Superstition

WEBSITES

अंधश्रद्धा निर्मुलन समिती वेबसाईट ( नरेंद्र दाभोळकर)

अंधश्रद्धा निर्मुलन समिती वेबसाईट (श्याम मानव)

Religion is a stumbling block to progress (Front line)
In the name of faith
Thriving business
Suspension of disbelief
We cant claiml this
Fewer rational thinkers today’
Promote scientific temper’
Political patrons
Reason for optimism’
Asaram’s empire
Legal challenge

घटनेच्या मंदिरातील बडवे!
दुष्काळातही देहूत भक्ताचा महापूर (सकाळ, ३०.०३.२०१३)
शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी पाच जणांनी कवटाळले मृत्यूला!(लोकमत ३०.०३.२०१३)

अैसे कैसे झाले भोंदू? डॉ. नरेंद्र दाभोलकr(lokprabha)

नाशिक जिल्ह्यात मंदिरात चोरी; दागिने लंपास :sakal 23.01.2013
माया कॅलेंडर
रूढींचा विळखा; मतलबांचा उदोउदो आपल्याकडे तीर्थस्थळांची कमी नाही. अनेक देवस्थानं आज पैशांच्या श्रीमंतीने राष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली आहेत. तथापि देवीची तीर्थस्थळं असलेली ठिकाणं काहीशी दुर्लक्षिली गेलेली दिसतात. तिथल्या अनिष्ट रूढी-परंपरांचा विळखाही काळ बदलला तरी अद्याप सुटायला मागत नाही.(पुढे वाचा )
सत्य हा निरीक्षरावादाचा कणा
भोंदू भगवान भोळे भक्त  (लोकसत्ता:दी.२३.११.२०१४)
श्रद्धेच्या बाजारीकरणाला राजकारण्याची साथ
ऐसे कैसे संत जहाले?



आता दत्तमूर्तीही चोरली
पुरातन मंदिरासह पाच दानपेट्या फोडल्या
दिवेआगरच्या सुवर्णगणेशाची मूर्ती अद्याप सापडली नसताना पालशेतच्या पुरातन मंदिरातील चांदीची दत्तमूर्ती चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढय़ावरच न थांबता चोरट्यांनी येथील तब्बल पाच मंदिरांतील दानपेट्या फोडल्या आहेत. श्रावणात भाविकांचा देवधर्म करण्याचा वाढता ओघ पाहून चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य बनविल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
पालशेत येथील दत्तमंदिर पुरातन काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लोकवस्तीपासून दूर असलेल्या या मंदिराच्या गाभार्‍याच्या उत्तरेकडील दरवाजाची कडी व लोखंडी शिगा हेक्सॉब्लेडने कापून चोर मंदिरात गेले. दत्तात्रयांच्या पाषाणमूर्तीसमोरील एक किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि दानपेटीसह त्यांनी येथून पळ काढला आहे. चांदीची ही मूर्ती दरवर्षी मिरवणुकीप्रसंगी रथात ठेवली जाते, चोरांनी याच परिसरातील हनुमान, गणपती, रेणुकामाता या मंदिरांतील तसेच बाळोजी महाराज समाधी येथील दानपेट्याही फोडल्या आहेत. या दानपेट्यांतील किमान पाच हजारांची रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद विश्‍वस्तांनी दिली आहे. मूर्तीसह हा ४५ हजारांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेशाची चोरी ताजी असतानाच आता रत्नागिरीतही देवदेवतांच्या मूर्ती चोरीस जाऊ लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारनंतर श्‍वानपथक व ठसेतज्ञांना बोलावले होते. येथून जवळच असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी श्‍वान घुटमळल्यामुळे येथील साहित्याचा वापर मंदिराचा दरवाजा फोडण्यासाठी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

