Wednesday, May 8, 2019

येथेही आहे साक्रेटिसच्या खुन्यांची वंशावळ

ज्या देशाला शिस्तीने चालायचे असते तो देश कायद्याची निर्मिती करीत असतो. नागरीकानी त्या कायद्यांचे कसोशीने पालन केले तरच देशात कायद्याचे राज्य स्थापित होते. परंतु कायद्याचे पालन न करता ज्या देशातील जनता आणि शासनव्यवस्थेत बसणारे सत्ताधारी आपले व्यक्तिक हित व स्वार्थ बघायला लागतात तेव्हा त्या देशात अंतर्गत संघर्षाला सुरुवात होत तो देश अनागोंदीकड़े वाटचाल करतो. मग कायद्याचे राज्य नष्ट होवून एकाधिकारशाही सुरु होते. दमनशाही व संघर्ष ही त्या देशाची नित्याची बाब होवून जाते.


ग्रीस मधील अथेन्समध्ये असेच झाले. तो काळ काही हजार वर्षापूर्वीचा होता. सार्वजनिक हित न बघणारे कायदे अस्तीत्वात होते. स्वार्थ व स्वत:ची सत्ता शाबूत ठेवन्यासाठी प्रजेला अज्ञानाच्या गर्तेत ठेवण्यात आले होते.  जनता गुलामीचे जीवन जगायची. कारण बहुसंख्य जनतेला ज्ञान व अज्ञान यातील दृष्टांत कळत नव्हता.  न्यायसमता व सन्मान यातील फरक समजत नव्हता. उच्च स्थानी बसलेले लोक जसे म्हणतील तसे ते वागायचे. त्यालाच त्यांनी न्याय व जीवन समजून घेतले होते. अशा काळात अथेन्समध्ये साक्रेटिस नावाच्या एका अवलियाने जन्म घेतला. तो ज्ञानी व मानवाधिकाराचा जाणकार होता. अथेन्समधील प्रचलित व्यवस्थेकडे बघून तो विचलित होतो. मग तो अथेन्सच्या मृतवत नागरिकांना विचार करावयाला लावतो. त्यांच्यातील अंधकार नष्ट करु  प्रकाशाचा मार्ग दाखवितो. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्ञानाच्या मदतीनेच सामाजिक न्याय व व्यवस्था परिवर्तन करता येते हे त्याने जनतेला पटवून दिले.

साक्रेटिसने सत्तेवर बसलेल्या मंडळीचे अज्ञान उघडकीस आणले.  परंतु धर्माच्या व सत्तापिपासू ठेकेदारानी साक्रेटिसवर अनेक खोटे आरोप लावले. त्याला शिक्षा म्हणून विषाचा प्याला देण्यात आला. तो तेवढ्याच धीरोदात्तपने ते विष प्राशन करून मृत्युला कवटाळतो. ज्यूरींनी जो निर्णय दिला तो सत्ताधारी धर्ममार्तंडाच्या दबावाखाली होता. मृत्युला वाचविण्यासाठी सुरु असलेले त्याचे कार्य त्याने थांबवावे अशी ऑफर देण्यात आली होती.  परंतु साक्रेटिस म्हणालामी माझ्या विचारावर ठाम आहे. मला कोणी मारण्याचे ठरविले असले तरी मी त्याची पर्वा करीत नाही. त्याच्या शिष्यानी तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखली होती. परंतु कायद्याचे पालन करणार्या साक्रेटिसला ते अजिबात मान्य नव्हत. दिलेले वि प्राशन करुण तो आपल्या विचारानी जगात अजरामर झाला. त्याने मांडलेले विचार तर्कशुध्द चिंतनावर तसेच मानवता व सामाजिक न्यायावर आधारलेले होते. कायदे हे राज्याचे आधारस्तंभ असून आदर्श शासकापेक्षा उच्च स्थान कायद्याचे आहे.

