Wednesday, February 29, 2012

विश्वास हरविलेल्या दलित नेत्यानी आतातरी राजकारनातून बाहेर पडावे


विश्वास हरविलेल्या दलित नेत्यानी आतातरी राजकारनातून बाहेर पडावे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेने ठरविले असते तर २२७ वॉर्डापकी ४७ वार्डामध्ये कुठल्याही पक्षाचा आधार घेता फक्त आणि फक्त आंबेडकरी मतांवर तर  १५० वॉर्डामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचे याचा निर्णय घेऊ शकत होती तर उर्वरित महाराष्ट्रात नागपुरसह अशीच परिस्थिति होती. निदान निवडणुकांपूर्वी जरी या नेत्यानी आपसांत समझोता केला असता तरी कुणाच्याही आधाराविना पालिकेच्या सभागृहात ते विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसू शकले असते. मात्र  गटातटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यानी एकत्रित न येता आंबेडकरी जनतेला गृहीत धरून शिवसेना व कांग्रेससी निवडणूक समझौते करीत महायुत्या केल्या.
निवडणुकी नंतर जे निकाल आले ते पाहता मुंबई महानगरपालिकेत शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या राजकीय प्रयोगाला आंबेडकरी मतदारांनी नाकारले असल्याचे स्पष्ट दिसत असले तरी दलित मतदारानी कांग्रेस राष्ट्रवादी पक्षालाही जवळ केले नाहीं हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झाले आहे. असे असले तरी आंबेडकरी मतदारांनी गटातटात मिरविना-या आरपीआय नेत्यांचा पुरता अपेक्षाभंग करून योग्य ती जागा त्याना दाखवून दिली आहे. आपल्याला खासदारकी वा आमदारकी मिळाली की समाजाला सत्ता मिळाली, अन्याय अत्याचार नष्ट होऊन समाजाचा विकास होतो असे रामदास आठवले यांचे व्यक्तिकेंद्रित मत असते व त्यानुसारच आठवलेचे राजकारण सुरू असते. आठवलेच्या या राजकरनाला आंबेडकरी जनतेने पूर्णता नकारत त्यांचे मुंबई महापालिकेत एकही उमेदवार निवडून दिला नाही (निवडून आलेला एक नगरसेवक हा आंबेडकवादी नसून त्याचे समाजकारनासी काहीही देंने घेणे नाही). तिकडे प्रकाश आंबेडकर यांनीही आपले स्वतंत्र अस्तित्वाचे राजकारण सोडून नव्याने काँग्रेसचा हात धरून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रयोगालाही आंबेडकरी जनतेने धीड़कारत अकोला या त्यांच्या प्रभाव क्षेत्रासोबतच इतर ठिकाणीही ठेंगा दखविला आहे. आरपीआयचे बाकीचे गटही हे निषप्रभावी आहेत हे सुध्दा या निकालाने दाखवून दिले आहेत. रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या राजकीय भूमिकांकडे (युति/महायुती) दलित समाज तटस्थपणे पाहात होता. तर दुसरीकड़े या नेत्यांच्या संधिसाधु व स्वाभिमानशून्य वृत्तीमूळे तो मनातून खदखदत व रागावून होता. दलित समाजाने जशी शिवसेनेबरोबरची आठवले यांची युती सपशेल धुडकावून लावली तसीच त्याने प्रकाश आंबेडकरनी कांग्रेससोबत केलेल्या घरोब्यालाही धुड़कावुन लावले आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन राजकारणाचे या निवडणुकीत पुरते तीनतेरा वाजले त्यामुळे  आंबेडकरी चळवळीचे यापुढील राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला समाजासमोर निर्माण झाला आहे?. 
      महाराष्ट्रात गटातटाच्या व सत्तेच्या तुकडय़ाच्या समीकरनामुळे रिपब्लिकन नेत्यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या दलित समाजास मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हा एक पर्याय होऊ शकनार होता. परंतु बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रावर लादलेले राज्यनेतृत्व  एवढे कमकूवत आहे की मागच्या दीड दशकापासून या नेतृत्वाला अजूनपर्यंत आंबेडकरी चळवळीची व समाजाची नसच सापडलेली दिसत नाही. राज्यातील वेगवेगल्या विभागातील मासबेस नेत्याना पक्षातून काढून बहुजन समाज पक्ष कमकूवत करण्याचे एकमेव महान कार्य मात्र या तथाकथित राज्यनेतृत्वा कडून होताना दिसते. गेल्या वीस वर्षापासुन ते राहत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत एकही नगरसेवक निवडून आणू शकत नाही त्यावरून या नेतृत्वाची कार्यक्षमता  लक्षात यावी. सामाजिक प्रश्नावर मोर्चे, आंदोलने करायचीच नाही हा ह्या नेत्याचा हेका कायम दिसतो. त्यांच्या अशा नेतृत्व दोषामुळे गेल्या वीस वर्षांत म्हणावा तसा जनाधार बसपाला मिळू शकला नाही.नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेतील निवडणुकीत बसपाचे 25 ( नागपूर-12, अमरावती-6, सोलापुर-3, ठाणे-2, उल्हासनगर-2) नगरसेवक निवडून आले हे राज्य नेतृत्वाचे यश नसून रिपब्लिकन पक्षाच्या गटाटाच्या  राजकारनाला कंटाळून एकहाती किल्ला लढविना-या  मायावतीच्या नेतृत्वावर आंबेडकरी जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे फलित होय.   
      आज रिपब्लिकन राजकारण पुढे नेण्याची धमक कोणत्याच नेत्यांमध्ये नाही. महाराष्ट्रातील एका मोठय़ा व जागृत समाजाचे नेतृत्व करणारा रिपब्लिकन पक्ष आज लुळापांगळा झाला असून  आंबेडकरी राजकारण आज एका वेगळ्या वळणावर येऊन उभे ठेपले आहे. पक्षाची दिशा अनिश्चित आहे. आंबेडकरवादी राजकीय चळवळ ही विचारांची नसून दलालांची चळवळ झाली आहे. आता गरज आहे तिला या दलालांपासून वाचविण्याची. समाजाच्या या तकलादू नेत्यांनी स्वतचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यापेक्षा दुस-याचे अस्तित्व जपण्यात व ते वाढविण्यात धन्यता मानत आले आहेत. डॉ.बाबासाहेबांचा राजकीय इतिहास विसरलेली ही नेतेमंडळी बाबासाहेबांची राजकीय चळवळ  मोडीत काढण्यास निघाले आहेत. हे नेते चळवळ चालविन्यास लायक नाहीत हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. आंबेडकरी जनतेचा विश्वास गमविलेल्या या नेत्यानी चळवळीच्या यशस्वीतेसाठी राजकारनातून बाहेर पडले पाहिजेत.
      जे आपला इतिहास विसरतात ते आपला इतिहास निर्माण करू शकत नाहीत हे बाबासाहेबांचे वाक्यसुद्धा आंबेडकरी जनता, चळवळीतले नेते आणि कार्यकर्ते विसरलेले दिसतात. आबेडकरी राजकीय चळवळीला स्वतंत्रपने उभी न करता दुस-याच्या आधाराने जगवायला
लावना-या नेत्याना ही
जनता कोणत्याही प्रकारचा जाब व स्पष्टीकरण विचारताना दिसत नाही. रा. सू. गवई यांनी स्वतच्या सभापती  व राज्यपाल पदासाठी अख्खी चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधली आता त्यांचा वारसा रामदास आठवले चालवि आहेत.  गवई आठवले हे काँग्रेसबरोबर गेले ते चळवळीच्या व समाजहितासाठी नाही तर ते स्वत:च्या व्यक्तिहितासाठी गेले. चळवळीचा स्वाभिमान, विवेक आणि विचार यानी मारून टाकला आहे. आंबेडकरी चळवळीने जे त्याज्य मानले तेच काँग्रेसने त्यांना स्वीकारायला लावले व आता शिवसेनेच्या पाठीमागे लागून तेच चालू आहे.  आंबेडकरी चळवळी अधिकाकाधिक फुटत जावी वा ती कोनाची तरी पाईक/दासीनून रहावी असे माणनारा दबावगट महाराष्ट्रात कार्यरत आहे. या दबावगटापुढे झुकनारे कनाहीन नेते या स्वाभिमानी चळवळीचे नेते म्हणून मिरवाताहेत. त्यामुळे आज खरी गरज आहे  ती आंबेडकरवादी राजकीय चळवळीला वाचविण्याची. आज या चळवळीला  कोण वाचवेल?. जे नेते राजकीय एकोपा राखण्यात आडदान्डा  घालतात वा  जे नेते आपल्या संधिसाधु वृत्तिमुळे नेहमी कांग्रेस/राष्ट्रवादी/शिवसेना यांच्या सोबत युति करण्यासाठी नेहमी दबाव आणतात अशा नेत्याना आता चालते व्हा असे म्हणण्याची वेळ समाजावर आली आहे तर दूसरा पर्याय म्हणून आंबेडकरी जनतेने चळवळीतील एखाद्या नेत्यावर विश्वास व दबाव ठेउन आबेडकरी चळवळ पुढे रेटण्याचे काम करावे लागेल अथवा तीसरा पर्याय म्हणून बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांची करण्यासाठी दबाव आणावा लागेल. पुढील काळात होना-या विधानसभा निवडणुकात आंबेडकरी चळवळीची होणारी मानहानी रोखायची असेल तर आंबेडकरी जनतेने त्याची रंगीत तालिम आतापासूनच करने आवश्यक आहे.
 

बापू राऊत
9224343464
e-mail:bapumraut@gmail.com

No comments:

Post a Comment