छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे प्रतीक असलेले शिवाजी पार्क हे मुंबईचे प्रसिध्द मैदान.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना राज्यात जगली, फोफावली व सत्तेत आली त्याच शिवाजी महाराजाच्या नावाला
विरोध करीत शिवाजी पार्कचे नाव बदलवून शिवतीर्थ असे नामांतरण करण्याचा आणलेला प्रस्ताव हा चक्क शिवाजी महाराजांचा
अपमान आहे.
शिवाजी प्रेमी मराठी माणूस हा अपमान कधीही सहन करणार नाही. शिवतीर्थ या नावातून शिवाजी
महाराजाच्या नावाचा उल्लेख होत नसून शिव म्हणजे शंकर याचे नाव देण्याचा शिवसेनेचा कुटिल
डाव आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी पार्क
या शब्दातून पुसून काढण्याचा शिवसेनेचा हा कुटिल डाव शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी
हाणून पाडला पाहिजे.
बाळासाहेब
ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा प्रत्येक नेता स्वत:ला शिवसेना प्रमुख समझतो आहे.
यावरून उद्धव ठाकरे यांचा पक्षावरचा वचक कमी
होत असल्याचे प्रतीत होते. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मनोहर जोशी यांना नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री व लोकसभेचे सभापति अशी अनेक पदे मिळाली. शिवसेनेच्या बळावर ते
करोडोपती झालेत. त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी कोहिनूर मिल ची जागा देण्यास
मनोहर जोशी नकारघंटा देत आहेत. यावरून मनोहर जोशीचे बाळासाहेब ठाकरेवर किती मोठे?. प्रेम होते हे कळते. पंत नावाच्या बांडगुळानी भूतकाळात जसा बहुजन नेत्यांचा
स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग केला त्याचीच री मनोहर पंत यांनी वर्तमान काळात ओढली
आहे. कोहिनूर मिलची जागा शाबूत ठेवण्यासाठी
काही शिवसैनिक प्रथम शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असे नामकरण करून त्यावर मग बाळासाहेब
ठाकरेंचे स्मारक उभे करण्याची रणनीती आखीत आहेत. म्हणून शिवाजी महाराजांच्या चाहत्यांनी
शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असे नामकरण करण्याच्या
कृतीला विरोध करून तो हाणून पाडला पाहिजे.
------------ बापू राऊत ---------
No comments:
Post a Comment