देव : सखा की बागुलबुवा?
शिर्डीहून हैदराबादला परतणारी बस कोसळून ३२ भाविक ठार
(16-06-2012 : 08:13:44)  Share5
ऑनलाइन टीम (लोकमत)
उस्मानाबाद, दि. १६ - शिर्डीहून हैदराबादला परतणारी बस पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात ३२ भाविक ठार तर २० जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला.
हे भाविक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन हैदराबादला परत येत असताना पहाटे अडीचच्या सुमारास ही बस नळदुर्ग पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात ३२ भाविक ठार झाले असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरण कुमार यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पोलिस आणि शासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताची पुढील चौकशी करण्यात येत आहेत
तुर्केवाडीत देवीच्या रथयात्रेत ३ ठार
रथाचा दोरखंड तुटला; चौघे गंभीर (lokmat dated 24.05.2012)
चंदगड। दि. २३ (प्रतिनिधी)
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत देवीचा रथ ओढतेवेळी दोरखंड तुटून रथाची चाके अंगावरून गेल्याने दोघे जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले असून १५ ते २0 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
विठ्ठल दत्तू चव्हाण (३२), चाळोबा आत्माराम चव्हाण (४२, दोघेही रा. मुरकुटेवाडी) व सुभाष जोतिबा ओऊळकर (२८, रा. तुर्केवाडी) अशी मृतांची नावे असून संभाजी बुधाजी मुरकुटे (मुरकुटेवाडी), मधुकर गणपती हलकर्णीकर, पुंडलिक निंगू गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
तुर्केवाडीसह मुरकुटेवाडी, यशवंतनगर, वैताकवाडी या चार गावांची ही लक्ष्मी यात्रा दर ११ वर्षांनी २२ ते २९ मे दरम्यान होते. सकाळी तुर्केवाडीतील झेंडा चौकात रंजन बांदिवडेकर यांच्या घरासमोर देवीला गार्‍हाणे घालून रथ ओढत लक्ष्मीची संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाणार होती. पहिल्या पाच मिनिटांतच रथाच्या दोन्ही बाजूंनी रथ आपल्या दिशेने ओढण्याचा जोरदार प्रयत्न ग्रामस्थांनी केली. या वेळी दोरखंड तुटून विठ्ठल चव्हाण यांच्या मानेवरून, तर चव्हाण यांच्या छातीवरून रथाचे चाक गेले.
     


सायन कोळीवाड्यातील मरिअम्मा मंदिरात दागिन्यांची चोरी
मुंबई। दि. २३.04.2012 LOKMAT (प्रतिनिधी)
मंदिरातील चोर्‍यांचे सत्र सुरूच असून काल मध्यरात्री सायन कोळीवाड्यातील मरिअम्मा मंदिरातील देवीचे दागिने व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी हडप केली.
पोलिसांनी दिवसभर शोध घेऊनही त्यांना चोरट्याचा थांगपत्ता लावता आलेला नाही. विशेष म्हणजे सध्या मरिअम्मा देवीच्या यात्रेचा काळ सुरू असल्याने भाविकांत या घटनेमुळे नाराजी व्यक्त होत आहे. सायन कोळीवाड्यातील सरदारनगरातील बिल्डिंग क्र. ३च्या मागे मरिअम्मा मंदिर आहे. काल रात्री साडेदहा ते सकाळी आठच्या दरम्यान चोरट्याने मंदिराच्या मागील दरवाजाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि देवीच्या अंगावरील १0 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व दानपेटीतील २0 हजार रुपये पळवून नेले. सकाळी मंदिराचे विश्‍वस्त राजा देवेद्र मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने सायन कोळीवाडा पोलिसांना कळविले. राज्यात २00८पासून ते जानेवारी २0१२पर्यंत विविध ठिकाणच्या १,३४१ मंदिरांत चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या ठिकाणाहून तब्बल एक कोटी ९३ लाख ५५,९३0 रुपयांचा ऐवज पळविला आहे. पोलिसांना त्यापैकी ३९४ घटनांचा तपास करण्यात यश आले आहे. चोरीला गेल्यापैकी २८ लाख ३८ हजार ७८६ रुपयांचा ऐवज वसूल करता आला आहे.
अंबाजोगाईच्या मंदिरात चोरी
३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने लंपास, चार ठिकाणची कुलुपे तोडली
अंबाजोगाई दि. १८ (वार्ताहर)
दिवेआगारच्या सोन्याची गणपतीची मूर्ती चोरीचा छडा अजून लागला नसतानाच श्री योगेश्‍वरी देवीच्या मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झालेल्या चोरीत देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोन्याचे व तीन किलो चांदीचे दागिने तीन चोरट्यांनी नेले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अंबाजोगाईकरांनी शहरात कडकडीत बंद पाळून निषेध केला. घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
बुधवारी पहाटे अडीचच्या नंतर मंदिरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळच्या ग्रीलच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले. गाभार्‍यात प्रवेश करून देवीचा तांदळा (मूर्ती) असलेल्या जाळीचे कुलूप तोडले.
देवीच्या अंगावर असलेले सोन्याचे डोळे, मुख, चंद्रकोर, सरपाळे, बिंदी, कर्णफुले तर चांदीची कमान, मूर्तीवर असलेली मोठी छत्री, दोन्ही बाजूचे झेंडे, केवड्याची पाने व इतर साहित्य असे ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने घेऊन तीन चोरटे पळून जात असल्याचे मंदिरात झोपलेल्या व्यक्तीला दिसून आले. या चोरांनी तोंडावर रूमाल व अंगात बनियान घातली होती. मंदिरात असलेल्या या व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर पहाटे चार वाजता पोलीस मंदिरात पोहोचले.
चोरी झाल्याची माहिती पोलिसांना समजताच चोरांच्या शोधासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता बीड येथील श्‍वानपथक अंबाजोगाईत दाखल झाले. कुत्र्याने मंदिरापासून दीड कि. मी. अंतरावर चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन फूट लांबीची लोखंडी टॉमी, चांदीचे दागिने बसवलेली कमान, दागिन्यांना चिकटलेले शेंदुराचे तुकडे असे साहित्य पोलिसांना सापडले. पोलिसांनी हे सर्व साहित्य हस्तगत केले.
प्रकरणी मंदिराचे पुजारी सारंग अरुणराव पुजारी यांच्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. योगेश्‍वरी देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरांनी लंपास केल्यानंतर मूर्तीची दुसर्‍या दागिन्यांनी सजावट केली. विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाल्यानंतर बुधवारी सकाळी औरंगाबाद येथील विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अंबाजोगाईत घटनास्थळाला भेट दिली. चोरीच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

