही. त्यामुळे साहजिकच बाबासाहेब पूर्णपणे जनतेपर्यंत पोहोचले नाहीत. हा आंबेडकरी बुध्दिवाद्याचा पराभव समजायचा की सरकारचा जातीयवादी दृष्टीकोन ? याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. जो दुस-यावर अवलंबून असतो त्याची कधीच प्रगती होत नसते. कारण तो केवळ याचनेवर जगत असतो. आणि ही याचना त्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून असते.  आज देशाला बाबासाहेब आंबेडकरामुळे ज्योतिबा फुले कळले. तर बाबासाहेबाचा अभ्यास करताना गेल अम्वेट हिला ज्योतिबा फुले गवसले. गेल अम्वेट यांनी लिहिलेल्या कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल इण्डिया या त्यांच्या पि.एच.डी प्रबंधामुळे महात्मा फुले यांच्या विचाराचे गमक व शक्ती देशाला कळली. यात हरी नरके यांचेही योगदान मोलाचे आहे. वसंत मून यांच्या समर्पितपणामुळे बाबासाहेबांचे खंड प्रकाशित झाले. मा. जयसिंगराव पवार यांनी राजश्री शाहू महाराज यांचेवर केलेल्या लिखाणामुळे शाहू महाराज व शिवाजी महाराज कळायला लागले. तशाच प्रकारे तामिळनाडू मधील डा. वीरमणी यानी पेरियार रामासामी नायकर यांच्या संग्रहित व प्रकाशित केलेल्या साहित्यामुळे पेरियार चळवळ भारतीयांना समजली. उत्तर भारतीयांना पेरियार व शाहू महाराज समजले ते केवळ मा. कांशीराम यांच्यामुळे. बहुजन महापुरुषांचा मनुवादाच्या विरोधातील मानवतावादी संघर्ष  हा अब्राम्हनी साहित्यिकांनी/लेखकांनी लिहिलेल्या प्रबंधामुळे माहिती झाला. अन्यथा या महापुरुषाचा कधी राम व कृष्ण झाला असता ते कुणाला कधी कळलेही नसते. त्यामुळे अब्राम्हनी इतिहाकारांचा इतिहास हाच इतिहासाचा खरा स्रोत असतो, ब्राम्हणी इतिहासकारांचा नव्हे.
बहुजनवादी महापुरुषांची नाळ म्. ज्योतिबा फुले –बिरसा मुंडा- शाहू महाराज –पेरियार ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरु होते, ती सध्यातरी मान्यवर कांशीराम यांच्या जवळ येवून संपते. मान्यवर कांशीराम यांनी चालविलेले आंदोलन हे मुख्यत: परिवर्तनवादी, स्वाभिमानी व आत्मसन्मानाचे आंदोलन होते. म्. फुले- शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचे ते मुख्य आंदोलन होते. त्यामुळे मा.कांशीराम यांनी ३० वर्ष चालविलेल्या  चळवळीचे बिंदू भविष्यात येना-या पिढीना मार्गदर्शक ठरण्यासाठी त्यावर शोधप्रबंध लिहिणे व त्यांचे साहित्य सेकंडरी स्वरूपात प्रकाशित होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीतरी प्रकाशकाची भूमिका वठविणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीमध्ये मा. कांशीराम याचा विस्तृत इतिहास उपलब्ध नाही. त्यांचा इतिहास विस्कळीत व प्रायमरी स्वरुपात आहे. कांशीरामजींचे अप्रकाशित पत्र, त्यांच्या मुलाखती, भारताच्या संसदेमध्ये त्यांनी केलेले भाषण, जनसभातील त्यांची भाषणे, त्यांचे कार्यकर्त्यांसोबत झालेले संभाषण, पत्रकार परिषदा, कार्यकर्त्यांच्या आठवणीतील कांशीराम, कॅडर मधील त्यांचे मार्गदर्शन असे त्यांचे अनेक पैलू आहेत. मा. कांशीराम यांनी चालविलेल्या बहुजन नायक, बहुजन संघठक या साप्त्हीका मध्ये त्यांची भाषणे प्रकाशित झालीत. परंतु त्यांचे वेगवेगळया खंडाच्या स्वरुपात अजूनपर्यंत संकलन झालेले दिसत नाही. ज्यांनी ते संकलन करायला पाहिजे होते त्यांनी आपली भूमिका इमानइतबारे  पार पाडलेली दिसत नाही. बहुजन समाज पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ते करने आवश्यक होते. काहींनी कांशीरामजींच्या प्रेमामुळे व्यक्तिगत पातळीवर ग्रंथनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील थिंकिंग बहुजन सोसायटी फ इंडिया या संस्थेने “बहुजन नायक मा. कांशीराम साहब के भाषण” या शीर्षकाखाली दोन खंड प्रकाशित केले आहेत. परंतु त्यानंतर ते काम थांबलेले दिसते. याला काही कारणे वा अनेक अडचणी असतील.
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष सत्तेमध्ये असताना कांशीरामजीचे अप्रकाशित साहित्य सरकारी खर्चाने वा एखाद्या योजने द्वारा प्रकाशित करता आले असते. केवळ सत्तेसाठी महापुरुषांचा वापर करने परंतु त्यांच्या विचाराची जतन न करने हा फार मोठा दांभिकपणा आहे. कांशीराम यांची साहित्यकृती विविध खंडाच्या स्वरुपात आकर्षक आणि स्वस्त दरात जनतेला उपलब्ध झाली पाहिजे. महापुरुषांचे विचार, त्यांचे चारित्र, त्यांचा इतिहास हे चढ्या किमतीच्या पुस्तक स्वरुपात असेल तर ते साहित्य घेणार तरी कोण?. मध्यमवर्गीय आर्थिक संपन्नतेमुळे घेतील परंतु ते त्यांच्या कपाटातील शोभेच्या वस्तू बनून राहतात. महागड्या किमतीमुळे सामान्य लोकाकडे महापुरुषांचा इतिहास पोहोचत नाही. परंतु त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. कारण बहुजनवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू हा सामान्यजनच असतो.
