बापू राऊत / Bapu Raut
Tell the slaves he is slave and he will revolt
Wednesday, April 8, 2026
सम्राट अशोक के सांस्कृतिक इतिहास की उपेक्षा: ऐतिहासिक विस्मृति या एक राजनीतिक-सांस्कृतिक साजिश?
Neglect of Emperor Ashoka’s Cultural History: Historical Amnesia or a Political–Cultural Strategy?
Emperor Ashoka holds an undisputed place in Indian history as one of the
most influential and ethically grounded rulers. The boundaries of his empire
extended across almost the entire Indian subcontinent. This vastness is evident
from available inscriptions, pillar edicts, and archaeological evidence. The
vision, principles of governance, and the concept of Dhamma expressed in
Ashoka’s edicts are still considered ideal for modern statecraft. He placed non‑violence
and equality at the centre of political philosophy and granted moral authority
to the people. Under his rule, India had become a Vishwaguru for the
world.
Yet today, the Indian state and Brahminical cultural establishment
continuously push Ashoka to the margins of mainstream history. His birth
anniversary and his contributions are routinely ignored by government and
cultural institutions.
Thursday, April 2, 2026
सम्राट अशोकाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष: ऐतिहासिक विस्मरण कि राजकीय-सांस्कृतिक रणनीती?
भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि नैतिकतेवर आधारित म्हणून
सम्राट अशोकाचे स्थान निर्विवाद आहे. त्यांच्या राज्याच्या सीमा भारतीय
उपखंडाच्या जवळजवळ संपूर्ण भागावर पसरल्या होत्या.
उपलब्ध शिलालेख, स्तंभलेख आणि पुरातत्त्वीय
पुराव्यांवरून त्याचा विस्तार दिसतो. अशोकाच्या शिलालेखांमध्ये व्यक्त झालेली
दृष्टी, शासनतत्त्वे आणि ‘धम्म’ ही
संकल्पना आजही आधुनिक राज्यकारभारासाठी आदर्श मानली जाते. त्याने अहिंसा आणि
समतेला राजकीय तत्त्वज्ञानाचे केंद्र बनवले आणि प्रजेला
नैतिक अधिकार दिला. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारत जगात विश्वगुरु बनला होता. तरीही, आजची भारतीय
राजसत्ता आणि ब्राम्हणी सांस्कृतिकशाही
अशोकाला इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून सतत बाजूला ठेवीत आहे. अशोकाची जयंती व त्याच्या कार्यावर शासन व सांस्कृतिक विभागाकडून
सतत दुर्लक्ष होत आहे.
Wednesday, March 25, 2026
बौद्ध धम्मातील अहिंसा : तत्त्व आणि व्यवहार
प्रस्तावना
अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. परंतु याचे कठोर विश्लेषण
केल्यास कोणताही धर्मज्ञ व उपासक त्यांचे तंतोतंत पालन करण्यास अक्षम्य असतो. कारण
कळत न कळत प्रत्येकाच्या हातून हिंसा होत असते. जसे कि रस्त्याने चालताना
कोणाच्याही पायाखाली सूक्ष्मजीवजंतू येवून त्यांचे मरणप्राय होणे.परंतु बौद्ध
धम्मात अहिंसेकडे बघण्याचा अर्थ व परिस्थितीनुसार त्याचा दृष्टीकोन एका वेगळ्या
स्वरूपाचा आहे. तो कसा आहे ? हे बघितले पाहिजे.
Monday, March 23, 2026
भारतीय न्यायव्यवस्थेतील ढासळत्या तटस्थतेचा उलगडा
सिंगापूर
मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनपत्राने
भारतीय न्यायव्यवस्थेतील अस्वस्थ करणारे वास्तव उघड केले आहे. “Jobs for
Justice(s): Corruption in the Supreme Court of India” या शीर्षकाच्या ३४ पानी संशोधनात १९९९ ते २०१४ या काळातील ६५२
प्रकरणांचे विश्लेषण करून एक धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. या शोधपत्राचे याचे
लेखक आहेत माधव एस. अणे, शुभंकर दाम, आणि जियोवानी.
जरी हे संशोधनपत्र २०२१ मध्ये प्रकाशित झाले असले, तरी त्यात मांडलेल्या समस्या आजही तशाच आहेत. अनेक प्रकरणांचे निरीक्षण केल्यानंतर संशोधकांना असे आढळले की सुप्रीम कोर्टातील काही न्यायाधीश निवृत्तीनंतरच्या सरकारी पदांच्या लालसेने प्रभावित होतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये सरकारकडे झुकाव दिसतो.. याचा अर्थ असा की त्यांच्या मनात न्यायापेक्षा निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पदाची अपेक्षा जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रकरणांमध्ये सरकारला अनुकूल निर्णय देण्याची प्रवृत्ती वाढते
Sunday, January 25, 2026
Maharashtra Municipal Corporation Elections: A challenge for the opposition.
