Monday, January 24, 2022

समाज क्रांतिकारी भाऊराव पाटील और सत्यशोधक आंदोलन

 


महाराष्ट्र सत्यशोधक मुव्हमेंट का केंद्र रह चुका है। जिसे महात्मा ज्योतिराव फुलेने ब्राह्मणवाद के खिलाफ शुरू किया था। आगे इस आंदोलन को शाहु महाराजने आगे बढ़ाया। लेकिन उनके देहांत के बाद यह आंदोलन कमजोर हुवा। आंदोलन के अनेक नेता काँग्रेस में चले गए। जो नहीं गए वे सक्रिय नहीं रहे। लेकिन फुले और शाहु महाराज के विचार और कार्य को आगे बढ़ाने के प्रयास में एक व्यक्ति आखिरतक कार्यरत था। जिनका नाम है, भाऊराव पाटील।

Monday, January 17, 2022

समाज क्रांतिकारक भाऊराव पाटील व सध्यशोधक चळवळ


महाराष्ट्रात असा कोण भेटेल, की ज्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव माहीत नसावे. महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल ज्याला माहीत नाही, तोच कदाचित नकारात्मक मान डोलावू शकतो. महाराष्ट्राच्या सत्यशोधकीय विचाराचा जागर जो म. फुल्यापासून सुरू होत शाहू राजेंच्या तालमीत जे सत्यशोधक घडले त्यापैकीच एक कर्मवीर भाऊराव पाटील होत. त्यांच्या अंगी शाहूचे धाडस व धोरणीपणा भिनला होता. शाहू राजेंनी जसे वेदोक्त प्रकरणाचे वर्तुळ पूर्ण करून सोडले. त्याच धाडस व कौशल्याने त्यांनी आपली वाट वळविली होती. एकदा त्यांना विहीरीतून अस्पृश्यांना पानी भरू दिल्या जात नाही असे दिसले. ते तेथे गेले, लोकांना समजावून सांगितले. लोक ऐकत नाही असे दिसताच विहीरीचा राहटाच तोडून टाकला होता. इस्लामपूर येथे एका शाळेत अस्पृश्य विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिकत असल्याचे दिसले. त्यांना वेदना झाल्या, त्यांनी सरळ त्या मुलाला उचलून घरी आणले. घरच्या विरोधाला त्यांनी जुमानले नाही. त्या मुलाला रयत शिक्षण संस्थेत शिकविले. तोच पुढे महाराष्ट्राच्या विधान सभेचा पहिला मागास प्रतींनिधी होता. त्याचे नाव होते ज्ञानदेव घोलप.