आपल्याकडे आर.एस.एस चालवीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारखी संस्था नाही. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था हिंदुत्ववादी नेत्यांचे चारित्र ग्रंथमय स्वरुपात प्रकाशित करून त्यांचा प्रसार व प्रचार करते. सोबतच नेते घडविण्याचे कार्य करते. अशा स्वरूपाची संस्था आपल्याकडे नाही हे आपले दुर्दैव्यच आहे. हिंदुवादी संस्था ५० रुपयामध्ये गीता उपलब्ध करून देतात. तसे स्वस्त दरात बहुजन महापुरुषाचे चरित्र उपलब्ध्द झाले पाहिजे.
कांशीरामजींचे त्यांच्या जीवनात मुख्य दोन लक्ष्य होते. त्यापैकी पहिले, बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविणे तर दुसरे  संपूर्ण भारत बौद्धमय बनविणे. प्रामुख्याने ही दोन्ही लक्ष्ये बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु त्यांच्या हयातीमध्ये ते पूर्ण होवू शकले नाही. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर रिपब्लिकन नेत्यानी हाराकिरी केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या ध्येय व साध्याजवळ पोहोचणे त्यांना शक्य झाले नाही. मागासवर्गीयांना शासनकर्ती जमात बनविणे व भारत बौद्धमय बनविणे ह्या दोन बाबींना कांशीरामजीनी आपले ध्येय समजून जबाबदारी स्वीकारली.  पहिले ध्येय कांशीरामजीकडून पार पाडल्या गेले. त्यांनी आंबेडकरी चळवळीला बहुआयामी बनवीत एका राज्यात प्रतीगाम्याकडून सत्ता हिसकावून घेतली. प्रतीगाम्यांनी आंबेडकरांच्या चळवळीला एक जाती व गटापुरते मर्यादित करून त्यांना एका राज्यापर्यंत सीमित करून सोडले होते. मा.कांशीरामजीनी ही कोंडी तोडून टाकीत संपूर्ण बहुजन समाजापर्यंत बाबासाहेबांना पोहोचविले. परंतु भारत बौद्धमय करण्याचे त्यांचे दुसरे लक्ष्य साध्य करता आले नाही. त्यांना आलेल्या अचानक निर्वाणामुळे ते शक्य होवू शकले नाही.
मा. कांशिरामजीनी एक महत्वाचा कार्यक्रम चालविला होता. त्याचे नाव होते, “कही हम भूल न जाये.” त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक समाजातील महापुरूष उचलले. या महापुरुषांचा इतिहास त्या त्या समाजाला सांगून जागृत करण्याचे काम केले. आधुनिक भारताच्या क्रांतीकारक इतिहासाची सुरुवात ही म. फुल्यांच्या सामाजिक क्रांतीच्या बंडातून होते. म. फुलेंच्या सामाजिक क्रांतीची ही ज्योत १९२२ पर्यंत शाहू महाराजांनी तेवत ठेवली होती. १९२२ नंतर   या सामाजिक क्रांतीला बहुआयाम देण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले. १९५६ पर्यंत त्यांनी भारतातील मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून समान संधी देण्याचा प्रयत्न केला. या देशातील लाखो बहुजनांना बौध्द धम्माच्या माध्यमातून नवे जीवन व नवी ओळख दिली. १९७८ ते २००७ या कालखंडात या तीन महापुरुषाच्या  मानवतावादी विचारांचा संघर्ष मा. कांशीरामजिनी पुढे नेला. कोणत्याही समाजाच्या चळवळीची विचारधारा ही त्या आंदोलनाच्या यशस्वीतेतून ठरत असते. आंदोलनाचा मुख्य उद्देश, त्याची प्रक्रिया, कार्यशैली, रणनीती, कार्यकर्ता , नेतृत्व, संगठन ह्या आंदोलनाच्या यशातील महत्वाचे घटक असतात. कांशीरामजीनी या घटकांचा पुरेपूर वापर करीत बहुजन समाजात नवी चेतना निर्माण केली. १९९६ ला बहुजन समाज पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संपूर्ण भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेल्या राजकीय क्रांतीची ती मोठी पावती होती. आंबेडकरी राजनीतीचा  बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण होणे हे मान्यवर कांशिरामजीने घेतलेल्या श्रमाचे व जबाबदारीचे फलित होते. 
आज आम्ही कांशीरामपर्वा नंतरच्या कालखंडात वावरत आहोत. नव्या पिढीचे सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात पदार्पण होते आहे. अशा स्थितीमध्ये कांशीराम नावाचा झंझावात नव्या तरुणांना कळला पाहिजे. महापुरुषांच्या विचारावर आधारित चळवळ चालविण्यासाठी त्याग करावा लागतो. अशी त्यागी मूर्ती कांशीराम शिवाय दुसरी कोण असू शकते?. त्यांचा हा त्याग शब्दबध्द होवून तरुणांचा / कार्यकर्त्यांचा प्रेरणास्त्रोत बनला पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा त्यांचा संपूर्ण जीवनपट शब्दबद्ध होईल व त्या जीवनपटाचा प्रसार होईल तेव्हाच ते शक्य आहे. म्हणून मा.कांशीरामजींचे अप्रकाशित विचार प्रकाशित करण्याची गरज आहे. प्रकाशनाची ही जबाबदारी बहुजन समाज पक्ष पार पाडतो की कांशीरामजींच्या प्रेमाने भारावलेले बुद्धीजीवी पार पाडतात ते पहावे लागेल.

