याअगोदर वंचित (दलित) समाजावर जातीय अत्याचार होत
नव्हते असे नाही. कांग्रेस सत्तेमध्ये असलेल्या महाराष्ट्रात अमानुष असे खैरलांजी हत्याकांड
झाले. सातारा जिल्ह्यातील मुळगाव (२०१२) येथे रेखा चव्हाण या महिलेस विवस्त्र करून
लाकडी दांडक्याने मारहाण करीत गावातील रस्त्यांवर फिरविण्यात आले होते. अहमदनगर
जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि पाथर्डी याठिकाणी वंचित समाजावरील अत्याचाराच्या
कौर्याने तर परिसीमा गाठली. सतरा वर्षीय नितीन आगे यास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध
असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली व त्याचे शरीर झाडाला अडकविण्यात आले होते.
सोनई गावात तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यात शेतात
विहीर खोदली म्हणून मधुकर घाटगे यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे
करण्यात आले होते. वसई येथे महापुरुषाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने एक
पत्रकारासह दोन भावावर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला 
Pages
▼
Friday, October 23, 2015
Friday, October 9, 2015
असा भारत हवाय कुणाला?
भारतीय
घटनेने लोकशाही जीवन प्रणालीची सर्व समावेशक व्याख्या केली आहे. न्याय,
स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ही मूल्ये लोकशाही जीवन प्रणालीचा गाभा आहे.
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे
स्वातंत्र्य व संधीची समानता याचे सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता
निर्माण करणाऱ्या बंधुतेवर तिने भर दिला आहे. असे असले तरी वरील मुल्यांचा
वेगवेगळा व सुट्या पध्दतीने विचार करता येत नाही. प्रत्येक मूल्य एकमेकाशी अतूटपणे
जोडले गेले आहे. ह्याच एकत्रित जीवन प्रणालीला “लोकशाही जीवन” असे म्हटले जाते.
प्रत्येक भारतीयाने ही “लोकशाही जीवनप्रणाली” जपने अपेक्षित आहे. ह्या “लोकशाही
जीवन” पध्दतीला तडे गेल्यास तिचे फार अनिष्ठ परिणाम होवू शकतात. याची अनेक उदाहरणे
आज बघायला मिळतात. अफगाणिस्थान मध्ये तालिबानने, सिरीया व  इराक या देशात इसीसने तर आफ्रिकेमधील काही
देशात बोको हराम सारख्या संघटनांनी ‘एकात्म लोकशाही जीवनप्रणाली’ ला आवाहन देत ती
उधळून लावीत आहेत. मानवतेला मोठ्या हिंसक, विक्राळ व क्रूर पध्दतीने चीरडण्याचे
त्यांचे मनसुबे आहेत. धर्मांधतेवर आधारित संघटना कोणत्या थरावर जातात याचे हे
ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण आहे.