निर्मल बाबा का 'सेंसेक्स' धड़ाम, आमदनी घटी

नई दिल्ली/इंटरनेट डेस्क
Story Update : Saturday, April 14, 2012    9:34 AM
I did not claim miracles Nirmal Baba
पिछले कुछ दिनों से मीडिया में सुर्खियां बटोर रहे निर्मल बाबा उर्फ निर्मल जीत सिंह नरूला की आमदनी का ग्राफ तेजी से गिरा है। निर्मल दरबार के नाम से आईसीआईसीआई बैंक में खुले खाते में शुक्रवार को महज 34 लाख रुपये जमा किए गए। पहले इस अकाउंट में रोजाना करीब एक करोड़ रुपए जमा होते थे। इस खाते में हर दिन औसतन चार से साढ़े चार हजार लोग राशि जमा कर रहे थे, लेकिन शुक्रवार शाम यह तादाद घटकर 1800 रह गई।

बाबा के खिलाफ विरोध-प्रदर्शन
देश के कई इलाकों में बाबा के खिलाफ विरोध-प्रदर्शन भी शुरू हो गया है। नागपुर में अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति ने निर्मल बाबा के खिलाफ प्रदर्शन किया। संगठन के कार्याध्यक्ष उमेश चौबे और महासचिव हरीश देशमुख के नेतृत्व में मोर्चा निकाला गया। इन लोगों ने केंद्र सरकार से मांग की कि निर्मल बाबा के विरुद्ध धोखाधड़ी का मुकदमा चलाया जाए।

मैंने कभी चमत्कार का दावा नहीं किया
इससे पहले बाबा ने साफ किया कि उन्होंने कभी चमत्कार का दावा नहीं किया है। एक निजी टीवी चैनल से बातचीत में उन्होंने कहा कि मुझपर भगवान की कृपा है और इसी के बदौलत वे भक्तों की समस्याएं दूर करते हैं।

अंधविश्‍वास तोड़ने का काम किया
निर्मल बाबा का कहना है कि मैंने हमेशा शक्ति और कर्म को बढ़ावा दिया है। मेरे साथ लोग श्रद्धा और विश्वास से जुड़े हैं। इसके अलावा मैंने अंधविश्‍वास तोड़ने का काम किया है। साथ ही धार्मिक मान्‍यताओं का ध्यान रखा है। मुझसे जुड़े लोगों ने हमेशा खुद में एक शक्ति का अहसास किया है।