बापू राऊत

९२२४३४३४६४

Saturday, September 13, 2014

नैतिकतेवर अनैतीकतेची मात ही लोकशाहीवर संक्रात


विपरीत विचाराची माणसे एकदा सत्ताधारी झाली की ते आपल्या सोयीप्रमाणे व्याख्या बनवायला लागतात. त्यासाठी ते आपल्या बालहटटासाठी प्रचलित प्रवाह वा पद्धती बाद करण्याचा प्रयत्न करतात. आपले म्हणने ग्राह्य ठरविण्यासाठी तर्काचे नवनवीन प्रमेये मांडायला लागतात. संविधानात्मक परंपरेची नैतिकता जपणारा समूह की जो स्वत:ला लोकशाहीचा चौथा खांब समजतो तो (प्रिंट/इलेक्ट्रानिक मिडिया)  “नवे काही तरी घबाड हाती लागले” असे समजून २४ तास चर्चा करीत त्याची ब्रेकिंग न्यूज बनवितो व सभ्य समाजाचे  (सिविल सोसायटी) प्रतिनिधी म्हणून मिरविणारे सफेद कुर्ताधारी माणसे अनैतिकतेला नैतिकतेचा मुलामा देण्यात सामीलही होतात. यात घटनेच्या नीतीनियमाची पायमल्ली होते हे ते सहज विसरतात. एकूणच अराजकता व विध्वंसकारी प्रथेला जन्म देण्यास त्यांना अयोग्य असे काहीही वाटत नाही.

