Friday, May 13, 2016

तृप्ती देसाई यांचे आंदोलन व काही अनुत्तरीत प्रश्न

भारतात हिंदू धर्मातील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला होणारा विरोध हि काही नवीन बाब नाही. वेद काळापासून सुरु झालेले मानवी अवमूल्यन व्हाया पुराणे ते मनुस्मृतीच्या काळापर्यंत अधिक वेगाने झाले. मनुने आपले स्वत:चे कडक कायदे बनवून समाजव्यवस्थेवर बळजबरीने लादले. वेद, पुराणे व स्मुर्त्याचा धर्मशास्त्रे म्हणून गौरव करण्यात आला. या वैदिक धर्मशास्त्रानुसार (आता हिंदू धर्म व त्याची धर्मशास्त्रे असे नामकरण) स्त्रियाना अस्पृश्य, विटाळलेल्या व खालच्या दर्जाच्या मानल्या गेल्या. त्यांच्या स्पर्शाने देव व मंदिरांचे भंजन होते. देव बाटतात म्हणून स्त्रियांना हजारो वर्षापासून मंदिर प्रवेश व शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले होते. काळ बदलला, मनुस्मृती बाद होवून भारतीय राज्यघटनेचे कायदे लागू झाले तरीही धर्माचा धंदा करणाऱ्यांनी स्वत:ला त्या कुजक्या  धर्मशास्त्राच्या पानातच बंदिस्त करून ठेवल्याचे दिसते.

Thursday, May 5, 2016

"सैराट" च्या निमित्ताने

वेगवेगळ्या माध्यमात “सैराट” बद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे नागराज मंजुळेकृत “सैराट” लवकरात लवकर बघितलाच पाहिजे असे झाले होते. खरे तर नागराज मंजुळेने “सैराट”च्या माध्यमातून समाजातील ‘वास्तव चित्र’ रेखाटले आहे. देशाच्या ग्रामीण भागात जातीय मानसिकता कशी कार्यरत आहे हे वास्तव समोर तर येतेच पण त्याही पेक्षा ग्रामीण भागातील ‘आर्थिक विषमतेचे’ भयानक चित्र उभे राहते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या जातीय घटनांचा अनुबंध असल्याची अनुभूती सैराटचे कथानक बघितल्यानंतर येते.