संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडून लांब दरीत फेकून दिल्याचे बातम्या मध्ये कळले. या वाघ्या कुत्र्याचा व शिवाजी महाराज यांचा कोणताही सबंध नव्हता.त्यांच्या संबंधाची कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात नोंद नाही.तरीही मनुवाद्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर उभारला होता. रायगडावरून तो पुतळा काढून टाकावा असी संभाजी ब्रिगेड सारख्या दुस-या संघटनांचीही मागणी होती. परंतु खोट्या इतिहासावर जगणा-या सरकारला ते कळणार तरी कसे?. मनुवाद्याच्या सल्ल्यानुसार वागणा-या या सरकार ने कधीच वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावरून काढला नसता.
संभाजी ब्रिगेडने केलेले हे कार्य म्हणजे मनुवाद्यांनी चुकीचा इतिहास लिहून त्यांची प्रतीके पुतळ्याचा स्वरुपात उभी करून बहुजन समाजातील लोकाच्या मनावर खोटा इतिहास कोरण्याच्या कृत्याला दिलेले प्रतिउत्तर आहे. संभाजी ब्रिगेडने मानुवाद्यांना दिलेली मोठी चपराक आहे.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कार्याला माझी सलामीच आहे.आता सरकार शिवसेना ,भाजपा व नवनिर्माण सेना या ब्राम्हण धार्जिण्या पक्षाच्या मागणी नुसार कदाचित ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक होईल तसेच वाघ्या कुत्र्याचा पुतळा कदाचित पूर्ववत बसविन्यातही येईल. असे असले तरी संभाजी ब्रिगेडने केलेल्या साहसाचे दूरगामी परिणाम होतील. हे परिणाम म्हणजे बहुजन समाजाला ख-या इतिहासाची ओळख होईल.
वाघ्या कुत्र्या संदर्भात धनगर समाज संवेदनशील आहे. परंतु धनगर समाजातील विचारवंत व बुध्दिवांतानी आपल्या समाजाला खरा इतीहास व मनुवाद्याचे कुटील मनसुबे पटवून द्यावेत.शिवसेना , महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सोबत असलेला बहुजन समाज व बहुजन समाजातील कार्यकर्ते हे बिनडोक्याचे असतात.ते फक्त वरून आलेल्या आदेशाचे मुकाट्याने पालन करतात.या पक्षाचे ब्राम्हणी धार्जिणे नेते स्वार्थाची चीनगारी टाकून समाजमन पेटवून टाकीत असते. त्यांचा प्रभाव असलेल्या बहुजन समाजावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. ते वाळलेल्या गवतासारखे पेटून उठतात व दुस-यांचे जीवन नष्ट करीत सुटतात. अशा बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची बहुजन समाजातील विचारवंतावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते.
शेवटी
शाब्बास संभाजी ब्रीग्रेड
बापू राऊत ९२२४३४३४६४
तुमचे लेखन उत्तम आहे.
ReplyDeleteग्रेस आणि वाघ्या या विषयावरील लेखांच्या लिन्का आम्ही ‘अनिता पाटील विचार मंच'वर शेअर केल्या आहेत. ‘हे सुद्धा वाचा' या हेडखाली आम्ही पुरोगामी विचारांच्या ब्लॉगवरील उत्तम लेखांच्या लिन्का आमच्या ब्लॉगवर देत असतो. त्यात तुमच्या या लेखांच्या लिन्का देण्यात आल्या आहेत.
तुमच्या लेखनाला शुभेच्छा.
||संपादक मंडळ, अनिता पाटील विचार मंच||
haaaaaaadddddddddddddd
ReplyDelete