Saturday, June 27, 2020

शाहू राजेंच्या "वेदोक्तास" टिळकांचा विरोध


देशात व विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी राजेनंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी राहिली असेल तर ती कोल्हापूर संस्थानाचे “राजश्री शाहू” होत. शिवाजी राजे व शाहू राजे यांचे कार्य व विचार पध्दतीमध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राह्मणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राह्मणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर या दोन व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट जाणवतो. ब्राह्मणवर्ग राबवित असलेल्या धर्मसहिंतेवर आघात करणे शिवाजी राजेंना जमले नाही. शाहू राजेंनी मात्र यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. शिवाजी राजेंनी मुघलाकडून झालेल्या अपमानाचा समाचार घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्व‍कीयाकडून झालेला अपमान त्यांनी धर्मसहिंतेच्या नावाखाली पचवून टाकला.

Wednesday, June 10, 2020

सुधारकांच्या कथनी व करणीतील दांभिकता


हिंदू समाज धर्मग्रस्त तर होताच पण त्याहीपेक्षा धर्माचरणाने भयंकर विकृत रूप धारण केले होते. स्वधर्मीयाबद्दलची सहिष्णुता सुद्धा लोप पावली होती. मानवतेला काळिमा फासणार्‍या गोष्टी होत होत्या. अन्याय व अत्याचाराच्या पर्वात समाजाचा काही भाग जगत होता. अशा समाजांचे अधिकार गोठविण्यात आले होते. अनिष्ट रूढीना धर्म व शास्त्राची मान्यता लाभली होती. त्याहीपेक्षा राजकारण करणारे पूर्वगौरववादी व कर्मठ असल्यामुळे अत्यंत अमानवीय अशा वाईट प्रथाही त्यांच्यासाठी गौरवाच्या झाल्या होत्या. सतीची चाल, विधवावरील जुलूम, बालविवाह, मुलींची विक्री, केशवपन, मूर्तिपूजेचे स्तोम, स्त्रीशिक्षणावर बंदी, ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाच्या शिक्षणावर बंधने, अस्पृश्य वर्गाचे गावकूसाबाहेरचे दरिद्री जीवन आणि अंधश्रध्दांच्या महापुराने मानवी जीवनाला विळखा घातला होता. ह्या अमानवीय प्रथा व पध्दतीचा विरोध करण्यासाठी सुधारकांचा गट पुढे आला होता. या सुधारकांनी धर्मशास्त्रातील कलमांची उकल करून त्यातील अंतर्भाव लोकास सांगण्यास सुरू केले. त्यांनी इंग्रज सरकारकडे सुधारणासाठी नवे कायदे करण्याची मागणी केली. परंतु या सुधारकांना विरोध करण्यासाठी काही दुर्धारक समोर आले होते. या दुर्धारकांचे नायक होते विष्णुशास्त्री चिपळूणकर व बाळ गंगाधर टिळक.