Saturday, August 23, 2014

मोहन भागवताचे “अविवेकी” भागवत पुराण

मोदी सरकार सत्तेवर येताच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे फारच उत्साहित झालेले दिसतात. मोदी सरकारच्या येत्या पाच वर्षाचा काळात “संपूर्ण भागवत पुराण” लिहिण्याची त्यांना  फार घाई झालेली दिसते. त्याचाच भाग म्हणून पुराणांवर आधारित भारताचा नवा इतिहास लिहिण्याचे आदेश त्यांनी आपल्या संघीय इतिहासकारांना दिलेले आहेत. जगातील संपूर्ण धर्मांना गिळंकृत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही त्यांनी अलीकडेच मारली असून या देशाचे नाव भारत असणे हे त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या देशातील सर्व जनता ही हिंदू असून त्यांनी
स्वत:ला हिंदुस्थानी म्हटले पाहिजे असे जबरदस्तीवजा आवाहन त्यांनी केले आहे. तर हिंदू व्यतिरिक्त  इतरांना ते दुय्यम दर्जाचे नागरिक समजतात.
मोहन भागवताचे वरील आवाहन हे पूर्णत: संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये “हिंदुस्थान” या शब्दाला कोणतेही स्थान देण्यात आले नाही. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये स्पष्ट करण्यात आले की, या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याचा संघ असेल. याच अनुछेदात (२) (३) मध्ये राज्यांची राज्यक्षेत्रे संपादित केली जातील अशी राज्यक्षेत्रे यांचे मिळून भारताचे राज्यक्षेत्र बनते असेही स्पष्ट केले आहे. तसेच संविधानाच्या उद्देशिकेमध्ये “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य” असे नमूद केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या देशाचे नाव इंडिया वा भारत असे असताना मोहन भागवत हे या देशाला हिंदुस्थान संबोधण्याचे आवाहन करतात. हा या देशाच्या घटनाद्रोहाबरोबरच राष्ट्रद्रोह ठरतो. परंतु या देशाच्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणताही आरोप ठेवला नाही. या उलट शासन त्यांना  सन्मानाने वागवीत आहे. परंतु अरुंधती राय, डाक्टर सेन यांच्यावर प्रशासनाकडून पटकन राष्ट्राद्रोहाचे आरोप लावले जातात. त्यामुळे आजच्या सरकारची स्पष्ट दिशा काय आहे? हे सांगण्यासाठी कोणा गोसाव्याची गरज नाही. संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीला मानणारा मिडिया “भारत” या शब्दाऐवजी “हिंदुस्थान” या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भाग आहे असे मानायला पाहिजे.

मोहन भागवताचा प्रिय शब्द हिंदूया शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून “हिंदू” शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतातthe word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. 

भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात हिंदूहा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. तो कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही.  मुस्लीम आक्रमणानंतर “हिंदू” या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात “हिंदुवाद” हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला हिंदूहा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे. या धर्माला ना धर्मंसंस्थापक आहे ना त्याचा कोणताही धर्मग्रंथ. तरीही हा शब्द बहुजनाच्या मस्तकात टाकण्याची जबरदस्ती मोहन भागवतीय प्रवृत्ती करीत आहे. हा संघीय षडयंत्राचा भाग आहे.
हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येकाला हिंदू का म्हटले जात नाही, असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱयांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱयांना जर्मन, अमेरिकेत राहणाऱयांना अमेरिकन म्हटले जाण्याचा तर्क दिला आहे. याच तर्काने भारतात राहणा-यांना भारतीय असे संबोधण्यात येत असते. याचे ज्ञान भागवताना नाही काय?. गुलामीदर्शक  “हिंदुस्थान” हा शब्द या देशातील बहुजनांना मान्य नाही. तरीही भागवती प्रवृत्ती “हिंदू व हिंदुस्थानीचे” गीत गातात. या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचे व त्याआडून भारतीयावर सनातन धर्मीय “चातुर्वर्णीय व्यवस्था” लादायची हा संघानितीचा एक भाग आहे.
जगातील सर्व धर्मांना गीळकृंत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही भागवताने मारली. त्यांच्या या दर्पोक्तीमध्ये कसलेही तथ्य नाही. या देशाच्या भौगोलिक परिस्थितिमूळे अरबांनी इंदू/सिंधू नदीच्या पलीकडील सर्व लोकांना हिंदू म्हटले. आणि त्यामुळेच नदी पलीकडे वास्तव्य करणा-या येथील विविध समुदायाच्या लोकांना विशेषत: जैन व बौद्धांना हिंदू लेबल आपोआप लावल्या गेले. फार मागे न जाता स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला तर या देशात कोणत्याही मुस्लीम वा ख्रिश्चन वा बौध्द समुहाने हिंदू धर्म स्वीकारला नाही. याउलट लाखो हिंदूचे मुस्लीम, ख्रिश्चन तसेच बौध्द धर्मात धर्मांतरण झालेले बघायला मिळते. हे धर्मांतरण स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी झालेले दिसते. जातीभेद, विषमता, अन्याय व अपमान या दलदलीतून निघून मुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतरण  होय. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कैचीत आदिवासी (आदिम धर्म) सापडलेला दिसतो. हिंदुत्ववादी आदिवासींना “वनवासी” म्हणून संबोधत असतात. त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या “घरवापसीचा नारा” संघांनी दिला. आदिवासीचे हिंदुकरण करण्याच्या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडून आपली मूळ संस्कृती नष्ट करून घेत आहे. याच आदिवासीचे हिंदूकरण करणारे मात्र सरकार व खाजगी कंपन्या जल, जंगल  जमीन हिसकावून त्यांना जंगलाबाहेर हाकलून देत आहे. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्राथमिक गरजा आदिवासी ज्या जंगलातून पूर्ण करतात त्याच जंगलाच्या बाहेर त्यांना काढण्यात येत आहे.  त्याविरोधात मात्र “ब्र” शब्दही काढीत नाही. यावरून संघाला आदिवासीच्या जीवनासी, त्याच्या भूकेशी काही देणेघेणे नाही तर त्यांना केवळ हिंदूची लोकसंख्या फुगन्यासी सबंध आहे.
मोहन भागवताच्या संघाने या देशाचा इतिहास बदलविण्याचा घाट घातला आहे. गुजरात ही त्यांची प्रयोगशाळा आहे. बालसंस्काराच्या नावाखाली पौराणिक काल्पनिक मिथ हे इतिहास म्हणून कोवळया मनावर बिंबविण्याचा प्रयत्न हा सत्य लपवून ठेवण्याचा अघोरी उपाय होय. रामायण, महाभारतातील कपटी कारस्थाने, महिलावर झालेली चिखलफेक, ब्राम्हणी सामाजिक व्यवस्था, ब्राम्हण वर्गाचे समाजावरचे नियंत्रण व इतरांच्या धर्माचा द्वेष हे विषय शिकवून संघाला (अ)विवेकी समाज निर्माण करून आस्थेला सर्वोच्च स्थान देवून डोके हलविणारी विजय भटकरादी पिढी निर्माण करायची आहे काय?     
विवेकवाद हा 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा असतो. विवेकवादाच्या वाटचालीतील महत्वाचे धोरण म्हणजे समाजाचा मनात समतेचे, एकतेचे, विज्ञानवृत्तीचे रोपण करने हे असते. आस्तिक व नास्तिक या वादात न पडता सहयोगी अस्तित्वावाराचा दृढविश्वास व त्यावरची वाटचाल. मोहन भागवताना “विवेक व विवेकवाद” या शब्दाची फार अलर्जी असावी. त्यामुळेच त्यांच्या मनात  “अविवेकी विध्वंसाची” पुनरुक्ती नेहमी नेहमी होत असावी. कारण विवेकशून्य माणसेच समाजात व माणसामाणसात विषवल्लीचे रोपण करीत असतात. अशा लोकांना शांतता, विश्वास व सहजीवन नकोसेच असते. तर त्यांना हवी असते अंधश्रद्धा, द्वेषावर आधारित समाजपद्धती व मानसिक दृष्ट्या पाया पडणारी पंगु पिढी. ती निर्माण करण्यासाठी भागवत व त्यांचे संघीय सैनिक आपली सारी हयात घालवीत आहेत. ज्यांना समाजाने शहाणे होवूच नये, त्याने उलट प्रश्न करूच नये असे वाटते तो धुर्तांचा वैमानिक असतो. त्यांचा तर्क व न्याय यावर विश्वासच नसतो. मोहन भागवत व त्याचा संघ आज अशा धुर्तांची भूमिका वटवीत आहे. या अविवेकी “भागवत पुराणाचा” उधळणारा चौखूर वेळेत रोखला नाही तर विनाशाशिवाय दुसरे काहीही हाताला लागणार नाही याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

बापू राऊत

९२२४३४३४६४

Wednesday, August 13, 2014

बिरसा मुंडा को भारतरत्न का सन्मान क्यों नहीं?

प्रिंट और इलेक्ट्रानिक मिडियाके माध्यमसे पता चलता है की, मोदी सरकारने मा. अटलबिहारी बाजपेई, मा.कांशीरामजी और प.मदन मोहन मालवीय को भारतरत्न देने का निर्णय लिया है. भारतरत्न देश के उन सपुतोको मिलना चाहिए जिन्होंने देश के लिए कुर्बानी दी है, जिनका कार्य स्वाभिमान और संघर्ष का प्रतिक बन गया हो. उनके कार्योंसे देश की जनता तथा युवको को प्रेरणा मिली हो. अटलबिहारी बाजपेई का कार्य भाजपा को सत्ता में लाकर देश का प्रधानमंत्री बनने तक सिमित है. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी की नीव रखनेका कार्य प.मदन मोहन मालवीय ने कीया है तथा  मा. कांशीराम ने महाराष्ट्र के पूना से सरकारी नोकरी छोडकर दबे कुचले तथा बहीश्कृत समाज के उत्थान के लिए कार्य किया, उन्हे  स्वाभिमान की ज्योत जगाकर राजकीय सत्ता हथीयाने का मन्त्र दिया. उत्तर प्रदेश में सरकार स्थापित करने के बाद भी उन्होंने सत्ता का लाभ कभी नहीं लिया था.