बाबा का सालाना टर्नओवर 238 करोड़ रुपए का
इंटरव्यू में निर्मल बाबा ने माना कि उनका सालाना टर्नओवर 238 करोड़ रुपए का है। सरकार को वे हर एक रुपए पर आयकर भरते हैं। उन्होंने कभी भी तंत्र मंत्र करने की सलाह नहीं दी, बल्कि अंधविश्वास को तोड़ने का काम किया है।

बाबा का निजी बैंक खाता भी?
इधर एक अखबार में छपी खबर के मुताबिक निर्मल बाबा के दो खाते हैं। एक निर्मल दरबार के नाम से (जिसका नंबर टेलीविजन पर चलता रहता है) और दूसरा निर्मल जीत सिंह नरूला के नाम। इस खाते का नंबर है 1546000102129694। हैरत की बात यह है कि यह बैंक अकाउंट नंबर टीवी पर नहीं दिखाया जाता।

इसमें दावा किया गया है कि इस खाते में 4 जनवरी 2012 से 13 अप्रैल 2012 के बीच 123 करोड़ (कुल 1,23,02,43,974) रुपए जमा कराए गए।
वेदमाताची दानपेटी पळविली(lokmat 11.04.2012)
>त्न/> रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेशाच्या चोरीचे प्रकरण सुरू असताना कर्जत शहराच्या टेकडीवरील वेदमाता मंदिरात उत्सव झाल्यानंतर चोरी झाली. यंदाच्या वेदमाता देवीच्या उत्सवाला सुमारे आठशे भाविक आले होते. उत्सवानंतर दोनच दिवसांनी रात्री चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे ग्रील्स तोडून मंदिरात प्रवेश केला व देवीसमोरील दानपेटी फोडून तीन हजार रुपयांची रोख रक्कम पळवली.
पुन्हा मंदिरावर दरोडा
भांडुपमध्ये साईमंदिरातील दानपेटीवर डल्ला
मुंबई। दि. ३/04/2012 (प्रतिनिधी)
दिवेआगर, शिर्डीपाठोपाठ काल मध्यरात्री चोरट्यांनी भांडुपच्या भरवस्तीतल्या साईमंदिरातील दानपेटीवर हात साफ केला.
चोरी झालेले साईमंदिर भांडुप पूर्वकडील साईबाबा नगरात आहे. मंदिराभोवती वस्ती आहे. शेवटच्या लोकलने घरी परतणार्‍या नोकरदार मंडळींची मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वर्दळ असते. तर पहाटे साडेचारच्या सुमारास हारवाला येऊन मंदिरात हार ठेवून निघून जातो. याच हारवाल्याने मंदिराचे दार उघडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. विश्‍वस्त नंदकिशोर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची दानपेटी चार महिन्यांमधून एकदा उघडली जाते आणि त्यातील दानाची मोजदाद होते. आज ही पेटी उघडली जाणार होती. दानपेटीत ५0 ते ६0 हजारांच्या आसपास रोख रक्कम असावी, असा अंदाज साहाय्यक आयुक्त विलास मराठे यांनी व्यक्त केला. ■ दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाने याच मंदिराच्या दरवाजाचे गज वाकवून आत प्रवेश केला आणि चांदीचा नाग पळविला होता. पुढे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
■ दहा वर्षांपूर्वी हेच मंदिर फोडून चोरट्यांनी ४0 हजार रोख असलेली दानपेटी लांबविली होती. कल्याणमध्येही दोन मंदिरे फोडली
कल्याण - येथील पश्‍चिमेकडील टावरीपाडा परिसरात गणपती मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर अशी २ मंदिरे असून, या मंदिरातील दानपेट्या लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली. गणपती मंदिराच्या दानपेटीत आणि राधाकृष्ण मंदिराच्या दानपेटीत प्रत्येकी ३ हजार ५00 रुपयांची रोकड होती.
चोरांनी देव लुटला! (lokmat 25/03/2012)
दिवेआगरच्या प्राचीन सुवर्णगणेश मूर्तीची चोरी
अलिबाग/श्रीवर्धन। दि. २४ (प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या प्रसिद्ध सुवर्णगणेश मंदिरात शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हैदोस घालून २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गणेशभक्तांच्या o्रद्धेवरच दरोडा असल्याची भावना असून, परिसरात दहशत आहे.
रात्री दरोडेखोरांनी सुवर्णगणेश मंदिराच्या मागच्या बाजूने छपराची कौले काढून मंदिरात प्रवेश केला. या वेळी मंदिरातील सुरक्षारक्षक महादेव घडशी (५५) आणि अनंत भगत (५0) या दोघांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला डाव साधला. यातील गंभीर जखमी महादेव घडशी यांचा आज दुपारी मृत्यू झाला तर अनंत भगत गंभीर आहेत.
