प्रचलित प्रघातानुसार
बहुजनवादी पक्ष समुहामध्ये
मुख्यत: फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेवर बोलणार्या पक्षाचा अंतर्भाव होतो. त्या अर्थाने बहुजन समाज पक्ष,
भारीप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, बहुजन मुक्ति पार्टी इत्यादी पक्षाना बहुजनवादी पक्ष असे म्हणता येते. या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात या पक्षांची महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर असलेली वास्तव
स्थिती काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न
आहे. बहुजनवादी
पक्ष हे मुख्यत: वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व
करतात ज्यात अनु.जाती, जमाती व विमुक्त भटक्या जाती यांचा समावेश होतो. एकदा भाषणात भाजप मंत्री नितिन गडकरी यानी म्हटले होते, “फुले-आंबेडकरी पक्षांचे एक मोठे दुर्दैव्य आहे, ते म्हणजे या पक्षांची विचारधारा व उद्देश एक असला तरी हे
पक्ष निवडनुका मध्ये कधीच एकत्र येवून लढत नाहीत. हे
पक्ष गटातटामध्ये इतके विभागले आहेत की त्यांची गणनाही करता
येत नाही”. हे वास्तव आज कोणालाही
नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात या पक्षांच्या म्हणविल्या जाणार्या एकूण दीड कोटी मतापैकी केवळ २० लाख मते या पक्षांना पडतात. याचा अर्थ मतांचे मोठया प्रमाणात विभाजन होवून ९० टक्के मते ही प्रस्थापित पक्षाकडे वर्ग होतात.
तक्ता.क्रं.१: महाराष्ट्रातील २००९ व २०१४ व्या लोकसभेतील बहुजनवादी पक्षांना मिळालेल्या एकूण
मतापैकी पक्षीय टक्केवारी.
|
||
पक्ष
|
२००९
|
२०१४
|
( % )
|
( % )
|
|
बहुजन समाज
पक्ष
|
६७
|
६२
|
आंबेडकरवादी पार्टी
ऑफ़ इंडिया
|
-
|
२
|
बहुजन मुक्ति
पार्टी
|
-
|
१०
|
भारीप बहुजन
महासंघ
|
१५
|
१७
|
रिपब्लिकन पार्टी
ऑफ़ इंडिया (ग)
|
१०
|
७
|
रिपब्लिकन पार्टी
ऑफ़ इंडिया (आ)
|
९
|
-
|
आंबेडकर रिपब्लिकन
पार्टी
|
-
|
१
|
इतर
आरपीआय ग्रूप
|
-
|
१
|
मूळ स्त्रोत्र: भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले २००९ व २०१४ लोकसभा निवडनुक आकडे
|
आले तरीही ते
पराभूत उमेदवारापेक्षा अधिक मतांची जुळवाजुळव करू शकत नाही. पर्यायाने ते निवडनुक
जिंकन्याच्या शर्यतीमध्ये टिकूच शकत नाही. हीच
परिस्थिति नांदेड व सातारा सारख्या मतदार संघात असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकुणच बहुजनवादी गटातटाचे
पक्ष हे निवडनुका जिंकण्याचे राजकारण न करता केवळ धुळफेकीचे राजकारण करताना दिसतात. यावरून असे म्हणता येईल की,
महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरवाद हा बहुजन जनतेला व त्यांच्यातील बुध्दिवाद्याना पुरता समजलेला नसून त्यांचे गटबाज नेते
मात्र संधिसाधुचे राजकारण करुण सामान्य जनतेला फसविण्याचे काम अहोरात्र करीत आहेत. यांचा जागृतीचा झेंडा
हा सत्ता हातात घेण्याचा न होता केवळ सरदार बनण्याचा होत आहे. हे सरदार नंतर
कांग्रेस व भाजप सारख्या पक्षात जावून आरक्षित जागावर आपली वतने निर्माण करतात.