According to these results, the
opposition’s strength is concentrated mainly in Latur, Vasai–Virar, Chandrapur,
Malegaon, Parbhani, and Bhiwandi–Nizampur municipal corporations, where they
may elect their Mayor. However, this cannot be considered easy. Observing the
functioning of the ruling parties in Maharashtra, it is evident that even in
corporations where they lack a majority, they will attempt to install their own
mayor. Through the use of “saam, daam, dand, bhed,” newly elected opposition
corporators may be influenced—something that has now become a familiar pattern
in the country. The anti-defection law has become ineffective, resembling a
toothless United Nations. Courts too appear largely unmoved in such matters.
महाराष्ट्र नगरपालिका चुनाव: विरोधियोंके के लिए एक चुनौती
Friday, January 23, 2026
महानगरपालिकेचे निवडणूक निकाल: विरोधी पक्षासाठी एक इशारा
महाराष्ट्रातील
विविध महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यात मुख्यत्वाने भारतीय जनता
पक्षाने बाजी मारलेली आहे. महापालिकेत एकूण
२८६९ नगरसेवक संख्या असलेल्या पक्षनिहाय नगरसेवकांची पक्षनिहाय स्थिती पुढील
प्रमाणे आहे. भाजप १४५९ जागा, शिवसेना शिंदे गट ३९९, कॉंग्रेस ३२४, राष्ट्रवादी
अजित गट १६७, शिवसेना ठाकरे गट १५५, एम आय एम ११४, शरद पवार गट
३६, मनसे १३,बसपा
०६, अपक्ष १९ व
छोटे पक्ष २१५. आलेल्या निकालानुसार विरोधकांचे
संख्याबळ मुख्यत्वे लातूर, वसई-विरार, चंद्रपूर, मालेगाव, परभणी भिवंडी-निजामपूर
या महानगरपालीकामध्ये असून तेथे ते
सत्ताधारी बनू शकतात परंतु हे सोपे व अधिक सहज आहे असे म्हणता येत नाही. महाराष्ट्रातील
सत्ताधारी पक्ष, नेते व कार्यकर्ते यांची स्थिती बघितली तर बहुमत नसलेल्या महानगरपालिकेमध्ये
सुध्दा स्वत:चा महापौर बनविण्याची त्यांची रणनीती असेल. साम, दाम, दंड, भेद ह्या नीती
वापरून विरोधी पक्षाचे नवनियुक्त नगरसेवक त्यांच्या गळाला लागतील, देशाच्या हे आता
अंगवळणी पडले आहे. पक्षांतर बंदी कायदा हा निष्प्रभ झालेला असून त्याची अवस्था बिन
दाताच्या युएन (UN) सारखी झाली आहे. आपली
न्यायालये अशा प्रकरणावर स्थितप्रज्ञ असल्याचे दिसून येते.
Friday, November 21, 2025
डॉ. आंबेडकरांचा भारतीयांना इशारा..“ संविधानाला दुर्लक्षित केल्यास, लोकशाही धोक्यात”
Friday, August 29, 2025
वारकर्यांच्या विठ्ठलाचे हिंदुत्वीकरण !
पंढरपूरचा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणून
ओळखला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणार्याला वारकरी म्हणतात. हि वारी
सर्वसमावेशक समतेच्या प्रवासाची असते. या वारीत कुणबी, मराठा, महार ब्राम्हण,
माळी व धनगर सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र चालतात. हा लोकसमतेचा जिवंत प्रयोग असतो.
संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई आणि मुक्ताई यांच्यासारख्या
अनेक संतांनी उभारलेली वारी परंपरा लोकसामान्यांची परंपरा बनली असून वारकरी संप्रदाय
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा वारकरी
संप्रदाय प्रेम, समता, भक्ती आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा
आहे, तर पंढरपूरचा विठोबा आपल्या भक्तांचा
निर्विवाद असा लाडका देव व सखा असून त्याचे अधिष्ठान जाती व धर्मव्यवस्थेच्या
पलीकडील समतेचे आहे.
Monday, July 28, 2025
पंढरपूरचा विठ्ठल आहे तरी कोण ?
आषाढी महिन्यामध्ये महाराष्ट्रात वारकरी समुदाय नाचत गाजत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो. दरवर्षी जेव्हा विठ्ठलाच्या वारीचा काळ येतो तेव्हा नेमका विठ्ठल आहे तरी कोण? यावर प्रश्न निर्माण होवून बौद्धिक चर्वण सुरू होते. आता तर सोशल मिडीयाचा जमाना आहे, त्यामुळे वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता सोशल मिडीयावर विस्तारित चर्चा होवू लागली आहे.
