Friday, July 7, 2017

धर्मवेडा सावरकर व त्याची जातवेडी “सहा सोनेरी पाने”

भारतातील कट्टर धर्मवादी, सनातनी व तालिबानी हिंदुत्ववादी यांचा आवडता महापुरुष? म्हणजे वी. दा. सावरकर. तालिबानी हिंदुत्ववाद्यासाठी सावरकर म्हणजे महान देशभक्तस्वातंत्र्यसेनांनी, क्रांतीवीर, कृतिशूर विचारवंतउपयुक्ततावादी समाजसुधारकमहाकवीइतिहासकारसाहित्यिकअमोघ वक्ता इत्यादी.हिंदुत्ववाद्यासाठी सावरकरांचे उभे आयुष्य म्हणजे तत्वज्ञानाचायुगप्रवर्तक घोषणांचाधाडसी हालचालींचाशूर कृत्यांचात्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय! जो व्यक्ती ब्राम्हण समाजासाठी व जातीचा उच्च दर्जा कायम ठेवण्यासाठी भांडतो त्या व्यक्तीला ब्राम्हण इतिहासकार व साहित्यकारदेवपन प्राप्त करून देशाचा हीरो घोषित करीत असतात. विविध अलंकाराच्या शब्दसुमनांनी त्यांचे जीवन अदभूत व विस्मयकारी बनवून टाकीत असतात. परंतु सावरकरांच्या प्रतीमेवरून या  ओवाळलेल्या शब्दसुमनाच्या फुलांची पुटे काढून टाकली तर दिसतो केवळ ओबडधोबडपणा, कट्टर जातीयवादीपणा, ब्राम्हणी धर्माभिमानीपणा, स्वजातीचा गर्विष्ठपणा व खोटेपणाचा अस्सल प्रमाद. हिंदुत्ववादाच्या बुरख्याआडून भारतावर ब्राम्हणांचेसामाजिक, धार्मिक व राजकीय वर्चस्व स्थापित करने हा त्यांचा मुख्य उद्देश होता. नाटकी गद्य व पद्यानी सामान्य माणसाला धर्मबंधनात गुरफुटून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सावरकरांनी आपल्या  सहा सोनेरी पानया ग्रंथातून केलेला दिसतो.

