संजय पवार विचार तिसर्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राम्हणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून मला थोडे अंतर्मुख होऊन पुढच्या पंचवीस -तीस वर्षात आपण नेमके कुठे असू याचा विचार करावासा वाटतो. कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा
मुळात साहित्यच टिकेल काय? टिकले तर काय स्वरूपात टिकेल याचा विचार करण्याची गरज आहे. मागच्या काही शतकात, धर्म, राज्य, साहित्य, संस्कृती यात विचारांच्या, कृतींच्या पातळीवर अनेक चळवळी झाल्या. लोकोत्तर नेतृत्वे तयार झाली. विचारांचे खंडन-मंडन तसेच हिंसेचे पाटही वाहिले. धर्म ही अफूची गोळी हे तत्वज्ञान लोकांना पटतंय आणि धर्म आता जीवनाच्या अनेक क्षेत्रातून बाद होईल असे वाटत असतानाच, जगभर मूलतत्त्ववाद्यांनी डोके वर काढले आणि प्रचंड सार्वजनिक हिंसाचाराच्या अफूचे व्यसन लागलेली नवी तरूण पिढी निर्माण झाली. महासत्तांमधील शीतयुद्ध संपल्याने आणि बलाढय़ रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेने जगाचा राजकीय भूगोल बदलण्याचा विचार सोडून सांस्कृतिक आक्रमण सुरू केले. त्यासाठी 'खाऊजा' खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा चलाख वापर त्यांनी केला. चीनसारख्या देशातला तरूणही अमेरिकन मायाजालात अडकत चाललाय. तर भारतात मतदानाला न जाता सुट्टय़ांत मश्गुल होणारा नवश्रीमंत व श्रीमंत वर्ग ओबामाच्या निवडणुकीवेळी टीव्हीला डोळे लावून बसू लागला नी सोशल नेटवर्कच्या अभासी जाळय़ात भ्रष्टाचार्यांना पकडण्याचे उद्योग करू लागलाय.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या पाव शतकात माध्यम क्रांतीची सुरूवात झाली आणि बघता बघता या क्रांतीने विसाव्या शतकापर्यंतच्या मानवी जीवनातील स्थित्यंतरांना कारणीभूत विचार, आचार, संघटन, चळवळी, नेतृत्व यांना एका 'क्लिक'ने जवळपास 'डिलीट' करून टाकले. या माध्यमक्रांतीने प्रबोधनाच्या चळवळीतील प्रमुख लोकमाध्यमे वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन, नाटक, चित्रपट यांना निव्वळ मनोरंजनाचे व मनोरंजनाच्या व्यापाराचे स्वरूप दिले. त्यापाठोपाठ झालेल्या संगणक व दूरसंचार क्रांतीने तर लिखित शब्दांचे अस्तित्वच धोक्यात आणले. त्याचबरोबर संगणक प्रणालीसाठी इंग्रजी भाषेची अनिवार्यता निर्माण करून जगभरातल्या जवळपास दोन ते तीन हजाराहून अधिक भाषा, बोलीभाषा, संपविणारी एक सांस्कृतिक त्सुनामी आणली.
'खाऊजा' धोरणाने जगातला कामगार वर्ग जसा संपला तसा मध्यमवर्गही संपला आणि दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होणारा श्रीमंत वर्ग व दिवसेंदिवस अधिक गरीब होणारा गरीब वर्ग एवढे दोनच वर्ग आता शिल्लक राहिलेत.
कामगार आणि मध्यमवर्ग संपल्याचे परिणाम आपल्या सांस्कृतिक जीवनावरही पडलेले दिसतात. हे दोन्ही वर्ग कधीकाळी गावखेड्यातून येवून मोठय़ा शहरांत कामाधंद्यानिमित्त स्थलांतरीत झालेला. त्यामुळे आपली भाषा, जात, धर्म, संस्कृती याविषयी तो संवेदनशील होता. त्यातूनच नाटक, चित्रपटांसारख्या कलांचा निर्माता व आस्वादक जसा तो राहिला तसाच तो साहित्यावर आपला वैचारिक पिंड पोसू लागला. निव्वळ मनोरंजन, स्मरणरंजन ते प्रबोधनाची गरज यातून संशोधन, प्रभंजन अशी आवर्तने या तिन्ही माध्यमातून तो हिरीरीने करायचा आणि त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या राजकीय विचारातही उमटे.
महाराष्ट्रापुरते पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती, कम्युनिस्टांच्या कामगार चळवळी ते नक्षलवाद, शिवसेनेचा जन्म, पँथरची निर्मिती हे सगळं वर उल्लेखलेल्या काळाची अपत्ये होती आणि स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्रांतीच्या वेडाने साठच्या दशकातला तरूण ऐशींच्या दशकापर्यंत झपाटून गेला होता. या दोन दशकात डी क्लास, डी कास्ट होत अनेक तरूण-तरूणी, उच्च शिक्षण सोडून परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या चळवळीत, लढाईत सामील झाले. या पिढय़ांनी कामगार, दलित, शेतमजूर, भटके, विमुक्त, आदिवासी, स्त्रिया यांच्यासाठी लढे उभारले. जनसंघटना स्थापल्या. राजकीय व शासकीय व्यवस्थेविरूद्ध संघर्ष केला. तसेच लोकसहभागातून रचनात्मक कामही केले. मात्रआणीबाणीच्या नंतरच्या राजकीय भूमिकांतून उद्भवलेल्या राजकीय, वैचारिक आणि व्यक्तिगत संघर्षातून हा दोन दशकात उभा केलेला परिवर्तनाचा लढा क्रमश: ढासळत गेला आणि हळूहळू जमीनदोस्त झाला.
उद्याच्या क्रांतीचं नेतृत्व दलित करेल असा आशावाद आम्ही ऐकला होता पण उद्याच्या क्रांतीचं सोडा, दलितांच्या क्रांतीचं नेतृत्वही दलितांना जमत नाही. बाबासाहेबांपासूनचा काळ जर धरला तर दलित नेतृत्वाचा प्रवास उतरत्या भाजणीचा झालाय! धर्मांतर, राखीव जागा, सरकारी नोकर्या यामुध् पुण्यात १४ ते १६ डिसेंबर या काळात पार पडलेल्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केलेल्या समाज चिंतनाचा हा संपादित भाग..

No comments:
Post a Comment