गटातटांचे चौकीदार हे केवळ स्वत:च्या हितापुरतेच अधिक सजग असल्याचे
दिसतात. गल्लीबहाद्दूर ते देशबहाद्दूर असे या चौकीदारांचे स्वरूप असते. आपापल्या
अस्तित्वासाठी गटातटांचे चौकीदार काही सीमित आंदोलने करतात. परंतु या आंदोलनातून
त्यांच्या चमकूगिरीशिवाय काहीही साध्य होत नसते. साध्य होतो तो केवळ स्वत:चा
बार्गेनिंग पावर (वसूली शक्ति). अशा गटातटांची आंदोलने चिरडले जाऊन अनेक तरुणांचे भवितव्य व कुटुंबे देशोधडीस
लागत असतात. नंतर बळी पडलेल्या कुटुंब वा व्यक्तींची कोणीही काळजी घेत नाही. कारण
त्यासाठी कोणाकडेही आर्थिक सक्षमता नसते.
बहुजनांच्या आंदोलनात सक्षमता आणन्यासाठी एकतेची गरज आहे. ध्येय व साध्य याचा ध्यास असावा लागतो. सक्षम बनण्याचे मिशन व त्याच्या प्रचार व प्रसारासाठी बुध्दिवादी व ध्येयवेडे मिशनरी आवश्यक असतात. हेच मिशनरी क्रांतिचे व नवनिर्मानाचे वाहक व चालक बनत असतात. बहुजनांच्या आंदोलकांनी व पक्षांनी आपल्या प्रचारात देश व राष्ट्रवाद या गोष्टी आणल्या पाहिजेत. यासाठी सनातण्यांचा प्रचलित राष्ट्रवाद व त्याच्या प्रचलित व्याखेवर शाब्दिक व बौध्दिक हल्ले करून नव राष्ट्रवादाच्या बिजाचे रोपवण केले पाहिजे. त्यांच्या वादांचा प्रतिवाद करून त्यांचे हरण केले पाहिजे. प्रचलित व्याखेवर शाब्दिक व बौध्दिक हल्ले करून नव राष्ट्रवादाच्या बिजाचे रोपवण केले पाहिजे. त्यांच्या वादांचा प्रतिवाद करून त्यांचे हरण केले पाहिजे. तरच नवी सूर्यकिरणे भारत भूमीवर चमकू लागतील.
बहुजन समाजाला केवळ एकजुटीने राष्ट्रीय, राज्यीय व विविध संस्था यावर नियंत्रण मिळवीता आले पाहिजे. मत (व्होट) आमचे परंतु शासन तुमचे हे चालणार नाही याचा इशारा दिला गेला पाहिजे. गटातटाच्या गटारगंगेने सत्ता मिळविता येणार नाही त्यासाठी डावपेच आखावे लागतील. कूटनीती म्हणून आपल्या विचारधारा कायम ठेवून पूरक नवीन विचारधारा निर्माण कराव्या लागतील. नवा विचार निर्माण करून प्रस्थापितांचा पराभव करावा लागेल. बोटावर मोजण्याइतका समाज शिक्षित व सुशिक्षित झाला तरी तुम्ही तुमच्या समाजाला न्याय देवू शकणार कारण यातून अनेक स्वार्थी व संधीसाधू बांडगुळांची निर्मिती होवून ते ध्येय व उद्दिष्टालाच खिंडार पाडू शकतात. अंधाराने भारतीय लोकशाहीच्या प्रकाशाला काळवंडण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लोकशाहीची वाटचाल अंधाराकडे सुरू झाली आहे. जर्मनीतून नाझीवाद नष्ट झाला परंतु आधुनिक काळात भारतीय लोकशाहीच्या गळ्याला नख लावले जात आहे. एक मात्र खरे आहे, एकजुटीने यावर मात करता येईल. यासाठी सिंह व बैल यांचा कथापट ध्यानात ठेवावा लागेल.
एकता हीच एक अतूट शक्ति आहे यावर विश्वास ठेवावा लागेल.
लेखक : बापू राऊत
No comments:
Post a Comment