सावरकरांची सहा सोनेरी पानेम्हणजे ज्यांनी ज्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी व वैदिक वा ब्राम्हण्यपुरक समाज, आर्य ब्राम्हणांच्या कल्याणासाठी सहकार्य केले, त्या त्या राजांना शुभेच्छ्या देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सहा सोनेरी पाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. सावरकरांनी पहिले सोनेरी पान चंद्रगुप्त व चाणक्य यांना, दुसरे पुष्यमित्र शुंगाला, तिसरे विक्रमादित्य, चौथे यशोधर्म वर्मन, पाचवे महाराष्ट्रीय पराक्रमाचा उच्चांक (पेशवेशाहीला) तर शेवटचे सहावे पान इंग्रज गेले व हिंदुराष्ट्र स्वतंत्र झालेया घटनांना अर्पण केले आहे.
सावरकरांची सहा सोनेरी पाने वाचल्यावर ते कट्टर वैदिक धर्माभिमानी, जातीयवादी व ब्राम्हण या स्वजातीचा गर्वाभिमान बाळगणारे वाटतात. आपल्या मनातील कट्टर सनातनी प्रवृत्तीला बहुजन समाजापासून  लपवून ठेवण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा घेतला हे प्रकर्षाने जाणवते. हिंदुत्वासी सावरकरांचे काहीही देणे घेणे नसून त्या आडून मनुस्मृती बहुजनांच्या डोक्यावर त्यांना लादायची होती.  या देशातील कोणताही पुरुष हा ब्राम्हनापेक्षा वरचढ दिसता कामा नये याची ते ग्रंथात पुरेपूर काळजी घेतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांच्या सहा सोनेरी पानामध्ये गौतम बुद्ध, महाविर, सम्राट अशोक  शिवाजी महाराजाला स्थान न देणे हा होय. संपूर्ण महाराष्ट्र ज्याला आपले स्फुर्तीस्थान मानते त्या शिवाजी महाराजांना त्यांच्या पुस्तकात केवळ दहा ते पंधरा  ओळी लिहिल्या आहेत. तर शिवाजी महाराजाने मोठ्या कष्टाने कमावलेल्या राज्यावरज्यांनी उड्या व मौजमजा मारल्या त्या पेशव्यावर ते भरभरून लिहितात. सावरकर हे शिवाजी महाराजांची एकेरी शब्दात बोळवण करतात तर बाजीराव व रघुनाथराव पेशव्यांना ते स्वामी नावाने संबोधतात.
या देशाचा खरा व लिखित इतिहास बुध्दापासून सुरु होतो असे सावरकर मानतात. परंतु आपल्या सोईसाठी ते आपल्याच मताविरोधी भूमिका घेतात. सावरकर म्हणतात, “पुराणे म्हणजे इतिहास नव्हे, त्या दंतकथा असल्या तरीही, त्यावर दैविकरणाची छाप असली तरीही त्याला इतिहास म्हणून आपण मान्यता दिली पाहिजे.म्हणजेच आपल्या फायद्यासाठी खोट्या गोष्टीनाही सत्य मानले पाहिजे असा ते उपदेश करतात. सावरकरांच्या या चावटपनाला काय म्हणावे?. वरुन त्याचे चेलेचपाटे सावरकराला विज्ञानवादी संबोधणार?. दंतकथा व दैविपणा कोणत्या विज्ञानवादात बसते?.  भारताच्या ख-या इतिहासाचा प्रारंभ हा बुद्धकाळापासूनच सुरु होतो असे सावरकर सांगतात म्हणजेच बुद्धकाळाच्या अगोदरील इतिहास हा केवळ दंतकथांचा काल्पनिक दस्ताऐवज होययाला सावरकरांची आपोआपच पुष्टी मिळते. सावरकरांचा हा कबूलनामा म्हणजेच त्यांनी लीहलेले सहा सोनेरी पाने हे पुस्तक होय. सावरकरांचे सहाही सोनेरी क्षण हे बुद्ध काळानंतरचेच आहेत. त्यामुळे वेद, पुराने, राम, कृष्ण, भगवतगीता ह्या केवळ दंतकथा होत व ते भारताच्या इतिहासातील सोनेरी क्षण नाहीत हे सावरकर मान्य करतात.
बहुजन समाजाने सावरकरांच्या बनावटी शाब्दिक जाळ्यात अडकू नये. युरेशियातून आर्य ब्राम्हणाच्या टोळ्या या देशात आल्या व येथील मुलनिवासी लोकावर विजय मिळवून त्यांच्यावर त्यांनी सांस्कृतिक गुलामगिरी लादली याचा ते साधा उल्लेखही करीत नाही. तसेच आर्य ब्राम्हणांच्या या विजयांच्या क्षणाला ते सोनेरी क्षण म्हणत नाहीत. म्हणतील तरी कसे? कारण ते त्यांच्या स्व-जातीय आर्य ब्राम्हणांचे भारतावरचे आक्रमण होते. आर्यब्राम्हनाचे हे आक्रमण बहुजन समाजाला कळू नये म्हणून सावरकर हे आपल्या  सोनेरी पानाची सुरुवात ग्रीक, हून व शक यांनी  भारतावर केलेल्या आक्रमणाच्या काळापासून करतात.