Tuesday, August 5, 2014

शंकराचार्य ने कहा शिर्डी के साईबाबा भगवान नही है ।

द्वारका शंकराचार्य ने शिर्डी के साईबाबा की पूजा न करनेकी हिंदुओको हिदायत दी हैवे कहते है  की, हिन्दुओ को साई बाबा की पूजा करना सही नही है हिंदू धर्म मे सिर्फ अवतार और गुरुओकी पूजा होती हैवे कहते है, कलियुग मे केवल बुध्द और कल्की का अवतार हुवा हैऐसे मे साई की पूजा करने का कोई मतलब नही साई न अवतार है और नही उन्हे गुरु के रूप मे आंक सकते है। गुरु आदर्शवादी होते है, लेकिन साई मे ऐसा कुछ नही था। हम मासाहारी को गुरु नही मान सकते। उन्होने केंद्रीय मंत्री उमा भारती की आलोचना करते हुवे उसपर राम भक्त नही होने का आरोप भी

Sunday, July 27, 2014

भारतीय इतिहास बदलविण्याचे षडयंत्र

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जनतेनी नरेंद्र मोदीच्या अच्छे दिन आनेवाले है, सबका विकास – सबका भला अशा प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना व त्यांच्या पक्षाला बहुमताने निवडून दिले. मोदीच्या प्रचारात धर्म, मंदिर यासारखे मुद्दे नव्हते तर विकास हा मुख्य मुद्दा होता. मोदी जिथे जात तिथल्या स्थानिक प्रश्नासी  निगडीत होत ते प्रश्न सोडविण्याची हमी देत असत. मोदींच्या याच हमीवर विश्वास ठेवून

Monday, July 21, 2014

दाभोळकरांच्या हत्या चौकसीवर पोलिसांच्या अंधश्रद्धेचा फवारा

इंटरनेट वरील आउटलुक या मासिकाच्या वेबसाईटवर १४ जुलै २०१४ चा अंक बघितला. त्या अंकामध्ये  डाक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा लेखाजोगा श्री आशिष खेतान या शोधकरिता पत्रकाराने मांडला. लेखातील मजकूर खेदजनक व धक्कादायक होता. तो लेख वाचताना मन सुन्न होत पोलीस व त्यांच्या मानसिकतेवर अनेक प्रश्न चिन्ह उभे राहत होते. हेच का ते तल्लख व सदसदविवेक बुद्धीचे महाराष्ट्रीयन पोलीस?. कसली यांची तल्लख बुद्धी व सदसदविवेक? हे तर अंधश्रद्धेचे महाबळी आहेत. असे लेख वाचताना राहून राहून वाटत होते. पोलिसांच्या मानसिक कुवतीची कीव येत होती.

Tuesday, July 15, 2014

शेतक-यानो सावधान, सरकार जबरदस्तीने तुमच्या जमिनी हडपणार !

दिनांक १५.०७.२०१४ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रधानमंत्र्याकडे देण्यासाठी १९ नवीन प्रस्ताव तयार केले आहेत. या प्रस्तावानुसार सरकार पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट तसेच पूर्णत: प्रायव्हेट (खाजगी) प्रोजेक्ट करिता शेतक-यांच्या जमिनी त्यांची परवानगी न घेता सरकारकडून हस्तगत करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर खाजगी विकासक सुध्दा शेतक-यांच्या जमिनी जबरदस्तीने घेवू

Wednesday, June 18, 2014

लोकराजा शाहू महाराज

देशात व विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी महाराजानंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी राहिली असेल तर ती म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजे राजश्री शाहू महाराज होत. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या कार्यामध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राम्हणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राम्हणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर शाहू महाराज हे शिवाजी महाराजापेक्षा उजवे ठरताना दिसतात. आदिल व निजामशाही बरोबरच मोगलसाम्राटाकडून राज्य हिसकावून घेणे व ते टिकवून ठेवणे या संघर्षात शिवाजी महाराजांचा

Monday, June 2, 2014

United Nations condemns gang-rape and murder of teenage girls in Badaun, Uttar Pradesh

Statement by Lise Grande, United Nations Resident Coordinator; Dr Rebecca R Tavares, Representative, UN Women’s India Multi Country Office and Louis-Georges Arsenault, UNICEF Representative to India.
The UN in India condemns the brutal gang-rape and murder of two teenaged girls on the night of May 28 in Katra village in Uttar Pradesh’s Badaun district and calls for immediate action against the perpetrators and to address violence against women and girls across India.