Thursday, July 3, 2025
लद्दाख: लेह से पॅगोंग लेक व्हाया नुब्रा वॅली (एक अविस्मरणीय सफर)
लद्दाख की
राजधानी लेह इस यात्रा का प्रारंभिक बिंदु है। लेह एक ऐतिहासिक और सांस्कृतिक
केंद्र है, जहां
बौद्ध मठ, पुराने महल और स्थानीय बाजार देखने को
मिलते हैं। लेह पैलेस, शांति
स्तूप और थिकसे मोनेस्ट्री यहां के प्रमुख आकर्षण हैं। यहां से यात्रा की शुरुआत
करने से पहले पर्यटकों को ऊंचाई की समस्या (एएमएस) से बचने के लिए कुछ दिन आराम
करने की सलाह दी जाती है।
लद्दाख: लेह ते नुब्रा व्हॅली मार्गे पँगोंग सरोवर (एक अविस्मरणीय प्रवास)
लद्दाख हे भारतातील एक अद्भुत आणि मोहक पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या उंच पर्वत, निळे तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देतो. लेह ते पँगोंग सरोवर, जो नुब्रा व्हॅलीमधून मार्गे जातो, तो एक रोमांचक आणि संस्मरणीय प्रवास आहे. या प्रवासात पर्यटकांना लडाखची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांचक मार्गांचा आनंद घेता येतो.
लद्दाखची
राजधानी लेह हे या प्रवासाचा प्रारंभ बिंदू असला तरी लेह ला श्रीनगर मार्गेही जाता
येते. लेह हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, येथे बौद्ध मठ, जुने राजवाडे आणि स्थानिक
बाजारपेठा पाहता येतात. लेह पॅलेस, शांती स्तूप आणि ठिक्से मठ हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. लेह
मधून पुढे प्रवास सुरू करण्यापूर्वी, उंच लद्दाखमध्ये पर्यटकांना ऑक्सीजन
लेवलसोबत जुळवून घेण्यापासून एक वा दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.
Thursday, June 26, 2025
लद्दाख येथील बौध्द धर्म: उगम व प्रसार
Saturday, June 21, 2025
लद्दाख में बौध्द धर्म
आज के समय लद्दाख
भारत का एक केंद्रशासित प्रदेश है। जब जम्मू काश्मीर पूर्ण राज्य के स्वरूप में
था, तब लद्दाख जम्मू काश्मीर का अभिन्न अंग था। लद्दाख सामरिक दृष्टी से भारत का
महत्वपूर्ण प्रदेश है। क्योकि लद्दाख की सीमाए भारत के अंतर्द्वंदी पाकिस्तान और
चीन के साथ जुडी है। भारत के स्वतंत्रता के बाद लद्दाख को हड़पने का प्रयास
पाकिस्तान ने १९४८ में, तथा चीन द्वारा १९६२ में किया गया था। लेकिन लद्दाखवासियोने भारतीय सेना का
साथ देकर १९७१ के युध्द में पाकिस्तान के बाल्टिस्तान क्षेत्र से तुरतुक और थांग
का भूभाग वापिस ले लिया। लद्दाखवासियोंको भारत के प्रति अपनापन एंव जो श्रध्दा रही, वह अद्वितीय है।
इसका मुख्य कारण भारत गौतम बुध्द की कर्मभूमि होना एंव लद्दाख के लोगो में बौध्द
धर्म के प्रति दृढ़ आस्था रहना है। लद्दाख में इसाई धर्म के प्रसार के लिए ब्रिटिश, जर्मन, इटली एंव
हंगेरी से इसाई मिशनरी आये। उन्होंने यहाँ पहले लद्दाखी एंव तिब्बती भाषा सीखकर
बौध्द धर्म को जाना। लद्दाखी -अंग्रेजी और जर्मनी शब्दकोष बनाए।
Thursday, April 17, 2025
युगप्रवर्तक: मान्यवर कांशीराम
कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद व प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना व एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय लढे हे एकाच वेळेस व एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता व सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.
Tuesday, April 15, 2025
संभाजी महाराजाचे खरे शत्रू कोण?
चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या “छावा” कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या व भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात व त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस स्वार्थी व राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
Wednesday, February 12, 2025
प्यू रिसर्च सर्वे: जगभरात वाढत्या धार्मिक राष्ट्रवादाची दाहकता
अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४ पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.