शनिवारी सकाळी ६.३0 वाजता मंदिराचे पुजारी दिलीप तथा बाळू अभ्यंकर नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता त्यांना रखवालदार बेशुद्ध पडलेले तसेच मंदिराच्या छपराची कौले काढल्याचे दिसले. अभ्यंकर यांनी लगेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना ही माहिती दिली.
ट्रस्टचे पदाधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दरम्यान, ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने .....परिसरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिर परिसरात जमू लागल्या. श्रद्धास्थानावरच दरोडा पडल्याने लोक संतप्त होते. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांमध्येही दहशत होती. थोड्याच वेळात घटनास्थळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाड विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, पोलीस निरीक्षक शुक्ला, प्रकाश बिराजदार, रासकर आदी अधिकारी तसेच ठसे तज्ज्ञ, श्‍वान पथक येऊन दाखल झाले. मंदिरात नाईट व्हिजन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यरत असल्यामुळे या दरोड्याचा तपास निश्‍चित लागेल, असा विश्‍वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे. तिन्ही बाजूने समुद्रखाडीने नैसर्गिक विळखा घातलेल्या दिवेआगरमध्ये १७ नोव्हेंबर १९९७ रोजी द्रौपदी पाटील यांच्या सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्यात ही सव्वा फूट उंचीची सोन्याची गणपतीची मूर्ती आणि सोन्याचे दागिने सापडले होते. - पान /२ चोरांना माणूस आणि देव सारखेच
■ विजयदुर्गच्या अतिप्राचीन श्री रामेश्‍वर मंदिरातील २0 किलो चांदीचा मुखवटा दरोडेखोरांनी चोरला. तो अजून मिळालेला नाही.
■ कोकणातील दानपेट्या चोरांचे नेहमीचे टार्गेट. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात रसायनी, कर्जत, पोलादपूर, म्हसळा येथे प्रत्येकी एक तर गोरेगाव येथे तीन व रोहा येथे दोन अशा नऊ मंदिरांत जबरी चोर्‍या झाल्या.
■ या वर्षी रेवदंडा आणि रोहा येथेही मंदिरे फोडली.
■ कोकणातील मंदिरे लुटणारे दरोडेखोर हे कोकणातील स्थानिक नसल्याचे आतापर्यंत उघडकीस आलेल्या चोर्‍यांमधून निष्पन्न झाले आहे.
असा प्रगटला दिवेआगरचा सुवर्णगणेश!
जयंत धुळप। दि. २४ (अलिबाग)
o्रीवर्धनपासून अवघ्या ३0 कि.मी. अंतरावरील, तिन्ही बाजूने समुद्रखाडीने नैसर्गिक विळखा घातलेल्या दिवेआगरमध्ये १७ नोव्हेंबर १९९७ला एक अद्भुत चमत्कार झाला. गावातील द्रौपदी पाटील यांच्या सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. गावातील पंचांच्या उपस्थितीत ही पेटी उघडली असता त्यात सव्वा फूट उंचीची आणि १ किलो ३00 ग्रॅम वजनाची सोन्याची गणपतीची मूर्ती आणि ३00 ग्रॅम सोन्याचे देवाचे दागिने सापडले. याशिवाय इ.स. १0६0मधील एक ताम्रपटसुद्धा या वेळी सापडला.
दिवेआगार पर्यटकांच्या नकाशावर
ज्या दिवशी ही मूर्ती सापडली त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता. त्यामुळे परिसरातील गणेशभक्तांना व o्रद्धाळूंना दर्शन देण्यासाठीच o्रीगजानन दिवेआगरमध्ये प्रकटले आहेत, अशी श्रद्धा निर्माण झाली. पाटील यांनी ही मूर्ती, दागिने व ताम्रपट यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुवर्णगणेश मंदिर विश्‍वस्त मंडळाच्या ताब्यात दिले. कौलारू मंदिरातही ही मूर्ती मजबूत लोखंडी देव्हार्‍यात (पिंजरा) ठेवण्यात आली.
सुरुवातीला या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात होता. विश्‍वस्थ मंडळाने मंदिराची व्यवस्था पाहण्यास सुरुवात केल्यावर येथील पोलीस बंदोबस्त काढून विश्‍वस्थ मंडळाने सुरक्षारक्षक नेमले. मूर्तीची पूजाअर्चाही विश्‍वस्तांमार्फत केली जायची.