सावरकर हे ग्रीक, हून, शक व मुगल यांनी भारतावर केलेल्या आक्रमणाला व युध्दात त्यांनी मिळविलेल्या विजयाला बौध्द धर्माचा अहिंसावाद कारनीभूत आहे असे सांगतात. परंतु बुद्धानी आलेल्या प्रसंगाचा प्रतिकार करू नका व शत्रूला शरण जा अशी शिकवण कधीच दिली नाही. उलट आपल्या राज्यावर कोणी आक्रमण करीत असेल तर त्याचा एकजुटीने प्रतिकार करावा असे बुद्धाने सांगितले आहे. राजा अजातशत्रूच्या युध्दखोरी पासून स्वत:चे संरक्षण कसे करायचे? याचा बुद्धाने  वैशालीच्या वज्जीना (लीच्छ्वी) केलेला उपदेश सावरकरांनी आपल्या नजरेखालून घातला असता तर बुद्धाचा अहिंसावाद व युद्धनीती काय आहे? हे त्यांना कळले असते. याउलट वैदिक/ब्राम्हणी धर्माने या देशात वर्णव्यवस्थेची चौकट तयार केली व या वर्णव्यवस्थेमुळे केवळ क्षत्रीयानेच युध्द लढले पाहिजे, इतरांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची. कोणत्याही वर्णाने एकमेकांच्या कार्यात ढवळाढवळ न करता केवळ वाटून दिलेली कामे इमानइतबारे करायची अशी सक्ती केल्यामुळेच भारतीय राजांचा पराजय झाला हे सांगण्यासाठी सावरकर कचरतात. एवढे ते घाबरट आहेत. आपल्या पूर्वजांच्या चुका ते बहुजन समाजाच्या नजरेत येवू नये याची  पूर्ण काळजी घेताना दिसतात व त्यांचा दोष तेबुद्ध व त्यांच्या धर्मावर टाकतात. सावरकर हे पूर्णता बौध्द व जैन धर्मद्वेषी आहेत हे त्यांच्या पुस्तकावरून स्पष्ट दिसते. बौद्ध व जैन धर्मामुळे बहुजन जनता वैदिक धर्म व ब्राम्हणाला महत्व देईनासे झाले होते. या दोन्ही धर्माच्या शिकवणुकीमुळे वैदिक धर्म मोडकळीस आला होता याचा राग सावरकरांना होता.
सावरकरांचे पहिले सोनेरी पान म्हणजे सम्राट चंद्रगुप्त व चाणक्य यांचा कार्यकाळ होय. यातही ब्राम्हणेतर  चंद्रगुप्ताला मौर्याला कमी लेखीत ब्राम्हण चाणक्याला अधिक महत्व देताना सावरकर म्हणतात, “ ज्या अलेक्झांडरने अनेक राष्ट्रे जिंकली त्या जगजेत्त्या अलेक्झांडरलाही धूळ चारणारा जर कोणी ह्या जगात भेटला असेल तर तो हा वृध्द नी नागडा उघडा भारतीय ब्राम्हण संन्यासीच होय”. वास्तविकता मगेस्थेनीस वा पतंजली यांच्या साहित्यात चाणक्याच्या नावाची मुळीच चर्चा वा साधा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे रामदासाला जसा शिवाजी राजाचा गुरु बनविला त्याच प्रकारे चाणक्याला चंद्रगुप्ताचा गुरु बनविण्यात आला. चंद्रगुप्त हा चाणक्याचा आज्ञाधारक  शिष्य असता तर त्याने चन्द्रगुप्ताकडून अश्वमेध व राजसुर्य यज्ञ करविला असता व त्याला वैदिक धर्माचा स्वीकार करण्यास लावले असते. परंतु असे कदापीही झाले नाही. चंद्रगुप्त मौर्य हा जैन धर्माचा कट्टर समर्थक होता. सावरकरांच्या ब्राम्हणी धर्माला त्याने कधी थारा दिला नव्हता. यावरून चंद्रगुप्त व चाणक्य यांचे कसे सबंध असतील याची कल्पना येते?. तरीही सावरकराला चंद्रगुप्ताचे राज्य म्हणजे  “ब्राम्हण चाणक्याचेचराज्य वाटते. चंद्र्गुप्तासारख्या सम्राटाचा चाणक्याला गुरु बनविला म्हणजे ब्राम्हणाचे महत्व आपोआपच वाढेल हे सावरकरांचे कसब समजायला फार वेळ लागत नाही.  
सावरकर सहा सोनेरी पानांपैकी दुसरे पान पुष्यमित्र शुंगाला अर्पण करतात. ब्राम्हण कितीही कमी दर्जाचा असला तरी त्याला उचलून धरलेच पाहिजे, ब्राम्हनापेक्षा इतर कोणीही वरचढ ठरता कामा नये याची खुणगाठ सदर पुस्तक लिहिताना सावरकरांनी गाठलेली दिसते. जगप्रसिध्द असलेला सम्राट अशोक याचे संपूर्ण भारत खंडावर आधिपत्य होते. कलिंग युध्दात झालेल्या जीवितहानीच्या पश्चातापामुळे सम्राट अशोकाने अहिंसावादी बौध्द धर्माचा स्वीकार करीत संपूर्ण आशिया खंडात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार केला. अहिंसावादी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतरही अशोकाच्या साम्राज्याकडे वक्रदृष्टीणे पाहण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. अशा पराक्रमी राजाचे कर्तव्य सावरकराला दिसले नाही. तर ज्याने आपल्या मालकाला (बृहदत्ताला) कपटाने ठार मारीत त्याचे राज्य बळकाविले व निशस्त्र भिक्षूकांची कत्तल करीत बौध्द धर्मीय बहुजन समाजाचा अतोनात छळ केला त्या ब्राम्हण विश्वासघातकी पुष्यमित्र शुंगाला सावरकर आपला हिरो मानतात. बृहदत्त या सम्राटाला शिव्याची लाखोली वाहतात. सावरकर हे दुस-यांना अश्शील शिव्या देण्यात एकदम पटाईत होते हेसदर पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. यावरून सावरकर यांची चारीत्र्यशीलता व स्वभावगुनाची पातळी किती खालची होती हे कळते. पुष्यमित्राने मौर्य राज्य कपटाने घेताच त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञास पतंजली हाही उपस्थित होता. सम्राट अशोक व त्यांच्या वंशजांनी अनेक वर्ष रोखून धरलेली मुक्या प्राणीमात्राची हत्या पुष्यामित्राच्या ब्राम्हणी राजवटीपासून पुन्हा सुरु करण्यात आली. या मुक्या प्राण्यांची आहुती देवून केलेल्या अश्वमेध यज्ञास सावरकर राष्ट्रीय विजयोत्सव समजत ती एक प्रकट सम्राटीय घोषणा होती असे म्हणतात.   