आता भारताकडे वळू या. भारतात जी वर्णव्यवस्था निर्माण झाली ती शासकवर्ग व लोकावर नियंत्रण ठेवू पाहणार्‍या ब्राम्हणवाद्यांची  मिलीभगत होती. असमान सामाजिक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. नियंत्रित व्यवस्थेसाठी मनुस्मृती सारखे कडक कायदे बनविले. या कायद्याना विरोध करण्यासाठी भारतात कोणी साक्रेटिस निर्माण झाला नाही. या देशात हूनशक आणि मुघलानी येवून आपले राज्य निर्माण केले.  या आक्रमणकर्त्याना रोखण्याची हिंमत मनुस्मृतीच्या समाजव्यवस्थेमध्ये नव्हती. उलट मनुस्मृतीच्या कड़क कायद्याची अधिकाधिक अंमलबाजवणी झाली. येथे स्थिर झालेल्या परकीय सत्तानी या कायद्यात हस्तक्षेप केला नाही कारण या कायद्यांची रचना त्यांच्याही फायद्याची होती.

ब्रिटीशर्स भारतात येताना विचाराची मुक्तता घेवून आले. साक्रेटिसरूसोव्हाल्टेयर व प्लूटो यांचे विचार भारताच्या धर्मसीमेवर धडकू लागले होते. विचाराच्या आदान प्रदानात भारतात १८-१९ व्या शतकात सुधारणाचे वारे येत व्यवस्था परिवर्तनाचे विचार मांडणारे ज्ञानी येथे निर्माण झाले.  सामाजिक व्यवस्था परिवर्तनासाठी  प्रचलित व्यवस्थेला छेद करणारे विचार मांडू लागले. संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यानी सुधारने ऐवजी व्यवस्था परिवर्तनावर अधिक भर दिला. 

स्वातंत्र्यानंतर  1950 ला भारतात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले.   स्वतंत्र  प्रजासत्ताकात भारताचा आत्मा हा धर्म न राहता धर्मनिरपेक्ष झाला. शिक्षणअर्थ व राजकारणात जे मागे राहिले त्याना मदतीचा हात दिला. सांस्कृतिक व व्यक्तिकदृष्टया प्रत्येकाला आपापल्या धर्माचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. मात्र आधुनिक भारतात ब्रिटिश काळापासुनच धर्मांध व कट्टरतावादाच्या विषाणुनी आपले डोके वर काढले होते. त्यांना भारत हा धर्मनिरपेक्ष नव्हे तर धर्मांध हवा होता. जनतेनी अशिक्षित व धर्मभीरु राहने त्यांना पोषक होते. संस्कृतीरक्षक व शासक म्हणून आपले स्थान अढळ व अबाधित राहावे यासाठी जनतेला आपसात सतत संघर्षशील ठेवण्यासाठी व्ह्युनिती आखली गेली. त्यांच्या या नितीला २१ व्या शतकात फळ येवू लागली आहेत. त्याच परीणामातून बहुसंख्य समाजाला अंधश्रध्दा  धर्मांधतेच्या गर्तेतुन काढू पाहणार्‍या समुपदेशकाना क्रूरपणे मारण्याचे सत्र सुरु झाले

नरेंद्र दाभोलकर आणि इतर तत्त्ववेत्त्यानी अंधश्रध्दाकुप्रथामहिलांचा मंदिर प्रवेश आणि धार्मिक शोषण या विरोधात काम केलेदाभोळकरांच्या तर्कवादी विचारांचा सनातनी संस्थासारख्या कट्टर धर्मांध संस्थाना आपल्या कार्याविरुध्दचा धोका वाटू लागलाआपल्या साधकाना व बहुसंख्य लोकाना हे तर्कवादी विचार पटायला लागले तर आपले कार्य व उद्दिष्टे नष्ट होतील ही भीती वाटू लागलीदाभोळकरकुलबर्गीपानसरे आणि गौरी लंकेश यांना देशद्रोही व धर्मंविरोधी ठरवून अशा लोकाना हिन्दू राष्ट्रात जिवंत राहण्याचा अधिकार नाही असे हिन्दू धर्मंभक्ताच्या मेंदूमध्ये भरविण्यात आलया तत्ववेत्त्याना ठार केल्याच्या दीर्घ कालावधी नंतरही मारेकर्यांच्या  मूळ योजनाकारापर्यंत सरकारी यंत्रनाना पोहोचता आल नाहीत्यामुळे ह्या हत्या राज्य पुरस्कृत होत्या कायअसा एक भाव निर्माण झाला आहे.