आणि
तक्ता क्र.२: २०१४ लोकसभा निवडणुकातील बहुजनवादी पक्ष व दुसर्या क्रमांकावरील पराभूत पक्षाच्या मतांचे तुलनात्मक
विवरण
|
||
मतदार संघ
|
बहुजनवादी पक्षांची एकुण मते
|
दुसर्या क्रमांकावर असलेल्या पक्षाची मते
|
अकोला
|
२५४४९२
|
२५३३५६
|
अमरावती
|
१५९१०७
|
३२९२८०
|
वर्धा
|
९९७८९
|
३२१७३५
|
रामटेक
|
१०६४७६
|
३४४१०१
|
नागपुर
|
९९२९०
|
३०२९३९
|
भंडारा
|
५५८८६
|
४५६८७५
|
चिमूर-गडचिरोली
|
८०६६४
|
२९९११२
|
चंद्रपुर
|
७१६४६
|
२७१७८०
|
यवतमाळ-वाशिम
|
८२६६६
|
३८४०८९
|
नांदेड
|
५५४६२
|
४९३०७५
|
सातारा
|
११२३६१
|
२४८७११
|
जे जात नाहीत ते आपल्या एकगठ्ठा मतांची भीती दाखवून
सौदेबाजी करतात.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये अनु.जातीच्या
मतांची संख्या अनुक्रमे उत्तर
मुंबई (१,७२,५३८ च्या वर), उत्तर पश्चिम मुंबई (१,७२,५३१ अधिक), ईशान्य मुंबई (१,६२,९५२
अधिक), दक्षिण मध्य मुंबई (१,४३,७७० अधिक), उत्तर मध्य मुंबई (१,६९,६४८ अधिक) आणि
दक्षिण मुंबई मध्ये १,४०,८२५ च्या वर लोकसंख्या आहे. तरीही या मतदारसंघात बहुजनवादी पक्षाना केवळ १० ते ४० हजारापर्यंतच
मतदान होते. याचा अर्थ स्पष्ट निघतो की, अनू.जातीची सर्व
मते या पक्षाना न मिळता ती सरळ कांग्रेस व भाजपा
या पक्षाकड़े जातात. तीच परिस्थिति मुस्लिम मतांची आहे. महाराष्ट्रात २०११ च्या जणगनेनुसार मुस्लिम संख्या ही एकून लोकसंख्येच्या १.३ कोटी किंवा
११.५६% आहे. महाराष्ट्रात साधारणत: १४ मतदार संघ असे आहेत की ज्यात मुस्लिम
उमेदवार निवडून येण्यास
मुस्लिमांची संख्या प्रभावित करू शकते. मुंबई मध्ये एकून सहा लोकसभा क्षेत्र असून मुस्लिमांची संख्या १८ टक्के आहे तर धुले (24%), नांदेड (१७%), परभणी (१६%), लातूर (१५%), ठाणे (१५%), अकोला (१९%)
आणि औरंगाबाद मध्ये २० टक्के एवढी
मुस्लिम संख्या आहे. तरीही मुसलमानाना आपला पक्ष
वाटत असलेल्या समाजवादी पक्षाच्या मुस्लिम उमेदवाराला किंवा अपक्ष मुस्लिम उमेदवाराला केवळ काही हजार व्होट मिळतात. म्हणजेच मुस्लिम जनतासुध्दा
आपल्या समुदायाच्या उमेदवारास व्होट न करता ते जिंकू शकणार्या उमेदवारास व्होट
करतात. याचे कारण मुस्लिम व अनू.जाती समुदायासमोर सक्षम व विश्वासार्ह नेत्यासोबतच एका
मजबूत पक्षाचा अभाव असू शकतो. अथवा ते संकुचित विचार न करता एका मुख्य धारेतील
पक्षाकडे आपला विकासक म्हणून बघत असावेत.
मात्र
महाराष्ट्रात होणार्या २०१९ लोकसभा निवडणुका मध्ये नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन
आघाडीने नवा रंग भरल्याचे चित्र आहे. अकोला
मतदारसंघ सोडला तर प्रकाश आंबेडकराना पूर्वी इतर मतदारसंघात जनतेचा
फारसा पाठींबा नव्हता (पहा तक्ता क्रं.१). परंतु
आज ते फ्रंटवर आलेले
दिसतात. हा
एका रात्रीमध्ये झालेला प्रवास निश्चितच नाही.
वर्ष २०१४
पासून महाराष्ट्रातील अनु.जाती/जमाती
व वंचित
घटक अस्वस्थ होते. आपण नेत्याशिवाय आहोत ही भावना त्यांच्या मनात सतत
बोचत होती. त्यांच्या
मनातील खदखद व्यक्त करणारा आवाज त्याना हवा होता. भीमा कोरेगावच्या प्रसंगात
प्रकाश आंबेडकरानी घेतलेल्या पुढाकाराने त्याना तो मिळाला.
वंचित बहुजन आघाडीमुळे
बहुजन जातीमधील अलुतेदार–बलुतेदार वर्ग उत्साहित झालेला दिसतो. प्रकाश आंबेडकर व
ओवेसी यांच्या सभांना होणार्या लाखांच्या जमावात त्याचे उत्तर मिळते. या वंचित
वर्गाला घरानेशाहीमुळे संख्येने अधिक
असतानाही कोनत्याच सभागृहात प्रतिनिधित्व मिळू शकले नाही आणि पुढेही मिळणार नाही
याची जाणीव झालेली दिसते. त्यांच्या मागण्यांना केराची
टोपली दाखविली जाते. त्यामुळेच
हे वंचित अलू-बलुतेदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या बहुजनवादी
नेत्याने मुख्य प्रवाहाच्या पक्षाना डावलून स्वतंत्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न केलेला
दिसतो. हा प्रयत्न घरानेशाही जपनार्या व लोकशाहीच्या निवडनूक व्यवस्थेला आपली बटिक समजणार्यासाठी
ही मोठी चपराक असून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटनी देणारा ठरणारा आहे. परंतु ह्या जरतरच्या भाषेला भावनात्मक
बाबीपेक्षा आकड्यांची जोड़ असने
फार महत्वाचे
असते. ते मात्र
झालेले दिसत नाही.