यज्ञयाग हा ब्राम्हणांचा पैसे कमाविण्याचा धंदा होता व आहे. खोट्या काल्पनिक कथा रचून त्याची राज्यकर्त्यावर भुरळ पाडण्याची व आपले इप्सित साध्य करण्याची कला ब्राम्हणांना पूर्वीपासूनच अवगत होती. त्याच कलेचा वापर करून ब्राम्हणांनी कलिंगच्या खारवेल राजाकडून बृहदत्ताचा पराजय करण्यासाठी अश्वमेध व राजसुर्य यज्ञ करवून घेतला होता. जसा अलीकडच्या काळात शिवाजीवर विजय मिळावा म्हणून मिर्झाराजे जयसिंग याच्याकडून पुण्याच्या ब्राम्हणांनी करवून घेतला. वास्तविकता: पुष्यमित्र शुंग हा बृहदत्ताचा निकम्मा सरसेनापती होता. जर तो शूर सेनापती असता तर कलिंगच्या खारवेल राजांनी जेव्हा मौर्याच्या मगधावर स्वारी केली, त्या लढाईत सेनापती म्हणून पुष्यामित्रांनी विजय प्राप्त करून दिला असता. कलिंगच्या खारवेल विरोधात पुष्यमित्राच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढाईत पुष्यमित्राचा सपशेल पराभव झाला होता. यावरून सावरकरांचे दुसरे सोनेरी पान कसे बनावटी आहे व केवळ ब्राम्हण आहे म्हणून पुष्यामित्रा शुंगाचा ते उदो उदो करतात हे स्पष्ट होते.
सावरकराने तिसरे सोनेरी पान हे गुप्त राजवटीतील विक्रमादित्याला (दुसरा चंद्रगुप्त) वाहिलेले आहे. सावरकरांच्या तीस-या सोनेरी पानाच्या कालखंडात शक् व कुशान हे भारतात येवू लागले होते. भारतात आलेला कुशान राजा कनिष्क याने बौध्द धर्माचा स्वीकार केला होता. चीनमध्ये बौध्द धम्माच्या प्रसाराचे सारे श्रेय कनिष्कला जाते. कनिष्क हा कधीकाळी चीनचा सम्राट होता. याच्याच कालखंडात बुध्द धम्माची तिसरी सांगिती संपन्न झाली होती. त्याचे राज्य चीनपासून गुजरात व आंध्रपर्यंत पसरले होते. परंतु सावरकरांचा सम्राट कनिष्कवर  खूप राग दिसतो. कारण कनिष्कने सावरकरांचा वैदिक धर्म न स्वीकारता बौध्द धर्म स्वीकारला होता. जर याच कनिष्कने वैदिक धर्म स्वीकारला असता तर कनिष्कला महान सम्राट ठरवित त्याची पुजा केली असती. एवढे सावरकर धर्मवेडे (ब्राम्हण्यवेडे) होते. विक्रमादित्य (दुसरा चंद्रगुप्त) व कनिष्क यांचा तौलनिक अभ्यास केल्यास कनिष्क हे विक्रमादित्यपेक्षा अधिक श्रेष्ठ ठरतात.
सावरकरांने चौथे सोनेरी पान यशोधर्मा वर्मन यांना अर्पण केले आहे. यशोधर्माचा कालखंड हा हूण आक्रमणांचा होता. हूण हे अत्यंत शौर्यवान होते. हूणांच्या स्त्रियाही युध्द कौशल्यात तरबेज होत्या. चीनची भिंत ही हूणांच्या काळातच चीनच्या सम्राटांनी बांधून घेतली होती. जर्मन लोकांना हूण या नावाने ओळखल्या जाते. हुनाच्या मिहीरगुल राजाने केवळ बौध्द धर्मियांचा छळ केला नव्हता तर वैदिक धर्माला माणना-यांचाही त्याने छळ केला होता. परंतु मिहीरगुलाने केवळ बौध्द धर्मियांचाच छळ केला  बुध्दाच्या अहिंसावादाचा त्याला खूप राग होता अशी खोटी थाप सावरकर मारतात. ज्या ज्या क्षणी परकीय आक्रमकांनी बौद्ध धर्मियांना छळले तो तो क्षण सावरकरासाठी आनंदाचा व उत्सव साजरा करण्यासारखा होता. एवढा तो कट्टर बौध्द धर्मद्वेषी होता. सावरकरांचे सर्व लिखाण हे नाटकी स्वरूपाचे आहे. मिहीरगुल या राजाला ठार मारणा-या यशोधर्मा वर्मन याला ते आपले चौथे सोनेरी पान अर्पण करतात.
भारतात ग्रीक, शक्, कुशाण व हून हे भारतात येण्यापूर्वी कोणत्याही धर्माचा शिक्का मारून शिरले नाहीत वा ते कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसारासाठी आले नव्हते. तर त्यांना वेगवेगळया भूभागाचे सम्राट पदे भूषवायची होती. त्यांना जगजेत्तेपणाचे वेढ लागले होते. भारतात स्थाईक झाल्यानंतर त्यापैकी काहींनी मात्र जैन व बौध्द धर्म स्वीकारल्याचे दाखले इतिहासात मिळतात. याचा  जळफळाट सावरकराला झालेला दिसतो.
इतिहासाच्या सातव्या कालखंडापासून ते मुस्लीम राजवटीच्या कालखंडापर्यंतचा कार्यकाळ हा सावरकराने आपल्या पाचव्या सोनेरी पानासाठी राखला आहे. सावरकर या पानात हिंदू या शब्दावर अधिकच जोर देतात. वारंवार ते हिंदू या शब्दाची हातोडी बनवून बहुजन समाजाच्या डोक्यावर मार मारताना दिसतात. ते संपूर्ण बहुजन समाजावर हिंदू हा शब्द चीपकवू पहातात. परंतु हिंदू या शब्दाची सुरुवात वा त्याची निर्मिती ते बहुजनापासून लपवून ठेवतात. हिंदू हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आला नाही. जगात हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही. चाणक्य, पतंजली, पुष्यमित्र शुंग व शंकराचार्य यांनी हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही,कोठेही शब्दबध्द केलेले नाही वा हिंदू या शब्दावर भाष्य वा प्रवचन दिले नाही. तरीही चंद्रगुप्ता पासून मुस्लीम राजवटीपर्यंतच्या सर्व राजांना सावरकर हिंदू राजेअशी बिरुदावली लावतात. एखादी खोटी गोष्ट लोकांना वारंवार सांगा म्हणजे ती खोटी गोष्ट काही काळानंतर खरी वाटू लागते. सावरकर हिंदू शब्दाबाबतहाच प्रकार वारंवार करताना दिसतात.