Saturday, April 26, 2014

Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय

Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय: ‘ अॅनिहीलेशन    ऑफ   कास्ट ’ (जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्ह...

डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय


अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट(जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्हणजे आर्यसमाज प्रणित जातपात तोडक मंडळाचा लाहोर येथे होणा-या वार्षिक अधिवेशना करिता तयार करण्यात आलेले अध्यक्षीय भाषण होते. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम लाहोर येथील जात-पात-तोडकमंडळ करीत असे. आंबेडकरांनी अध्यक्षीय

Friday, April 18, 2014

आदिवासीयो की चुनौतिया है बेकरार (बीबीसी न्यूज) येथे क्लिक करा
दुनिया के सबसे क़ीमती बॉक्साइट भंडारों में से एक इन पहाड़ियों के नीचे दबा है और यहां के आदिवासी ज़िंदगी की बुनियादी चुनौतियों से लड़ने में ही लगे हैं.उनकी स्थानीय बोली को समझना उड़िया जानने वाले दुभाषियों के लिए भी आसान नहीं है. लेकिन उनके ख़ूबसूरत चेहरों पर आक्रोश, ग़ुस्सा और डर पढ़ने के लिए भाषा की ज़रूरत नहीं है. मैं गोर्था गांव की उस खंडहर होती इमारत के सामने खड़ा हूं, जहां स्कूल होना था, पर जहां ‘कोई मास्टर नहीं आया’ और जिसका इस्तेमाल इमली सुखाने के लिए होता है. जंगल है, हरा भरा है, पुराने पेड़ हैं, परिंदे हैं, जानवर हैं. पीने के पानी का पक्का इंतज़ाम नहीं है. बिजली के खंभे भी नहीं हैं.

Tuesday, April 15, 2014


    लोकजागर एप्रिल २०१४

डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकजागर हे ई-मासिक  प्रकाशित करण्यात आलेले आहे.बहुजनांच्या समस्या प्रखरपणे मांडणे हा या मासिकाचा मुख्य हेतू आहे. आपल्या टीका वा समर्थनार्थ प्रतिक्रिया  आवश्यक आहेत. त्या आधारावरच गरज भासल्यास  ई-मासिकाची मांडणी व त्यातील माहितीची फेरमांडणी करता येईल.वाचकांच्या सूचनांचा सन्मान करून त्याची मते प्रकाशित करण्यात येतील.

मासिक वाचण्यासाठी वरील लोकजागर एप्रिल २०१४ वर क्लिक करा 




Saturday, April 5, 2014

The Plight of Religious Freedom in India


USCIRF has been closely monitoring the situation in India. Dr. Katrina Lantos Swett, Vice Chair, United States Commission on International Religious Freedom (USCIRF) In her report she said that,
In the months leading up to India’s 2014 national elections, there has been a rise in acts of violence targeting religious minorities and an increase in discriminatory rhetoric that has polarized national politics along religious and class lines. Underlying problems have been exacerbated by the implementation of ‘Freedom of Religion Acts’ across five Indian states, which have led to higher reported incidents of intimidation, discrimination, harassment, and violence against minorities. Severe outbreaks of communal violence against religious minorities, including the 2002 Gujarat riots targeting Muslims, the 2007 mob attacks against Christians in Odisha, and the anti-Sikh riots of 1984 have socially and economically marginalized large pockets of religious minority communities. As the 2014 Indian elections draw closer, it is important to examine the implications of this polarization in the context of the US-India relationship.
For any questions, please contact the Tom Lantos Human Rights Commission at 202-225-3599 or tlhrc@mail.house.gov, or Carson Middleton (Rep. Pitts) at 202-225-2411.
James P. McGovern and Frank R. Wolf
Co-Chairs, TLHRC
                                                               Joseph R. Pitts
                                                           Executive Committee Member, TLHRC