२०१९ च्या लोकसभा
निवडणुकामध्ये तक्ता क्रमांक १ मधील सर्व पक्ष हे स्वतंत्ररीत्या
वेगवेगळे लढताना दिसतात व त्याची परिणीती तक्ता क्रं.२
मध्ये स्पष्टपणे बघायला मिळते. इतिहास
व वास्तव परिस्थितिपासून धडा न घेता
जे पक्ष/नेते आत्मपरीक्षण करीत नाहीत असे पक्ष राजकारणात व समाजकारणात फार काळ टिकू शकत नाहीत.
जनतेने जसा २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडनुकामध्ये या तथाकथित
बहुजनवादी पक्षाना धडा शिकविला त्याचीच पुनरावृत्ती
परत २०१९
मध्ये झाल्यास
फार आश्चर्य
वाटता कामा नये. जनता फार काळ भावनांना बळी पडत
नाही तर ती आपले काम चोखपणे बजावत असते.
लेखक: बापू राऊत
9224343464
छान
ReplyDeleteबहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून घेऊन मगच निवडणुक लढविली तरच जिंकून येण्याची शक्यता आहे.परंतु २०१९ च्या निवडणुकीत असे झाले नाही.बहुजन एकत्र आले नाहीत.याचा अर्थ बाळु राऊत म्हणतात तसे बहुजन वादी पक्ष मिळणाऱ्या एकगठ्ठा मतांचे भांडवल करुन,सौदेबाजी करतील.मिळालेलया मतांची टक्केवारी दाखवून तेच फक्त बहुजनांचे मसीहा आहेत, असे दर्शवित आरक्षित जागेवर मंत्री पदे धारण करतील.महामंडळांवर आपले बगलबच्चे बसवरील.वासतविक ते बहुजनांचे खरे प्रतिनिधित्व करीत नसतांना व्यक्तीगत लाभासाठी ही खेळी त्यांनी केलेली असेल.बाबासाहेबांनी ही शक्यता पुणे करार करताना वर्तवली होती.आणि म्हणूनचं बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मतदारसंघाची मागणी केली होती.स्वतंत्र मतदारसंघात बहुजन समाजातील मतदाराला दोन मत देण्याचा,एक खुल्या प्रवर्गातील व दुसरे राखीव असलेल्या बहुजन उमेदवारास.परिणामी भारतीय निवडणूक आयोगाच्या वरील आकडेवारी नुसार निवडुन येणारे
ReplyDeleteबहुजन समाजातील उमेदवार हे खरेखुरे बहुजनांचे प्रतिनिधि असतील.
त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा स्वतंत्र मतदारसंघ मिळण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक आहे, असं मला वाटतं.
के डी भगत.( 9869369212)
होय, ही वेळ आलेली आहे आणि यासाठी जनांदोलन होने आवश्यक आहे. याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यानी केले पाहिजे.
Deleteमाझ्या मते खरच बहुजन पक्ष एकत्र येऊन आपली ताकत दाखवली तर कांग्रेस आणि भाजप सारख्या पक्षांना धूळ चारू शकतात.पण आमचे दुर्दैव असे की आमचेच पुढारी आमच्याच लोकांची मारून पोळी भाजण्याचं काम करून स्वतःचे घरे भारण्याचं काम करतात.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन बेईमान झाले साले । धिक्कार आहे असल्या राजकीय नेत्यांना।
ReplyDeleteबहुजनवादी पक्षीय नेते हे स्वार्थी असल्यामुले असे प्रश्न निर्माण होतात.
Deleteबहुजनवादि / आंबेडकराईट विचार प्रणाली मानणारा व्यक्ती किंवा कार्यकर्ता निवडणूक नसताना च्या काळात सर्व समावेशक समाज कार्य करत नाहि. बाबासाहेबां चे विचार तथागतां चे आचार यांचे पालन व प्रसार करत नाही. कुठले हि संस्कार स्वताः वर व समाजावर करण्याचा , रुजवण्याचा प्रयत्न शुद्धा करताना दिसत नाहि. कसा सर्व समाज एकत्रित रीत्या मत देणार? Those who dont have culture are (CULTURE LESS VULTURE PEOPLE.) We can see easily see people behaving like vultures in our community. तथागंताच्या विचारांचे आचरण व प्रचार प्रसार योग्य रीतीने व मोठ्या प्रमाणात केल्या नेच राजकारणात शुद्धा हवे ते परीमाण बघावयास मिळतील.
ReplyDeleteमला वाटत बहुजनवाडी पक्ष हे अनेक गटातटात विभागले असल्यामुले कोणाचा प्रचार करावा यामध्ये गोंधळ होतो.तेही खरे आहे कारण जानकार व्यक्ती मग संधीसाधू लोकांचे स्वार्थी हेतु बघून चुप बसतात
Delete