Friday, May 13, 2022

असा धर्म जिथे देव नाही


देवअल्ला आणि गॉड कुठे आहेतते कसे आहेत? दिसतात कसे? यांना कोणीही पाहिले नसते, परंतु माझी ती आस्था (भावना) आहे आणि माझा त्यावर विश्वास आहे. असे देवाला मानणारी व्यक्ती म्हणत असते. भावनेवर विश्वास असणे म्हणजे नक्की काय? याचे उत्तरही कोणाकडे नसते. अभ्यास न करता केवळ देवावरच्या आस्थेने आयएएस ची परीक्षा पास झालेला व्यक्ती न सापडण्यासारखी भावनेची स्थिती असते. खोटं बोलणं सोपं असतंपण खरं बोलायला हिंमत लागते. जगातील प्रत्येक धर्म ईश्वराशी संबंधित आहे. परंतु जगात असे काही धर्म आणि लोक आहेत, कि ज्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तोच देव आज कुणाची वैयक्तिक मालमत्ता बनला आहे. स्वार्थासाठी त्याला कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनवले गेले आहे. श्रद्धेची हि स्थाने "बार्गेनिंग आणि लुटमारीची" केंद्रे बनली आहेत. पण पुण्य आणि पापाच्या भीतीने लोक गप्प बसतात. येथे चिकित्सक व तर्कवान बुद्धीची उपज होवूच देवू नये याची खबरदारी धर्माच्या ठेकेदारांनी घेतलेली आहे. 

Saturday, May 7, 2022

शाहू राजेंच्या वेदोक्तास टिळकांचा विरोध (भाग १ )


देशात व विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी राजेनंतर राजघराण्यातील  सर्वात जास्त चर्चित व्यक्ती कोणी राहिली असेल तर ती कोल्हापूर संस्थानाचे  राजश्री शाहू  होत. शिवाजी राजे व शाहू राजे यांचे कार्य व विचार पध्दतीमध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राह्मणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राह्मणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर या दोन व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट जाणवतो. ब्राह्मणवर्ग राबवित असलेल्या धर्म व जात सहिंतेवर आघात करणे शिवाजी राजेंना जमले नाही. शाहू राजेंनी मात्र यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. शिवाजीनी मुघलाकडून झालेल्या अपमानाचा समाचार घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्व‍कीयाकडून झालेला अपमान त्यांनी धर्मसहिंतेच्या नावाखाली पचवून टाकला. 

शाहू राजेंच्या वेदोक्तास टिळकांचा विरोध (भाग २)


सन १९१५ मध्ये संकेश्वरच्या शंकराचार्यांनी घोषित केले की, कोल्हापूरचे राजे शिवाजीचे वंशज असून त्यांना वेदोक्तविधीचा हक्क आहे. शंकराचार्याच्या या घोषणेवर टीका करीत टिळक म्हणाले, राजोपाध्ये यांची जखम व दु:ख याचा यत्किंचितही परिणाम शंकराचार्यांवर झालेला दिसत नाही. टिळकांचे हे विधान त्यांच्या जातीयवादी विचारांना व जातीच्या वर्चस्वाला प्रतिबिंबित करणारे होते. टिळक म्हणतात, वेदोक्ताच्या मागणीचे विचार हे पूर्वपरंपरा व इतिहास लक्षात घेता अवनतीचे नी अविचारीपणाचे आहेत. शिवाजी राजेंच्या जातकुळीपेक्षा ज्यांची जातकुळी श्रेष्ठ नाही त्यांनी वेदोक्ताचे खूळ माजवून राजपुरोहिताच्या हक्काचा विनाकारण भंग करावा हे आमच्या मते अगदी गैर आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राम्हण एकाच जातीचे होतील अशी ज्या कोणाची कल्पना असेल तर ती फिजूल आहे. मराठ्यांनी आपले क्षात्रतेज व्यक्त करण्याचा मार्ग वेदोक्त मंत्राने श्रावणी करणे हा नव्हे. त्यांच्या घरच्या क्रिया वेदोक्तांनी झाल्याने त्यांना विशेष महत्ती प्राप्त होईल, असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. यात काही भूषण नाही.  वेदोक्त मंत्रासाठी जर शाहू आपला हेका कायम ठेवत असतील तर त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसून येऊन महाराष्ट्रात मोठी खळबळ उडून जाईल. त्यासाठी  शाहूनी ब्रह्मवृंदाचे म्हणणे ऐकावे व त्याप्रमाणे वागावे असे म्हटले. 

Wednesday, May 4, 2022

डॉ. आंबेडकराच्या पुतळ्यांचा द्वेष हि एक रोगट मानसिकता



आपल्या भारतात ज्याचे देशाच्या सार्वभौम उभारणीमध्ये मोठे योगदान आहे, ज्यांनी या देशाला सूत्रबध्द ठेवण्यासाठी राज्यघटना लिहिली, ज्यानेमी प्रथमत: भारतीय व अंतिमत: भारतीयचअशी घोषणा करून या मातीत जन्मास आलेला बौध्द धर्म स्वीकारला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याच्या घटना घडत असल्याचे दृष्टीपथास येते. डॉ. आंबेडकरांचे पुतळे हे सरकार, सामाजिक संस्था आणि मागासवर्गीय वंचित समाजाकडून उभारले जातात. स्वातंत्र्यानंतर हा भारत मुलत: प्रोग्रेसिव्ह विचाराचा देश म्हणून उदयास आला असला तरी त्याने ३००० वर्षापासून आर्य वैदिक ते  ब्रिटीशकालीन पाश्च्यात्य संस्कृतींना आपल्यात सामावून घेतले आहे. भारताच्या या सर्वगामी संस्कार संस्कृतीमुळे त्याला जगात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. असे असताना सुध्दा भारताला कट्टर धर्मांधता व व्यक्ती द्वेषाच्या शापाने कवटाळलेले दिसते. भारताच्या मानगुटीवर बसलेल्या या शापांचा पराभव करणे हे प्रत्येक भारतीयांचे नैतिक कर्तव्य बनले आहे.