देवीच्या गाभार्‍यातून ८ किलो चांदी लंपास (Lokamat Dt.29/01/2012)

पारे (ता. खानापूर) येथील ग्रामदैवत दरगोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चिलाबाई देवीच्या मंदिरातील सुमारे ४ लाख ४२ हजार रुपये किमतीची ८ किलो चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. मंदिरात घडलेल्या वर्षातील या दुसर्‍या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

या मंदिराच्या गाभार्‍यातील सिंहासनावर व पुढील बाजूस सुमारे दीड इंचाचा आठ किलो वजनाच्या चांदीचा नक्षीदार पत्रा आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री १0 वाजता पुजार्‍याने मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले. मध्यरात्री अज्ञातांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व सिंहासनावरील व पुढील बाजूस असलेला सुमारे आठ किलो वजनाचा चांदीचा पत्रा काढून लंपास केला. >त्न/> पारे येथील याच चिलाबाई मंदिरातील सिंहासनावरील आठ किलो चांदी अज्ञातांनी लंपास केली. वर्षभरातील दुसरी घटना

याच मंदिरातून सात ते आठ महिन्यांपूर्वी दरवाजाची १२ ते १३ किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली होती.


शनिशिंगणापुरात चोरी
सोनई । दि. २९ (वार्ताहर) Lokamat dt.30.01.2012
देशात चोरी न होणारं मुलाखावेगळं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर गावातील गॅस एजन्सीतून संगणक चोरून नेल्याची घटना घडली. येथे चार महिन्यांपूर्वीच चोरी झाली होती.
एका भाविकाने फिर्याद दिल्याने आता गावकरीही चोरीची फिर्याद ठाण्यात नोंदवू लागले आहेत. बाळासाहेब बानकर यांच्या मालकीची गॅस एजन्सी आहे. कार्यालयाच्या छतावरील पत्रा उचकून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कार्यालयातील संगणक लांबवला.

पालकर यांचा मृत्यू
अंधश्रद्धेतून घडलेले कुटुंब हत्याकांड
पुणे। दि. २ (प्रतिनिधी)
शनि-मंगळाच्या प्रभावामुळेच आपली प्रगती झाली नसल्याच्या समजुतीतून पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या अरुण पालकर (४२) यांचा बुधवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
२१ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. त्यात पालकर यांची पत्नी अनिता (४१), मुलगा ओंकार (११), ओमप्रकाश (६) यांचा मृत्यू झाला होता. अरुण गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.
पालकर हे पेशाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते. माझा भविष्यावर विश्‍वास असून शनि-मंगळाची युती झाल्याने १३ वर्षांच्या संसारात पैसा, घर, गाडी घेणे शक्य झाले नाही, असे पालकर यांनी लिहिलेल्या मृत्युपत्रात म्हटले होते.

सातार्‍यात चोरट्यांची 'आनंदवाडी'
दत्त मंदिरातून मूर्तीचे दागिने गायब; पतसंस्थेची तिजोरी फोडली; तीन चोर्‍यांत पाच लाख लंपास
सातारा। दि. १९ (प्रतिनिधी) lokamat dated 20.02.2012
सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदवाडी दत्तमंदिरातील मूर्तीचे सुमारे ५0 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबविले. विशेष म्हणजे चोरट्यांनी ेसीसीटीव्ही व त्याचे रेकॉर्डिंग मशीनच गायब केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी शहर व परिसरात रात्रभर अक्षरश: धुमाकूळ घातला. तीन ठिकाणी झालेल्या चोरीत सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. आनंदवाडी दत्तमंदिराचे पुजारी दिलीप भिंतांडे मंदिराशेजारीच राहतात. त्यांना पहाटे आतील गाभार्‍याचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. मंदिराच्या आतील व बाहेरील खोलीत चार सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. हे चारही कॅमेरे आणि त्याचे रेकॉर्डिंग मशीन चोरट्यांनी गायब केले. तर दुसरीक़डे करंजे येथे भैरवनाथ पतसंस्थेचे शटर उचकटून काल मध्यरात्री चोरट्यांनी आत प्रवेश केला

No comments:

Post a Comment