हिंदूहा शब्द मुस्लिमांनी प्रचलित केला. मोरक्कन मुस्लीम प्रवासी इब्न बतुता यांच्या रीहला या पुस्तकात अल हिंद” हा शब्दप्रयोग आलेला आहे. इब्न बतुता याचा कालावधी १३०४ ते १३६९ हा आहे.  इब्न बतुताने तुघलकांच्या काळात सहा वर्ष काद्री म्हणून काम पाहिले होते. म्हणजेच केवळ तेराव्या शतकापासून हिंदू हा शब्द उच्चारला जात आहे. इब्न बतुताने सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेशाला अल हिंदअसे नाव दिले. हिंदू हा पर्शियन शब्द असून तो सिंधू या शब्दाला समानार्थी आहे. म्हणजेच सिंधू नदीच्या पलीकडे राहणा-या सर्व लोकांना त्यांनी हिंदू असे म्हटले आहे. या शब्दाचे ते चे उच्चारण करीत. सिंधूलोक या ऐवजी हिंदूलोक असे ते म्हणत असत. मुस्लीम समुहाच्या व्यतिरिक्त सर्व भारतीय समुहाला त्यांनी हिंदू असे संबोधले. त्यामुळे  हिंदू या शब्दाचा वैदिक, ब्राम्हण व धर्म याच्याशी काहीही सबंध नाही. परंतु नंतरच्या काळात हिंदू या शब्दावर वैदिक ब्राम्हणांनी कब्जा केला. त्याला धर्माचे व जातीव्यवस्थेचे स्वरूप देवून बहुजन समाजावर लादले. सावरकर हिंदू या शब्दाचा शस्त्रासारखा वापर करतात.
आपल्या पाचव्या सोनेरी पानातमुस्लिम राजांच्या पराभवाच्या काळात हिंदू राजांनी भारताला निर्मुसलमान केले नाही याची खंत सावरकर व्यक्त करतात. मुसलमानांनी जे जे अत्याचार केले तसतसे  प्रत्याचार तुम्हीही मुसलमानावर करा. मुसलमानांना सरसकट कापून टाकामुसलमानी राजवटीत मार्गोमार्गी पडलेल्या देवळाच्या ढीगा-याप्रमाणे मुसलमानाच्या झाडून सा-या मशिदी पाडून टाकून त्याचेही ढिगारे मार्गोमार्गी पडू द्यात. हिंदुच्या स्त्रियांची जशी मुसलमानांनी विटंबना केली तशीतशीच मुस्लिमांच्या स्त्रियांचीही विटंबना करा. हिंदू म्हणून असा हिंदुधर्माचा सूड घेणे हेच तुमचे कर्तव्य आहे!! अशी कचकचीत आज्ञा विजयी सेना धुरंधर रघुनाथरावाने हिंदू सैन्यांना सोडली  नाही! याची खंत सावरकरांना होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने बाबरी मसजीद पाडून सावरकराची मशिदीचे ढिगारे करण्याची इच्छा पूर्ण केलेली आहेच.
रघुनाथ राव पेशव्याने १७५८ मध्ये सिंधू नदीच्या पलीकडे जावून (अटकनगर) मुसलमानांना पराजित करून आपला झेंडा रोवला या घटनेला सावरकर पाचव्या सोनेरी पानातील महत्वाचा क्षण मानतात.  खुश्रुखान,मलिक कफुर व नसरुद्दिन या मुस्लीम सम्राटास सावरकर हिंदू सम्राट, हिंदू धर्मरक्षक व हिंदू हृदयसम्राट अशा उपमा देतात. या तिघांनीही मशिदीचे रुपांतरण हिंदू मंदिरात केले. या दोघांच्या राज्यात मुसलमानापेक्षा हिंदूला अधिक महत्व होते व त्यांनी हिंदू धार्मिक अत्याचाराचा मुसलमानावर धार्मिक प्रत्याचार करून सूड उगवला असा नवा शोध लावतात. हे तीनही मुस्लिम सम्राट हिंदू स्त्रीयांचे अपत्य होते म्हणून त्यांचा कल मुस्लिम धर्मापेक्षा हिंदू धर्माकडे होता असा दावा सावरकर करतात.
सदर पुस्तकातच ते वाचकांना आपला हिंदूपदपादशाही हा ग्रंथ वारंवार वाचायला सांगतात. सावरकर म्हणतात,मराठे हे आपल्या घरकुलाच्या परसुसाठी व शेतीवाडीसाठी लढले नाहीत. त्यांचा लढा हा मुख्यत: हिंदू धर्म व हिंदू राष्ट्रासाठी होता. सावरकरच्या म्हणण्यानुसार, हिंदू धर्मासाठी मराठ्यांचा लढा होता तर शिवरायांचा राज्याभिषेक करायला पुण्याच्या ब्राम्हनाणी विरोध का केला? या संदर्भात ते कोठेही चर्चा करताना दिसत नाही. औरंगजेब हे तुम्ही मुस्लिम बणल्यास जिवदान देवू" असा प्रस्ताव संभाजी राजासमोर ठेवतात. संभाजीराजे स्पष्टपणे औरंगजेबाचा मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव नाकारत मरण पत्करतात. परंतु हिंदुत्वाचागर्व सांगणारे  टेंभा मिळविणारे सावरकर आपल्या सोनेरी पानात सांभाजींचा साधा उल्लेखही करीत नाही. मात्र शिवाजी महाराजावर झालेल्या विषप्रयोगाच्या कटात सामील असलेल्या सोयराबाईस शिवाजी महाराजापासून झालेल्या राजाराम या पुत्राचा सावरकराला अधिक पुळका आलेला दिसतो. संभाजी राजास डावलून दहा वर्षाच्या राजाराम यास राज्याची सूत्रे देण्यासाठी अष्टप्रधानातील काहींनी सोयाराबाईस हातासी पकडून कटकारस्थान केले गेले होते. यावरून सावरकरांना कटकारस्थाने किती प्रिय होती याचा अंदाज येतो.
