मंडल आयोग म्हणजे काय? याचे सरळ उत्तर द्यायचे
झाल्यास, मंडल आयोग हा धर्मामुळे मृतप्राय झालेल्या ओबीसीचा, त्यांची सामाजिक,
सांस्कृतिक व राजकीय क्षती बघण्याचा आरसा होय. ओबीसीमध्ये सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्याची
मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक
दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या दुरावस्थेला कारणीभूत असल्याची जाणीव प्रथमताच मंडल
आयोगामुळे झाली.