Pages

Friday, January 4, 2013

मराठी साहित्य संमेलनावर ब्राम्हणशाहीचे आक्रमण



चिपळूण येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे मुखपृष्ठ व व पत्रिकेच्या शेवटच्या पानावर आर्य ब्राम्हणांच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार असलेल्या परशुरामचे छायाचित्र परशुरामाच्या कु-हाडीसह  छापण्यात आले आहे. परशुराम याने आपल्या सख्ख्या आईचा खून केला होता व त्याने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती. पौराणिक साहित्यानुसार त्याने बहुजन समाजावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत. म्हणजे तो
बहुजन समाज व स्त्रियांचा हत्यारा तर ब्राम्हणांचा कैवारी होता. मराठी साहित्य संमेलन हे ब्राम्हण जातीचे नसून ते सर्व मराठीजनांचे आहे. मग मराठी माणसाचा फडशा पाडना-या परशुरामाचे छायाचित्र कार्यक्रम पत्रिकेवर कसे?. याचा जाब बहुजन समाजाने आयोजकांना विचारला पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेवरून परशुरामाचे छायाचित्र हटविले नाही तर संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका बहुजनांच्या विविध संघटनांनी घेतली पाहिजे. पुरोगामी लेखकांनी आपला भित्रेपणा सोडत पुरोगामीपणा दाखविला पाहिजे. बहुजनांचा पैसा हा ब्राम्हणशाहीच्या गौरवासाठी नसून त्याचा वापर बहुजन समाजातील अभिजीत लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी झाला पाहिजे. परंतु आजकाल बहुजनांच्या पैशावर केवळ ब्राम्हण मंडळींच मजा मारताना दिसते. त्यांच्याच हातात साहित्य संमेलनाचे सूत्रे दिसतात. हे आता बदलले पाहिजे. मंत्रालयात बसलेले सत्ताधारी दिवसरात्र फुले शाहू आंबेडकराचे नाव घेतात पण आतून काम ब्राम्हणी संस्कृतीच्या रक्षणाचे करीत असतात.  बहुजन समाजाला आंदोलन व चळवळी करून आपल्या मागण्या मान्य करवून घ्याव्या लागतात परंतु ब्राम्हणांना न मागताच सगळे चुपचाप दिल्या जाते.

म्हणून म्हणतो
 बहुजन हो उठा, आपला आवाज बुलंद करा!
ब्राम्हणशाहीचा खात्मा करा
कारण
ब्राम्हणशाही  ही अंधश्रध्देचे रोपटे लावते. रोपट्याला वाढवत बहुजनांच्या मानगुटीवर बसविते. असमानता व जातीयतेचे मूळ ब्राम्हणशाही आहे. सामाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम ब्राम्हनशाही करते. धर्म, देव व संस्कृतीच्या नावाने  ब्राम्हणशाही बहुजन समाजाचे शोषण करते. टीव्ही व प्रसारमाध्यमाद्वारे देव, धर्म, रुढी, व्रतवैफल्य व  खोटेनाटे भविष्य कथन सांगून लोकांना लुबाडण्याचे व त्यांना वैचारिक पंगु बनविण्याचे काम ब्राम्हणशाही करते.

============= बापू राऊत ============

No comments:

Post a Comment