सावरकर हे सती प्रथेचे कट्टर समर्थक होते. राजा मलभत्ती याच्या मुलीने मुहमद तुघलकाशी लग्न केले हे सावरकरांना चांगलेच खटकलेले दिसते. तिने तुघलकसी लग्न न करता पदमिनी सारखा धर्मार्थ बळी देण्याचा मार्ग पत्करला पाहिजे होता असे सुचवतात. यावरून सावरकराचा स्त्रीविचार किती प्रतिगामी  होता याचीकल्पना येते.   
सावरकराच्या सहा सोनेरी पानात एका वृध्द ब्राम्हणाची कथा आलेली आहे. कथेप्रमाणे वृध्द ब्राम्हण एका मूर्तीची पूजा करी व आपल्या घरी उत्सव भरवीत असे. ह्या ब्राह्मणाचा देव भक्तास पावतो अशी कथा दूरवर पसरली होती. फिरोझ तुघलकाने ब्राम्हणास पकडून दिल्लीत आणले व त्यास मुसलमान होण्यास सांगितले. त्याने नकार देताच त्यास जाळण्यात आले. सावरकरांच्या या ब्राम्हणाच्या पावना-या देवाने त्या वृद्ध ब्राह्मणास का वाचविले नाही?. या बनावट कथेवरून सावरकरांचा विज्ञानवादी असलेला मुखवटा आपोआप गळून पडतो. सुलतानाने सर्व जनतेवर जिझिया कर लावला होता. ब्राम्हणांनी कर भरण्यास नकार देत आमरण उपोषण केले. तेव्हा या स्वधर्माभिमानी ब्राम्हनासाठी इतर जनतेने ब्राम्हणाचा कर भरला व त्यांचा जीव वाचविला. या कथेतून सावरकर ब्राम्हणगिरीची फुशारकी मारतात. पण ब्राम्हणांचा ऐतखाऊ व फुकटखावूपणा दाखवीत नाहीत. ब्राम्हणासाठी इतर जनतेने कर का भरावा? हे ते सांगत नाहीत.
पेशव्यांनी कितीतरी मराठा सरदारांची अडवणूक केली. पेशव्यांनी कोल्हापूरच्या दुस-या शाहू महाराजांना बंदिस्त बनवून शिक्षण घेवू दिले नव्हतेयशवंतराव होळकरअहिल्याबाई होळकरखंडेराव दाभाडे, भोसले, शिंदे अशा अनेकांना पेशव्यांनी छळले होते. त्यांच्या काळात शुद्रांचा अतोनात छळ करण्यात आला होता. याची माहिती ते आपल्या सोनेरी पानात उघड करीत नाहीत. अशा क्रूर पेशव्यांना ते अवतारी पुरुष मानतात. केवढा हा जातीभिमान! 
सावरकरांचे सहावे पान म्हणजे ब्रिटीशाकडून भारताला मिळालेले स्वातंत्र्य होय. याही पानात ते ब्राम्हणालाच अधिक महत्व देतात. इंग्रजाविरुध्द प्रथम सशस्त्र युध्द पुकारणारा क्रांतिवीर म्हणजे उमाजी नाईक, उमाजीच्या नावाची ते कोठेही नोंद करीत नाही. क्रांतीसिह नाना पाटील यांनाही ते ब्रिटीशविरोधातील भारतीय लढ्यात स्थान देत नाही. याचे कारण म्हणजे हे दोघेही ब्राम्हण नव्हते. मात्र आपल्या जातभाईला सावरकर कदापिही विसरत नाही. तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी, चाफेकर बंधु, बाळ गंगाधर टिळक यांचे बरोबर ते स्वत:चेही गुणगान गातात.
सावरकरांचे हे सोनेरी पान म्हणजे कट्टर हिंदू धर्मवादी कॅडर बेस कार्यकर्ते घडविणारी मार्गदर्शक पुस्तिका आहे असेही म्हणता येईल. एवढेच नव्हे तर हिंदुना जैनबौध्द व  मुसलमानाविरुध्द भडकाविण्याचा जाहीरनामाच आहे. आज देशातील सर्व ब्राम्हणी संघटना ह्या सावरकराच्या विचारावर चालताना दिसतात. मुस्लिम विरोध करून ब्राम्हणी वर्चस्व असलेले हिंदू संघटन मजबूत करून राजकीय सत्ता हस्तगत करीत गतवैदिक वैभव प्राप्त करणे ह्या सावरकरी गुप्त डाव होता. आर.एस.एस सावरकराच्या विचारानेच मार्गक्रमण करीत आहे.
सावरकर हे धृर्त चतुर प्राणी होते. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून ब्राम्हणी सत्तेसाठी धडपडणारा जातिवंत कार्यकर्ता होता. ब्राम्हणाशिवाय या देशात कोणीही पराक्रमी व विद्वान असू शकत नाही याचा नकळत दावा ते आपल्या सोनेरी पानात करतात. केवळ ब्राम्हण म्हणून आपल्याला किंचितही महत्व मिळणार नाही हे जाणून असणारेसावरकर हिंदुत्ववादाचा बुरखा पाघरून बहुजन समाजाला फसवितात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे त्यांचे सहा सोनेरी पान हे पुस्तक होय. धर्मवेड्या सावरकरांचे जातिवेडे सहा सोनेरी पाने बहुजन समाजाला सावरकरादी लोकांच्या बामणी काव्यापासून दूर राहण्याचा इशारा देवून जाते परंतु हे पुस्तक वाचणारा वाचक हा डोळस व सद्सद्विवेक बुद्धीची जान असणारा असावा लागतो.  
.
बापू राऊत

