Saturday, September 10, 2016

“अविवेकी” कोपर्डी आंदोलन

सध्या कोपर्डी गावात घडलेल्या “बलात्कार व खुन” प्रकरणाच्या निषेधाचे पेव जिकडे तिकडे उठू लागलेले दिसतात. असा निषेध होणे ही आवश्यक बाब झाली असून ती स्वागतार्हच आहे. कोपर्डीत जेव्हा बलात्कार व खुनाची घटना घडली त्याच काळात नवी मुंबईतील नेरूळ येथे प्रेमप्रकरणात स्वप्नील शिंदे या दलित तरुणाला जिवंत मारण्यात आले होते. बलात्कारी व्यक्ती वा खुनी हा कोणत्याही समूहाचा असो त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. याउलट गुन्हेगाराला शिक्षा करण्यात कायदा कमी पडत असेल तर कायद्यात सुधारना करून अशा व्यक्तीना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. परंतु ज्याप्रकारे कोपर्डीकांडाचे सादरीकरण चालू आहे ते बघितल्यास कोपर्डी आंदोलन म्हणजे अविवेकाच्या नव्या शोधासारखेच वाटायला लागले आहे. कोपर्डीचे प्रकरण काय होते? आणि आता आंदोलन कशासाठी चालू आहेत? हे बघितले की या आंदोलनाचा, आंदोलनकर्त्या नेत्यांचा व आंदोलनात सहभागी झालेल्या समूहाचा अविवेकीपणा स्पष्ट होतो.