Saturday, December 28, 2019

वढू बद्रुक ते भीमा कोरेगाव


वढू बद्रुक हे पुणे जिल्ह्यातील एक गाव. भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव साधेसुधे नसून त्याला इतिहासाची मोठी झालर आहे. शूरविर राजे संभाजी व स्वामिनिष्ठ असलेला गणपत गोपाळ गायकवाड या दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांची समाधीस्थळ असलेल हे गाव. एक राजा तर दूसरा आपल्या राजनिष्ठेवर प्रगाढ विश्वास ठेवणार्‍या प्रजेचा घटक. असे हे गाव २०१७ साली अचानक प्रकाशझोतात आले, ते १ जानेवारी २०१७ रोजी भीमा कोरेगावला झालेल्या हिंसक दंगलीमुळे. त्या आधीच गावातील वातावरण गावाबाहेरच्या लोकांनी येवून सतत धुमसत ठेवलं होत. केवळ त्याचा विस्फोट व्हायच बाकी होत.