9224343464

36 comments:

  1. वाह्यात लिखाण आहे. पुर्णपणे जातीयद्वेष ठासून भरलेला आहे,
    आपल्या जातीच्या देशभक्तांना महत्व दिले नाही म्हणून खुन्नस !

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय. या जातीयवाद्यांनी हिंदू धर्म आणि भारताचे अक्षम्य नुकसान केले आहे

      Delete
    2. अप्रतिम विश्लेषण.....

      Delete
    3. अप्रतिम विश्लेषण.....

      Delete
    4. अप्रतिम, बहुजन समाजाचा विजय असो.

      Delete
  2. प्राचीन काळी साहित्य नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.
    आता चाणक्य चंद्रगुप्ताचे गुरू नाहीत. उद्या गांधीचे गुरू नामदार गोखले राहणार नाही. चाणक्यांनी कधीही चंद्रगुप्ताला प्रस्ताव पाठवला नाही कि, माझे शिष्यत्व स्वीकार आणि अश्वमेध व राजसुय यज्ञ कर ! यज्ञ केल्यावर कोणाचाही धर्म बाटत नाही !
    चाणक्य हे महान राजनीतिज्ञ, अर्थतज्ज्ञ होते.

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या बोलण्यातून तुझा दोगलेपणा व पोकळ ब्राह्मणी अभिमान साफ दिसतो. गांधी, चंद्रगुप्त यांचा एकेरी उल्लेख तर गोखले, चानक्यांचा आदरार्थी उल्लेख. आता reply वाचल्यावर एडिट करू नकोस. सम्राट अशोक शिवाजी महाराज यांना त्यांच्या कर्तृत्ववानुरुप स्थान दिले नाही हे तुझ्यासारखे लोक ढुंगण आपटून justify करतील पण सत्य स्वीकारणार नाहीत कारण यात त्यांचे फार मोठे नुकसान आहे हे ते जाणून आहेत म्हणूनच ते शब्दांचा खेळ खेळतात.

      Delete
  3. अशोकाने बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर लष्करी बळाकडे दुर्लक्ष केले.
    सख्या भावांची निर्घृणपणे हत्या करून राज्य बळकावले, वैदिकांवर जबरदस्तीने बौध्द धर्म लादला. पुष्यमित्राने कत्तल केली ती राष्ट्रीय कारणासाठी, तसेही बौध्दांनी त्याचे पुष्यमित्राने चुकीचे चित्र उभारले आहे. अशोकाच्या राज्यातदेखील खाटीकखाने चालू होते, ते वर्षातील
    ५६ दिवस बंद असायचे.

    ReplyDelete
  4. यज्ञयाग करून पैसे मिळवणे काहीच गैर नाही. पुर्वी युध्दात विजय मिळविण्यासाठी यज्ञयाग केले जायचे. आता युध्द हे रणनीती, डावपेच, मोहिम आखून आणि शस्त्रांच्या जोरावर जिंकता येते.
    एवढी साधी गोष्ट कळत नाही म्हणजे अशा लोकांच्या बुध्दीची कीव येते.

    ReplyDelete
  5. कनिष्काबद्दल सावरकर म्हणतात, "कनिष्काची महत्वकांक्षा जितकी
    असीम तितकाच पराक्रमही अतुल होता.

    ReplyDelete
  6. स्वताचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी बौध्द धर्म स्वीकारल्यावर हिंदू धर्माची यतेच्छ बदनामी करायचा परवाना आपल्याला मिळतो असा गोड गैरसमज झालेला दिसतोय. शत्रुवर दया दाखविल्याचे दुष्परिणाम अनेक राजांनी भोगले आहेत. मिहीरगुल परत यशोधर्मावर उलटला, मग आता यशोधर्माने त्याची गळाभेट घ्यावी अशी अपेक्षा आहे का ?

    ReplyDelete
  7. फक्त ब्राह्मणांना नीचा दाखविण्यासाठी हा सगळा उपद्व्याप चालू आहे. जैन व बौध्द धर्माशी काडीचेही देणे घेणे नाही तुम्हाला.
    वेदातील व कळत नाही आणि वैदिक शब्द फार स्वस्त करून टाकता.
    ह्या लिखाणावरून एवढेच जाणविले कि, "ग्रंथाचे पुर्ण वाचन न करता जो त्याला दुषणे गेतो तो दुष्टबुध्दीचा असतो".
    हे तुमच्याबाबतीत १०१ % खरे ठरते. समर्थ रामदास, टिळक, श्यामची आई, थोरले बाजीराव, वासुदेव बळवंत ह्यांची बदनामी करून फक्त विकृत आणि आसुरी आनंद पोसायला येतो तुम्हाला.
    हिंदुत्ववादी असा शिक्का मारणा-यांना सावरकर काय समजतात ?
    आमचा हिंदुत्ववाद हा विश्वरूपी मानवराष्ट्राचा पुरस्कार करतो, पण तुमचा हिंदुत्ववाद फक्त द्वेष, असुया, जातीयवाद, असंघटितपणा, धर्मांतर एवढेच शिकवतो.

    ReplyDelete
  8. हिंदु धर्मातील दोषांबद्दल बेंबीच्या देठापासून ओरडता ! पण के दोष दुर करायला सांगितले कि, हात वर करता ! हे दोष तुम्ही दुर करता येत नाही, खरं तर तुम्हाला करायचेच नाही. धर्मांतराच्या नावाने पळ काढता. जैन व बौध्द धर्माचे पुरोहित हे भिक्षुकांपेक्षा अधिक म्हणजे कोट्यावधीच्या घरात पैसे कमवतात. मंदिरापेक्षा त्यांचे मठ पाहा.
    बौध्द धर्मातदेखील आस्तिकतावाद, अस्पृश्यता, जातीभेद, कर्मकांडे
    हे प्रकार प्रकर्षाने जाणवतात. तिकडेही लक्ष घाला, सतत पक्षपात करू नका !

    ReplyDelete
    Replies
    1. छान जोडा मारलात,,👍👍

      Delete
    2. पण लागला नाही ना?

      Delete
  9. hindu dharmatil dosh dur karu shakt nahi tya doshashivay hindu dharmach nhi.he dosh hindu dhaarmachya pathicha kana ahet.

