Sunday, October 28, 2012

सत्यनारायण पूजा ही भट-ब्राम्हणाची रोजगार हमी योजना


देशात सत्यनारायणाच्या पूजेचे स्तोम सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे व बहुजनांच्या घरोघरी पसरलेले दिसते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सत्यनारायनाचे  लोन सगळीकडे पसरले असून त्याची झळ मात्र गरिबांनाच जास्त बसत आहे. सत्यनारायणाच्या या पूजेत गरीब पूर्णपणे पोळून निघत आहे तरीही तो भीतीपोटी कर्ज काढून घरी पूजा घालतो. तर माध्यम वर्ग प्रतिष्ठेच साधन म्हणून सत्यनारायणाच्या पुजेकडे पहात असतो.

Tuesday, October 23, 2012

कोल्हापूरचा शाही दसरा हा जातीसंस्थेचे मूर्तिमंत उदाहरण


कोल्हापूर येथे दरवर्षी शाही दसरा साजरा करण्यात येतो. याला कोल्हापूरच्या राजघराण्याचा आशीर्वाद असून राजघरान्यासाठी तो प्रतिष्ठेचा मानला जातो असा समज आहे. या दस-याला काही लोक सामाजिक एकतेचा आशियाना समजतात. त्यात कोल्हापूर राज संस्थांनचे वारस असलेले  संभाजी राजे  हा सामाजिक आशय फुगउन सांगतात. दस-याचा सोहळा म्हणजे सर्व जातीधर्माना  मानाच स्थान मिळवून देणारा सण असे संभाजी राजे मानतात. वास्तविकत: जातीची चौकट अधिक मजबूत करीत त्या त्या जातीने आपल्याला पूर्वपरंपरेने नेमून दिलेले काम इमानईतबारे करीत राहण्याचा तो दर्शन सोहळा आहे. या शाही दस-यात बारा बलुतेदारांना मानाच स्थान देण्यात येते असे संभाजी राजे गर्वाने सांगतात.  पण या गर्वात जातीसंस्था जपण्याचा दर्प स्पष्ट दिसतो हे मात्र  ते सोईस्करपणे विसरलेले दिसतात.
या दसरा सोहळ्यात बक-याचा बळी दिला जातो. यात बक-याची मान कापायचा मान गायकवाड घराण्यास मिळतो. दसरा सोहळ्याची पालखी हरिजन वस्तीत नेली जाते. या सोहळ्यात वाजंत्री वाजविण्याचा मान कोरवी समाजाला देण्यात येतो तर पालखी उचलण्याचा मान भोई समाजाचा आहे. तर पूजेचा मान राजोपाध्ये या ब्राम्हण समाजाकडे आहे.यात जातीची उतरंड स्पष्ट दिसते.
सोहळ्याचा हा क्रम बघितला तर सामाजिक परिवर्तनाला यात पूर्णपणे डच्चू देण्यात आला आहे. त्या त्या जातीचा जातीनिहाय व्यवसायानुरूप या सोहळ्याची  कामे वाटून दिलेली आहे.
राजश्री शाहू महाराजांना त्या धकाधकीच्या काळात कदाचित या सोहळ्याच्या  कार्यक्रमात बदल केला नसेल. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य व परीवर्तानांच्या वैचारिक  तक्त्यात हा सोहळा कुठेही बसत नाही. त्यामुळे  शाहू महाराजाच्या विचाराच्या कोल्हापूरवासीयांनी या दसरा सोहळ्याला सामाजिक एकतेचे प्रतिक मानू नये कारण या सोहळ्यात समानतेचा साधा लवलेशही आढळत नाही.

                                                                                                                      बापू राऊत 

Thursday, October 18, 2012

Is Kejriwal a wild card in Indian politics?



Since he announced the formation ation of his political party on October 2, Arvind Kejriwal has gone on to set the political agenda, hogging headlines day after day. He has proved all those who dismissed him as a spent force, after his break with Anna Hazare, wrong.Kejriwal has shown an understanding of the popular mood among the urban middle class. The more he ups the ante against politicians, the more people love him. Such is the environment in the country that any charge, right or wrong, against any politician sticks.His first “political” act,  to take on

Wednesday, October 10, 2012

अण्णांचा गुप्त आशीर्वाद -योगेन्द्र यादव


अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षात अण्णा हजारे सामील झाले नसले तरी त्यांनी हा पक्ष स्थापन करणार्‍यांना एक मंत्र दिला आहे. हा मंत्र म्हणजे त्यांनी पक्ष स्थापण्याच्या प्रयत्नांबाबत उपस्थित केलेले काही प्रश्न आहेत. हे प्रश्न आमजनतेच्या मनातलेच आहेत. या प्रश्नांची उत्तरे देणे तसे त्रासदायक आहे, पण शेवटी अण्णांचे हे प्रश्नच या पक्षाच्या नव्या राजकारणाला योग्य दिशेने घेऊ न जाणारे आहेत. हे प्रश्न म्हणजे नव्या पक्षाला अण्णांनी दिलेला जणू गुप्त असा आशीर्वादच आहे.

Thursday, October 4, 2012

ईश्वर, धर्मबजार व माझे आस्तीकपन

ईश्वर व धर्म हे दोन असे गुळगुळीत शब्द आहेत की ज्या शब्दाविरोधात गरीब, श्रीमंत, अशिक्षित व शिक्षित सारेच बोलण्यास घाबरतात. ईश्वराविरोधात बोललो तर माझ्यावर व कुटुंबावर कोणते संकट तर येणार नाही ना?. या भीतीनेच त्यांच्या मनाची चाळन होत असते. ईश्वराविरोधात बोलण्यास बहुतांश जनता पुरती घाबरत असते. असा हा ईश्वर आहे तरी कोण?. तो दिसतो तरी कसा?. तो कसा निर्माण झाला?. या प्रश्नाच्या मुळाशी सहसा कोणी जात नाहीत. तरीही देवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत काहींनी देवाला नाकारले होते. चार्वाक या प्राचीन