Friday, April 21, 2023

इतिहास पुनर्लेखन मिथकावर नव्हे तर तथ्यावर हवे !

 

देशातील महत्त्वाच्या घटनांचे कालक्रमानुसार तथ्यात्मक वर्णन व तिचे स्पष्टीकरण म्हणजे इतिहास होय. इतिहास हा कल्पनांचा बाजार नसतो, तर त्याची निर्भरता हि पुराव्यावर आधारित असते. जिथे पुरावे नसतात तेथे असे म्हटल्या जाते, अशी प्रथा आहे अशा वाक्यांनी पडदा टाकला ातो. असे कांगोरे इतिहासाच्या चौकटीत बसणारे नसतात. परंतु दुर्दव्याने आपल्या देशात असेच चालत आले आहे. यालाच मिथके म्हणतात. या मिथकांना पुराव्यांची, प्रत्यक्ष चाचपणीची व सत्यस्थितीची गरज नसते.