    ReplyDelete
  10. नालायक माणूस आहेस तू,, ज्यांनी देशासाठी कित्येकवर्षं तुरुंगवास भोगला त्यांचे मोठेपण मान्य न करता जे इंग्रजांचे दलाल चमचे होते त्यांना महापुरुष ठरवण्याचे पातक करताय तुम्ही,, एक वेळ अशी येईल,, लोक घरा घरात स्वातंत्र्य वीर सावरकरांचा फोटो लावतील,, आणी त्या तीन माकडांना टाकून देतील,,

    ReplyDelete
  11. आबे लवड्या एक पुस्तक वाचून तुला कळणार नाही, तू हिंदुत्व वाच. पण तुज्यासारख्याला ती भाषा व त्यातील व्याकरण लकब जरी कळली तरी फार.
    निर्बुद्ध कुठला, आधी समजायची अक्कल घेऊन ये मग टीका कर दुसऱ्यांवर

    ReplyDelete
  12. छत्रपती शिवाजी महाराज समजायला असे १००००० सावरकर आले तरी नाही समजणार ........
    श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर हे भडवे मुजरा करत बसले असते..... अरे नालायकानों चांगल्याला चांगलं म्हणा..... महाराजांनी कधी यांना भिक घातली नाही.... म्हणून नाराज आहेत बिचारी

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे. महान व्यक्तिमत्व होतं ते. सलाम !

      Delete
  13. वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मला प्रश्न पडला की,स्वातंत्र्य चळवळीच्या ईतिहासावर किती विश्वास ठेवायचा?
    आपआपल्या समुहातील कर्मयोगी पुरूषांचे महात्म्य किंचितही कमी होता कामा नये याची दक्षता प्रत्तेक प्रतिक्रिया लिहिणारा घेत आहे. दोन्ही समुहाचे अस्तित्व या देशात असे पर्यंत हे असेच चालत राहणार, असे दिसते.
    ते थोर महात्मे आज हयात नाहीत. त्यामुळे आता आपण पुन्हा त्यांनी केलेल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा कार्या विषयी कृतज्ञताा व्यक्त करुन प्रतिक्रिया देणे थांबविले पाहिजे.
    सब सुखी हो.... शांती.. शांती... शांती.

    ReplyDelete
  14. सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर राजे शहाजी,राजे शिवाजी व संभाजी यांच्यावर फक्त दोनचार ओळी लिहून पहिल्या बाजीरावपासून राघोबादादांपर्यंतच्या पेशव्यांपर्यंत त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करत पानेच्या पाने लिहितात. शब्दप्रभू म्हणवणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांवर एखादे सोनेरी पान का लिहिले नाही? संभाजीराजांच्या शौर्य ,पराक्रम ,बुद्धिमत्ता ,चिकाटी सहनशीलता आदी गुणांचे वर्णन करायला सावरकरांच्या लेखणीला महापूर यायला हवा होता, पण त्यावर ते अवाक्षरही लिहीत नाहीत.मात्र शिवाजी राजांच्या स्वराज्याची काकतालिय न्याय,आश्चर्यकारक योगायोग अशी अवहेलना करतात.परंतु पेशव्यांना आयते मिळालेल्या स्वराज्याचे तेच जणू काही रक्षक असल्याचे भासवत त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गातात. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीने औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंत ९ वर्ष निकराची झुंज दिली व स्वराज्याचा गड राखला. पण या विरांगनेला या सहा सोनेरी पानात जागाच नाही . सावरकर ताराराणींना अनुल्लेखानेच मारतात, याउलट जिला स्वतःची गढी सुद्धा राखता आली नाही त्या लक्ष्मीबाईंचे भरभरून कौतुक करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवरायांवर अप्रतिम काव्य हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा आणि शिवरायांची आरती काय आपण लिहिलं काय साहेब?

      Delete
  15. कोण हे पेशवे? कसला वाडा, कसली वेगळी गादी नी कसली पगडी साधे सेवकच ते "शिवसंभाजी" महाराजांच्या मेहनतीच्या बळावर असलेल्या स्वराज्याचे हीच काय ती ओळख...बाकी काही नाही.

    ReplyDelete
  16. गटारीमध्ये बोट बुडवुन लेख टाईप केला का रे???सगळा तोच वास येतोय तुझ्या लेखाला...!सावरकरांचे जातीव्यवस्थेवरचे विचार वाचले तरी आहेत का??

    ReplyDelete
    Replies
    1. जा रे... आता आपल्या बुद्धिमत्तेचे दिवे पाजळू नकोस. झोप आली आहे तुला. जा झोप

      Delete
    2. ब्राह्मणी कावा.... महात्मा फुले नी किती अगोदर ओळखलं होत या भट्टाना

      Delete
  17. सावरकरांना लाख लाख प्रणाम ......जयोस्तुते

    ReplyDelete
  18. आता हे विसरले का की सावरकर म्हणाले होते की कुळाच्या ऐवजी आपल्या गुणांनुसार विभागणी केली पाहिजे??😡सावरकर हे तर अगदी स्पष्ट लिहितात!मग ते जातीयवादी कसे?त्यांच्या मित्रमंडळींमध्ये सर्व जातींचे लोकं होते.

    ReplyDelete
    Replies
    1. कामापुरते....

      Delete
  19. असबद्ध लिखाण

    ReplyDelete
  20. वीर सावरकर राहू दे.... फारच अशक्य आहे भाऊ तुला.... फक्त द्वेषाचे राजकारण आणि हिंदू फोड करण्याचा टिपिकल राजकीय कावा ह्या लेखात आहे. आपल्याला मी ओळखत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत इथून तिथून आपले नाते नक्की असणार. कारण अस्पृश्य ता निवारण कार्य अगदी युक्तीने लपवून लेख (लेख म्हणून बाकी लेखकांचा अपमान होतोय) लिहिला आहे आपण

    ReplyDelete
  21. ते फ्रीडम मिडनाईट पुस्तक आणि समलिंगी हे काय लफडे आहे?

    ReplyDelete