शोषकाच्या विषमतावादी व्यवस्थेविरोधात बोलने देशद्रोह ठरत आहे. पेरूमल मुरूगन या लेखकाने तर लेखक मेला आहे’ अशी जाहीर घोषणा केली. कांचा इलय्याच्या तोंडाला काळे फासन्याचा प्रयत्न झाला. पुळियूर मुरगेसन या लेखकाला घरातून पकडून नेऊन पाच तास मारण्यात मारल. केरलातील एस. हरिष या नामवंत कथाकाराला धमक्यांनी बेजार करण्यात आल. स्वामी अग्निवेश याना रस्त्यात गाठून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. भगवे कपडे घालून धर्माच्या नावाने तलवारी व बंदुका हवेत फिरवित थव्याथव्याने बाहेर पडून शक्तिप्रदर्शन करणे येथे नित्याचेच झाले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोमांस सेवन केल्यास आपण त्यांचा भरचौकात शिरच्छेद करूअशी धमकी महापालिकेचा एक माजी अध्यक्ष देतो. तर सनातन संस्थेसी निगडित वैभव राऊताच्या घरी स्फोटके मिळतात तेव्हा हजारो लोक त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात. हे कोणत्या मानसिकतेचे लक्षण आहेएवढी मानसिकता विकलांग झाली असेल तर भविष्यात देशासमोर येणार्‍या मोठ्या भयंकर रोगाची ही नांदी ठरू शकते.  देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तीनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन देशातली लोकशाही धोक्यात आल्याचं विधान करण हा पुढील भविष्याचा इशारा समजला पाहिजे. .


महिलांना मंदिराबाहेर ठेवणे हे पक्षपाती आणि असंवैधानिक आहेतरीही आरएसएस सारख्या संस्था त्याचे खुलेपनाने समर्थन करतात. आधुनिक भारत आणि उदार महाराष्ट्र कट्टर व धर्मांध बनतो आहे ही सत्यस्थिति आहे. महाराष्ट्राच्या उदारमतवादी विचारावर विषमतावादी विचाराच आक्रमण झालेले आहे. परंतु दू:ख याचे होते कीहे आक्रमण रचनात्मक युक्तिवाद व विचारांचे नसून विचारवंताना जिवंत ठार मारण्याचे आहे.

कधी नव्हे एवढे भारतातील धर्मांध अधिक मजबूत व आक्रमक झालेले आहेत. ते नव्या संकल्पनाना जन्म देत आहेत. जागृत मंदिर” अशा नव्याच संकल्पनेचा जन्म या देशात झालाय. विचारवंत अशा भंपक व असत्य कल्पनांचा विरोध करतात तेव्हा त्याना धर्मद्रोही ठरविण्यात येवून त्यांचा छळ करण्यात येतो.  नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते,  जर आपण समाजातील योग्य गोष्टींबद्दल बोलत राहिलो आणि सतत संवैधानिक व वैज्ञानिक पद्धती अवलंबत राहिलो तर समाजातील मूल्यव्यवस्था बदलायला सुरू होईल. धर्माच्या चालीरीतीचे मूल्यमापन हे ज्ञानाच्या व तर्काच्या कसोटीवर चालले पाहिजे. शास्त्रे व धर्माचे ठेकेदार म्हणतात म्हणून मानायचे व तसे वागायचे हा केवळ मुर्खपनाच आहे. यात कसला आहे धर्मद्रोहपना?

अजुनही दाभोलकरपानसरेकुलबर्गी व गौरी लंकेश याच्या मारेकर्याच्या मूळासी जाता आले नाही. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. राज्यकर्तेचौकसी यंत्रणा आणि मारेकर्‍याचे योजनाकार यांच्यात काही भावनात्मक व धर्मात्मक सबंधाचे धागे एकमेकात गुरफुटलेले तर नाहीत ना! मारेकर्‍याच्या नियोजनकर्त्यांचे सबंध सत्तेसी प्रस्थापित झाले असतील तर ते राज्य समर्थित खुन होते हे स्पष्ट होते. अथेन्स मध्ये साक्रेटिसला दिलेला विषाचा प्याला हा राज्य समर्थित होता. ई.स.पूर्व २४५ ला अथेन्स मध्ये जे घडल ते भारतात २१ व्या शतकात घडत आहे. म्हणून साक्रेटिसच्या खुन्यांची वंशावळ भारतातही त्याच जोमाने कार्य करीत आहे हे खेदाने म्हणावे लागते.



लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment