Saturday, April 30, 2016

शक्ती, प्रतिष्ठा व लालसा: एक अन्योन्य सबंध

प्रतिष्ठा कुणाला हवी नसते. प्रतिष्ठेसाठी मानवी मन तर हपापलेलेच असते. व्यक्तीगत पातळीवर  प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून भौतिक जीवनात अनेक तडजोडी केल्या जातात. अशा तडजोडी बहुतेकदा स्वत:च्या तत्वाच्या विरोधात असतात. तरीही प्रतिष्ठे साठी अशा तडजोडी केल्या जातात. म्हणून प्रतिष्ठेचा पहिला बळी म्हणून “तत्वाकडे” बघितल्या जाते. जो तत्वाला बाजूला सारून प्रतिष्ठेसाठी तडजोडी करतो त्याला अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते. लाचार होवून मिळविलेली प्रतिष्ठा हि पदाचे वलय असेपर्यंत चमकत असते. परंतु जी व्यक्ती ‘तत्वाला’ आपला अलंकार समझते व तत्वाप्रमाणे कार्यप्रवण करीत असते अशा व्यक्तीला प्रतिष्ठा मिळत नाही काय? एकार्थाने अशा व्यक्तींना भौतिक प्रतिष्ठेची गरजच नसते. पदांची लालसा हि त्यांच्यासाठी गौण असते. कारण अशा व्यक्तीकडे समाजातील प्रत्येक वर्ग व व्यक्ती आदरानेच बघत असतो. ते त्यांना ठायी ठायी सन्मान व प्रतिष्ठा देत असतात.

शक्ती माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देत असते. ह्या शक्तीचे अनेक रूप असतात. एखाद्यानी विशिष्ठ  क्षेत्रात आपल्या ज्ञानाच्या बळावर केलेल्या अतिउच्च कामगिरीकडे बघून समाज त्यांना सन्मान देत असतोच. मग तो विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा वैज्ञानिक असो किंवा मानवतेच्या सन्मानासाठी जीवन व्यतीत करणारा एखादा समाजसेवी. व्यक्ती अनुषंगाने असी प्रतिष्ठा मिळत असली तरी समूहा संदर्भात हि बाब लागू होत नाही. भारतासारख्या जातीय व वर्णव्यवस्थेची मूळ खोलवर रुजलेल्या समाजात खालच्या स्तरात असलेल्या समूहाला सामाजिक व धार्मिक प्रतिष्ठा मिळणे फार कठीण असते. अशांना प्रतिष्ठेसाठी झगडावे लागते. समान न्यायाची मागणी करावी लागते. आपल्या हक्क व अधिकारासाठी सतत संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष पिढ्यानपिढ्याचा असतो.

हजारो वर्षाच्या धर्मशास्त्रीय परंपरेने मिळालेल्या सन्मानाला, प्रतीष्ठेला व संपत्तीला काहीजण आपला जन्म सिद्ध हक्क समजत असतात. आपले हे उभे असलेले साम्राज्य दुसऱ्याच्या शोषणावर व धर्मशास्त्राच्या फसवनुकीची निष्पत्ती आहे याची जाणीव करून दिली तरी ते सत्य स्वीकारायला तयार होत नसतात. त्या अनुषंगाने काही उदाहरणे बघता येईल. भारतात तोंडातोंडी व कागदोपत्री स्त्रीशक्तीचा फार मोठा गाजावाजा केला जातो. परंतु व्यवहारात हे कुचकामीच असते. कोल्हापूरची अंबाबाई हि स्त्रि परंतु तिच्या गाभार्यात पुरुषाची मक्तेदारी. स्त्रियांना प्रवेशास बंदी. या देवीला स्त्रीऐवजी ब्राम्हण पुरुष साडी नेसवतो, तिची आंघोळ घालतो. मग अंबाबाईच्या अंतरंगीय अवयवाचे काय? तेव्हा भट ब्राम्हण आपले डोळे बंद करून ठेवत असतील काय?. या भटांना थोडीशीही लाज व शरम उरलेली नसते. परंपरेने भारतातील स्त्रिया म्हणजे मुकी जनावरेच असतात. कारण परंपरा व रीतीरिवाजासंदर्भात प्रश्न किंवा प्रतिप्रश्न करायचे म्हटले कि या स्त्रियांचे हातपाय लुळे पांगळे होवून थरथर कापीत असतात. मग ती स्त्रि कितीही उच्च पदावर असली तरी परंपरा व प्रथेसाठी लाचार होवून आपली प्रतिष्ठा व शक्ती हरवून बसत असते. येथे तीला आपल्या बुद्धीचातुर्य व तर्काचा वापर करण्यास भीती वाटत असते.

“स्त्रीशक्ती” ह्या शब्दाला एक अर्थ देत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देवस्थानाचा मलिंदा खाणाऱ्या टग्यांना चांगलाच हिसका दाखविला आहे. स्त्रीच्या खऱ्या शक्तीचे बळ, एकता व हिंमत दाखवून धर्माच्या ठेकेदाराकडून परंपरेने हिसकावलेले मूर्ती दर्शनाचे हक्क काही अंशी परत मिळविलेले दिसते. तृप्ती देसाई व तिच्या भूमाता ब्रिगेड समोर अनेक सामाजिक व धार्मिक हक्कासबंधीचे प्रश्न उभे असतील. त्यापैकी भूमाता ब्रिगेडने पुढील विषय हाताळले पाहिजे. त्यांनी देशात साधूचे वेश धारण केलेल्या नंग्या व विभित्स साधूना कुंभ व सिहस्थ मेळाव्या सारख्या धार्मिक महोत्सवात फिरण्यास बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे. हे नागडे साधू कुंभ व सिहस्थ मेळ्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त फिरत असतात. धर्मभोळ्या स्त्रिया या नागड्या साधूच्या दर्शनासाठी रांगा लावतात. हे नंगे साधू स्त्रियांकडे बघत अश्लीलतेचे हावभाव करीत असतात. हे विभित्स प्रकार रोखण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांनी व न्यायव्यवस्थेने घेतली पाहिजे. दुसरा शंकराचार्याच्या चार पीठांपैकी दोन पीठ स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करून त्यासाठी जनआंदोलनाची दिशा ठरविली पाहिजे. त्यानिमित्ताने सांस्कृतीकरणाचा बुरखा पांघरलेल्या संघाचा (आर एस एस) खरा चेहरा तरी कळेल!

शक्ती हि सांघिक स्वरूपाची असली पाहिजेत व तिला समुहाचा पाठिंबा असावा लागतो. भारतीय जनमाणसांच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास अधिकाधिक भारतीयांना आपल्या हक्क व अधिकारांचे मर्मच समजलेले दिसत नाही. त्याला शोषाकाची शोषणवृत्ती दिसत नाही. त्यामुळे शक्ती असूनही ते प्रतीष्ठाहीन झालेले आहेत. आपल्या उन्नतीचा चाबूक त्यांना अजूनही शोधता येत नाही. भारतात मागासवर्गीयांतील ओबीसी समूह हा लोकसंख्येचा फार मोठा घटक आहे. परंतु या घटकाला आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव  नसल्यामुळे तो कधीच संघर्षरत नसतो. याचे कारण त्यांच्यात असलेल्या सामाजिक जबाबदारीच्या उणीवात शोधता येते. व्यक्तिगत पातळीवर पाटीलकीच्या प्रतिष्ठेपुरते ते सीमित असतानाच  धर्माच्या कर्मकांडात आहुती देण्यास सदैव तैयार असतात. तथाकथित धर्मात आपले स्थान तरी कोणते आहे? या धर्मशास्त्रात आपल्याविषयी लिहिले तरी काय? याचा विचारही डोक्यात येत नसतो. जागरूकता व तर्काच्या अभावामुळे हे तर होतच असते परंतु बुद्धिवाद व सदसद्विवेकाची उणीव असलेल्या  विद्वानाची निष्क्रियता त्यास अधिक कारणीभूत असते. त्यामुळे ह्या समाजाला नागरिक प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसत नाही. संसदेतील ओबीसी संख्या व त्यांच्या राजकीय नेत्यांचे बळ मोठे असले तरी ते जातीय जनगणना व शिक्षणाच्या मुद्यावर लढू शकत नाहीत. “ज्यांची संख्या जास्त तितकीच त्यांची हिस्सेदारी” हा सिद्धांतही ते प्रगटपणे मांडू शकत नाहीत. म्हणून ते केवळ २७ टक्क्यापर्यंत सीमित झाले आहेत. हा शक्तिहीन सामुहिक मानसिकतेच्या गुलामीचा परिणाम वाटतो. तो धर्मशास्त्रीय गुलामीचा परिपाक आहे. त्यामुळेच शंकराचार्याच्या चार पीठांपैकी किमान एका पिठावर सुध्दा ते आपला हक्क सांगू शकत नाहीत. हक्क व अधिकार मिळविण्याची उमेद अजूनही निर्माण झाली नाही. एवढेच नव्हे तर अजागरुकतेमुळे वर्णव्यवस्थेतील बहुसंख्यीय शुद्र समाजात “ओबीसी” ह्या संकल्पनेणेही मूळ धरले नाही.

वरील मुद्दा अनुसूचित जाती व जमातीच्या संदर्भातही लागू होतो. जिथे शक्ती व स्वाभिमान नाही तिथे लाचारीचा उगम होत असतोच. राजकीय नेतेपदाच्या व खोट्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जाती/जमातीचे नेते पूर्णत: लाचार झालेले दिसतात. आपल्या आदर्श नेत्याच्या तत्वाला पायदळी तुडविन्यात या समुहाचा व त्यांच्या नेत्यांची कोण बरोबरी करू शकेल?. सांघिक शक्तीचा पूर्ण अभाव असलेल्या समाजाची सामाजिक प्रतिष्ठा हि शुण्यवतच असते. आदर्श नेत्याचे केवळ उत्सव साजरे करीत त्यातून सांघीकपणा दाखविण्याचा  फोलपणा अनेकदा सिद्ध झाला आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात  जगजीवनराम प्रवृत्तीच्या चमचेगीरीचा मोठ्या प्रमाणात उदय झाला आहे. म्हणूनच मुठभर ६ टक्क्याच्या समुहात अर्धशतकीय राजकीय पार्ट्या व तेवढ्याच सामाजिक संघटनांचे पेव फुटलेले आढळते. हाच तर आहे पराभवाचा डोझीयर. मग विजय कुठून प्राप्त होणार? त्यामुळे केवळ विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापुर्ती असलेल्या चळवळीचे भविष्य म्हणजे  वर्षोनुवर्षे चालत आलेल्या गुलामीबरोबर पुढेही चालत राहण्याची “न संपणारी क्रिया” असेच म्हणावे लागेल.

भारतात शक्तीच्या स्वरूपाचा विचार केल्यास ‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ’ ह्या संघटनेचे नाव चटकन समोर येते. प्रबळ तत्वनिष्ठा व कठोरतेच्या बळावर या संघीय शक्तीने देशाच्या संपूर्ण व्यवस्थेवर विळखा घातला आहे. अर्थव्यवस्था, इतिहास, राजकीय सत्ता, शैक्षणिक क्षेत्र व धर्मव्यवस्था या सर्व क्षेत्रात आपल्याला हवे ते बदल घडवून आणताहेत. अनेकांना गिळंकृत करण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे. सांघिक शक्ती व तत्वाला इमान राहण्याच्या प्रवृत्तीमुळे संघाला एवढे बळ प्राप्त झाले आहे. संघाला जनमानसात प्रतिष्ठा प्राप्त झाली नसली तरी प्रशासकीय व्यवस्थेत तिचा दबदबा निर्माण झाला आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास केवळ ५ टक्के अल्पसंख्य ब्राम्हण समाजाच्या संघाने हिंदुत्व व धर्माचा आधार घेत बहुसंख्य जनतेला आपल्या प्रभावाखाली ओढले आहे. कम्युनिस्ट विचारधारा जनमानसाच्या मनातून नष्ट करण्यात ते यशस्वी होवून गोबेल्स नीतीचा वापर करीत कांग्रेस पक्षाचे महत्व कमी करण्याचा एजंडा ते राबवीत आहेत. संघाच्या या सांघिक शक्तीचे बळ आता त्यांच्या विरोधकानाही मान्य करून त्यातून त्यांना बरेच काही शिकण्यासारखे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्याची ताकद ज्या विचारधारेत आहे असे म्हटले जाते त्या विचारधारेचे वाहक म्हणविणार्याची आजची अवस्था बघितली तर संघाच्या मुसंडीला कोणीही रोखू शकणार नाही हे स्पष्ट आहे. मुसलमानांना टार्गेट करून हिंदू एकता प्रबळ करायची, एकदा मुस्लीमांचे नामोहरम झाले कि घटनेला बाद करून हिंदू समाजावर मनुस्मृती लादायची हा संघाचा डाव आहे. अशा अवस्थेमध्ये भविष्यकाळात संघाची शक्ती या देशाला सिरीया, इराक, इजिप्त किंवा अफगाणिस्थानच्या वाटेने नेल्याशिवाय राहणार नाही याची साशंकता अधिकच बळावत आहे. मात्र आपल्या वर्चस्ववादी उद्दिष्टपूर्तीच्या लालसेसाठी खोटेपणाच्या प्रमेयावर शक्ती निर्माण करून तीचा स्फोट घडविल्यास स्वत:चेही मरण त्याच स्फोटात होवू शकते याचे भान राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाने ठेवले पाहिजेत.


बापू राऊत
९२२४३४३४६४
E mail:bapumraut@gmail.com

4 comments:

  1. खुप छान लेख आहे.
    धन्यवाद जयभिम

    ReplyDelete
  2. are baitada, tuzya mendual naru rog zala aahe, kutrache sheput jase 10 varshe pipemadhe thevle tari vakde rahanr tasa tuza swabhav aahe.
    hindu lokana shivya dilya shivay tula jevan pan pachat nasel.
    tuzya sarkhya nalayak mule dalit lokabaddal vait mat nirman hote. jatipatiche vishari fal tu lokamadhe pasravit aahet. babasahebchya naval tu kalmia fasla aahes. thu tuzyavr. khara aambedakri tula kadhich maf karnar nahi.
    baitad kuthla.

    ReplyDelete
  3. kolhapuri missal khanar ka?


    ReplyDelete