Monday, November 7, 2011

फार्म्युला वन स्पर्धा आणी मायावती


काही दिवसपूर्वीच देशाच्या राजधानी मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा केंद्र सरकार, दिल्ली सरकार व दिल्ली महापालिका यांच्या अधिपत्याखाली झाल्या. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून दिल्ली महापालिकेपर्यंत अनेक सरकारी संस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राबत होत्या. तरीही स्पर्धा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत मुख्य स्टेडियमची रंगरंगोटीही पूर्ण झालेली नव्हती. खेलग्राममध्ये भटकी कुत्री होती, शिवाय खेळाडूंच्या शयनगृहांमध्ये साप आणि विंचूही म्हणे होते. स्टेडियमकडे जाणारा पूल पंधरवडाभर अगोदर कोसळला. स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमचे छत गळू लागल्याची दृश्ये टीव्हीवर दिसली. या ढिसाळ कारभारामुळे अनेक देशांनी सहभागी होण्यास ऐनवेळी नकार दिला. त्यामुळे देशाची मान जगात ताठ होण्याऐवजी कमालीची मानहानी झाली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुरेश कलमाड़ी आजही तिहारच्या तुरुंगात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या स्पर्धा  भारतात होणार नाहीत अशी आंतरराष्ट्रीय समजूत होती. याचा विचार करता एफ वन कार रेस आयोजित करने हे एक दिवास्वपनच होते. रेससाठी आवश्यक असा अत्युत्कृष्ट बनावटीचा ट्रॅक भारतात कसा व कुठे होणार, इथपासून ते  स्पर्धाकाच्या राहण्याची व्यवस्था कुठे करणार शिवाय रेस पाहण्यासाठी येणार्‍या लाखभर प्रेक्षकांसाठी येण्या-जाण्याची व भोजनाची सोय कशी होणार, हा प्रश्न होताच. शिवाय केंद्र सरकार कट्टर मायावती विरोधी तसेच प्रसारमाध्यमे मायावती विरोधात टीका करण्याच्या संधि नेहमी शोधत असतात अशा वेळेस मायावतींने शिताफीने पावले टाकराष्ट्रीय कंपन्यां मार्फत केंद्र सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय ही स्पर्धा उत्तर प्रदेशात आणून कमालीची यशस्वी करून दाखवत आपल्या प्रशासकीय चातुर्याचेही दर्शन सा-या देशवाशीयाना घडवले. मायावतीं च्या यशस्वीतेमुळे विरोध करणारी माध्यमे आणि राजकीय पक्ष यांचे चेहरे कोमेजल्यासारखे झाले आहे विशेषता युवराज राहुल गांधी यांचा.
उत्तर प्रदेशचं एक टोक म्हणजे ग्रेटर नोएडा आणी हे ग्रेटर नोएडा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्टारडम. ग्रेटर नोएडा प्रमाणेच मायावतीने उत्तर प्रदेशातील काही शहरे नव्या स्वरूपात विकसित केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग व रस्त्यांचा विकास झालेला आहे. परंतु मायावतीच्या चांगल्या गोष्टी दाखविन्यास प्रसारमाध्यमे घाबरतात. मायावतीला नेहमी शूर्पनखेच्या स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येतो एवढा जातीयवाद या प्रसरमाध्यमाच्या मालक व पत्रकारामध्ये भरला आहे. उत्तर प्रदेशात नोंदल्या गेलेला क्राइम रेकॉर्ड दाखविण्यात प्रसारमाध्यमे फारच उत्सुक दिसतात. वास्तविक हकीकत अशी आहे की, कांग्रेस व समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात भीतिमुळे दलित तक्रार दाखल करीत नसत व तक्रार दाखल केलिच तर त्याची नोंद घेतल्या जात नसे परंतु मायावतीच्या कार्यकाळात   दलिताना कसल्याच प्रकारची भीती वाटत नसल्यामुळे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची लगेच नोंद होत असल्यामुळे गुन्हयाची नोंद अधिक झालेली आहे. परंतु याची नोंद घेण्याईतपतचा समजूतदारपना देशवाशियांच्या मानसिकतेत निर्माण झाला नाही हे एक दुर्दव्यच आहे. फार्म्युला वन या स्पर्धेचा प्रारंभ म्हणून हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सचिन तेंडुलकरला निमंत्रित करण्यात आले होते तर ग्रेटर नोएडा च्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट वर स्पर्धेचा विजेता विटेल ला बक्षीस  मुख्यमंत्री मायावतींच्या हस्ते देण्यात आले. यातही प्रसारमाध्यमानी आपली पक्षपाती भूमिकेचे दर्शन घडविले. सचिन तेंडुलकरचे स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविन्याच्या प्रसंगाचे वारंवार प्रसारण करण्यात आले परंतु मायावतीच्या बक्षीस वितरनाच्या कार्यक्रमाचे प्रसारण मात्र त्या प्रमाणात दाखविण्यात आले नाही.
मायावतीच्या कर्तुत्वाचे अनेक आंतरराष्ट्रीय विद्वानानी प्रंशसा केली आहे तसेच मायावतीच्या कर्तुत्वाची दखल भारतात घेतल्या जात नाही याची खंत सुध्दा व्यक्त केली आहे.शोभा डे या लेखिकेने फार्म्युला वन या स्पर्धेच्या आयोजनाचे भव्य स्वरूप बघून मायावतीच्या कार्याचे कौतुक केले तसी हिंमत इतरानी दाखविली नाही.
                                                          
                                     

No comments:

Post a Comment