Thursday, March 27, 2014

सत्य हे कटू असते तेच खरे .......... हिंदुइझम :अॅन आल्टरनेटिव हिस्टरी

वेडी डॅनिजर या लेखिकेचा हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी  हा ग्रंथ पेंग्विन पब्लिशर्स ने प्रकाशित केला. सदर पुस्तक म्हणजे वैदिक संस्कृत ग्रंथात लिहिल्या गेलेल्या वस्तुस्थितीदर्शक  विविध बाबीची चर्चा व त्याचे विश्लेषण होय. भारतातील ९९.९९ टक्के जनतेला संस्कृत भाषा कळत नाही. त्यामुळे सामान्य जणांना वैदिक संस्कृत ग्रंथात काय लिहिले आहे याचा थांगपत्ता लागणे कठीणच आहे. आतापर्यत संस्कृत ग्रंथातील ब्राम्हण समाजाच्या सोईचा भागच बाहेर येत असे. कारण भारतात प्रकाशक व लेखक हे त्याच समुहाचे असल्यामुळे ते संस्कृत ग्रंथातील वादग्रस्त भाग

Thursday, March 20, 2014

Good Times Are Gone [ By Romila Thapar, Outlook Magazine]

The news of the withdrawal of Wendy Doniger’s bookThe Hindus, An Alternative History, and the subsequent articles and comments on the news, make it clear that the issue is not confined to just the action against this book but has relevance to other aspects in contemporary Indian life. The immediate concern is that of the relationship between authors and publishers. There was a time when publishers closely followed the work of their authors and the implications of what they were publishing. Today perhaps only a few publishers, often only the small and private ones, have such concerns. International publishing houses, or even national ones with an extensive reach, do not always know their authors that well, so invariably they are not too sensitive to the political und­er­currents of the societies where their books sell. Still, the demand for banning a book

Saturday, March 8, 2014

The Doctor and the Saint By Arundhati Roy

ANNIHILATION OF CASTE is the nearly eighty-year-old text of a speech that was never delivered.* When I first read it I felt as though somebody had walked into a dim room and opened the windows. Reading Dr Bhimrao Ramji Ambedkar bridges the gap between what most Indians are schooled to believe in and the reality we experience every day of our lives.
My father was a Hindu, a Brahmo. I never met him until I was an adult. I grew up with my mother, in a Syrian Christian family in Ayemenem, a small village in communist-ruled Kerala. And yet all around me were the fissures and cracks of caste. Ayemenem had its own separate “Parayan” church where “Parayan” priests preached to an “untouchable” congregation. Caste was implied in peoples’ names, in the way people referred to each other, in the work they did, in the clothes they wore, in the marriages that were arranged,

Tuesday, February 25, 2014

बिन पेंदो के लोटे उदित राज, रामविलास पासवान और रामदास आठवले


जस्टिस पार्टी के नेता उदित राज इनके भारतीय जनता पार्टी प्रवेश करने तथा संघ परिवार के सामने घुटने टेकने की खबर मिली साथ ही रामविलास पासवान की भाजपा के राजकीय अखाड़े में जा मिलने और साथ में युती करने खबर ने और चौका दिया ये दोनों खबरे चौखा देने वाली थी क्योकि ये दोनों तत्वों की और संघ के हिन्दुवाद को लताडने की बात करनेवाले नेता लगते थे महाराष्ट्र में रामदास आठवले के शिवसेना और भाजपा के साथ जाने से और दोस्ती करने से मुझे कोई ताज्जुब नहीं लगा क्योकि रामदास आठवले हमेशाही अवसरवादी रहा है  आंबेडकरवाद आठवले के भेजे में ना कभी गया था, ना कभी जाएगा  वह तो सिर्फ सत्ताधारियोका खिलोना है ये लोग दलित समाज के वोटो के सिर्फ दलाल है और उससे ज्यादा कुछ नहीं

Saturday, February 22, 2014

आरक्षण व काही प्रश्न

राहुल गांधी सध्या जाहीरनाम्यासाठी कांग्रेसी नेत्याकडून जाहीर सूचना मागवीत आहेत. त्या जाहीर सूचनांचा भाग म्हणून कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी कांग्रेस पक्षाने आता जातीं आधारित राखीव जागांऐवजी आर्थिक दुर्बलतेच्या आधारे आरक्षणाच्या तरतुदीचा पुरस्कार करावा अशी मागणी पक्षाकडे केली. जनार्दन द्विवेदी हे सोनिया व राहुल गांधी यांच्या अंतस्थ गटातील समजले जातात. त्यामुळे कांग्रेसने जाणीवपूर्वक जनार्दन द्विवेदीच्या माध्यमातून जाती आधारित आरक्षण समाप्त करून आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करने हे कांग्रेसचे अंतस्थ  राजकीय मनसुबे आहेत हे स्पष्ट होते. जनार्दन द्विवेदीच्या