आज भ्रष्टाचार सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. देशात भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली असून जनता भ्रष्टाचारामूळे त्रस्त झालेली आहे.प्रत्येक भारतीयाला त्यापासूनमुक्ति हवी आहे.भ्रष्टाचाराचा राक्षस देशाचा सत्यानाश करीत आहे हे आता लोकाना चांगलेच कळलेले आहे. परंतु कोणीही पुढे येऊन या भ्रष्टाचार व भ्रष्टाचा-या विरूध्द बोलण्याची हिंमत करीत नाहीत . लोक स्वत: पुढे येऊन याचा विरोध करणार नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणार नाही हे तेवढेही सत्य आहे. भ्रष्टाचाराची मुळे नष्ट करण्यासाठी लोकानाच पुढे यावे लागेल
देशात एकामागुण एक भ्रष्टाचाराची बिंगे फुटत आहेत. राष्ट्रकूल क्रीडा घोटाला टू जी स्पेक्ट्रम, आदर्श हाउसिंग रेड्डी बंधु खान प्रकरण,येदुएरुप्पा प्रकरण. भ्रष्टाचार करना-यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. केवळ तात्पुरती कार्यवाही केली जाते. परंतु त्यानी जमविलेल्या संपत्तीवर कसल्याही प्रकारची टाच आणल्या जात नाही. आपल्याकडे सीबीआय व सिविसी ह्या तपास संस्था आहेत. ह्या संस्था सत्ताधारी पक्ष व सरकारच्या अखत्यारी खाली काम करीत असल्यामुळे ह्या संस्था जनतेला न्याय देण्यास अक्षम ठरलेल्या आहेत. आमदार, खासदार, मंत्री व काही शासकीय अधिकारी रात्रीतुन करोड़ोपती होत आहेत. मंत्री व अधिकारी हे खाजगी कंपण्याना फायदा पोहोचविण्यासाठी अधिक कार्यरत असताना दिसतात. देशातील तिनसे ते चारसे कुटुंबानीच देशावर ताबा घेतल्याचे दिसते. लोकशाहीच्या आत्म्याला काय वाटते याची काळजी लोकशाहीच्या या ठेकेदाराना मूळीच वाटताना दिसत नाही.
अण्णा हज़ारे नावाच्या फकीराने सत्ताधारी करीत असलेल्या भ्रष्टाचारावर लगाम कसण्यासाठी उपोषनाची हाक दिली . अण्णा हजारेच्या समर्थनार्थ लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागने म्हणजेच देशाचा कायदा बनविना-या संसद सदस्याना देशातील जनतेने दाखवून दिले आम्ही केवळ तुम्हाला व्होट देण्यापुरते मर्यादित नाही तर आम्ही तुम्ही बनविता ते कायदे आमच्या हिताचे आहेत की नाही याची आम्ही चाचणी करणार आहोत याचा तो गर्भित इशारा आहे.
No comments:
Post a Comment