Wednesday, March 13, 2013

जातींनिर्मूलनातील मा. कांशीरामजींचे योगदान



मान्यवर कांशीरामजीचे जीवनकार्याची तटस्थपणे समीक्षा केल्यास मै अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोक जुडते गये और कारवाँ बनता गया” ह्या काव्यपंक्तीच्या लहरी आपोआपच मनाच्या कोप-यातून डोकावून जातात. कर्मचा-यांचे सामाजिक संघठन “बामसेफ” ची निर्मिती, राजकीय संघर्ष करण्यासाठी  डी.एस.फोर ची स्थापना आणि निवडणुकाद्वारे राजकारणाच्या मैदानात उतरन्यासाठी बहुजन समाज पार्टीची निर्मिती व त्यानंतर देशात बहुजन समाजाचा निर्माण झालेला
झंझावात दरारा. या झांवातात उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या मनुवादी राज्यात बहुजन समाज पक्षाला मिळालेली राजकीय सत्ता व त्या राज्यातून गांधीजीच्या काँग्रेसचे झालेले पतन हे मा.कांशीरामजी नी आपल्या संपूर्ण हयातीत केलेल्या परिश्रमाचे फलित होय. मान्यवर कांशीरामजीनी आपल्या चातुर्यपूर्ण शैलीने बहुजन समाज पक्षाला देशातील तिस-या नंबरचा प्रमुख पक्ष बनविला. आज देशाच्या सर्व राज्यात बहुजन पक्षाचे अस्तित्व असणे हे देशातील दलितासाठी गौरवास्पद बाब आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. म्हणूनच कांशीरामजींची चिकाटी, त्यांचा स्वाभिमानी बाणा, कुशल नेतृत्व देशातील दलितांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नंतर कोण? हा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मान्यवर कांशीरामजी हे असते. महाराष्ट्रातील रिपब्लिकनवादी आंबेडकरी जनतेने हे सत्य मानावयास तयार नसणे म्हणजे एकप्रकारे सवर्ण समाजाने डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न मानण्यासारख्या जातीभेदातील प्रकार होय.
पुण्यात रिसर्च आफिसर या पदावर कार्यरत असताना कार्यालयातील दिनामाना नावाच्या व्यक्तीवर जातिवादी मानसिकता असलेल्या मनुवादी अधिका-यांनी केलेला अन्याय व 14 एप्रिल या दिनी मनुवादी अधिका-यांनी बाबासाहेबांच्या फोटोचा केलेला अपमान या दोन घटना कांशीरामजीच्या मनावर खोल परिणाम करून गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला जातीव्यवस्थेचे निर्मूलन हा ग्रंथ कांशीरमजींनी वीस वेळा वाचून त्याचे मनन व चिंतन केले. बाबासाहेबांच्या विचारातून त्यांच्या मनात विषमतावादी व्यवस्था नष्ट करण्याची प्रेरणा जागृत झाली आणि विषमतावादी अन्यायी व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी पूर्ण आयुष्य अर्पित करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी आपल्या आईबाबांना पत्र लिहले की मुझे सेहरा नही चाहीये, मै कफन बांधकर जिना चाहता हू। मी आता लग्न करणार नाही, घर, कुटुंब तैयार करणार नाही, लग्न वा मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही, व्यक्तीगत रूपाने माझी कोणतीही स्वत:ची संपत्ती असणार नाही.  यापुढे बहुजन समाजाचं हेच माझे कुटुंब असेल आणि त्यांच्या कल्याणासाठी रात्रदिवस झटणे हेच माझे ध्येय राहील असे त्यांनी सांगितले होते.
डॉ. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीची रिपब्लिकन नेत्यांनी केलेली वाताहत बघून कांशीरामजी कमालीचे अस्वस्थ होत असत. त्यामुळे आंबेडकरी समाजात नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी नागपूर येथे १३ जुलाई २००३ ल भाषण करताना कांशीरामजी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हणाले होते, ३५ सालो से आप लोग चिल्ला रहे है की, ये काम होवू शकत नाही, फुले-शाहू-आंबेडकर का कारोबार या देशात चालू शकत नाही. लेकीन मै कहता हू, के रहेगा चके रहेगा और खूब चलेगा, एक या दो प्रदेश मे नही, प्रदेशो मे नही, पुरे देश मे चलेगा. मेरा विश्वास है की, जबतक फुले-शाहू-आंबेडकर का कारोबार नही चलता है, तब तक बे कुचले इन्सान की बाते आगे नही बढती है. इसीलिये फुले-शाहू-आंबेडकरवाद को आगे बढाना होगा.
२८ मे १९९६ रोजी संसदेमध्ये अटलबिहारी वाजपेई यांच्या विश्वासदर्शक ठरावावर बोलताना कांशिरामजी म्हणतात, संसद मे हर कोई साम्यवाद के बारे मे बोलता है, लेकीन कास्ट के बारे कोई बोलता नही चाहता. कास्ट के बारे मे वो लोग बोलना चाहते है जो लोग जातीवाद के आधार पर इस देश मे जाती का शिकार बने है. वे इसीलिये बोलना चाहते है क्योकि उन्हेही इस देश मे जाती का खात्मा करना है. मा.कांशीरामजींची ही भूमिका बाबासाहेबांच्या जातीअंताच्या भूमिकेशी निगडीत आहे. बाबासाहेब म्हणत ब्राम्हण पुरोहित व धर्मातीत (समाजवादी) ब्राम्हण असा भेद करणे मूर्खपणाचे आहे. दोघेही जातभाई आहेत. एका शरीराचे ते दोन हात आहे आणि एकाच्या अस्तीत्वासाठी दुसरा लढल्यावाचून राहणार नाही म्हणून जातीव्यवस्था ज्या धार्मिक श्रध्दावर उभारलेली आहे, त्या उध्वस्थ केल्याशिवाय जातीसंस्था नष्ट करणे अशक्य आहे आणि हे फक्त जे या व्यवस्थेचे शिकार आहेत तेच लोक ह्या  जातीसंस्था नष्ट करू शकतात.
पुढे कांशीरामजी म्हणतात, बाबासाहाब ने आज से ६० साल पहले १९३६ मे एक किताब लिखी थी अँनीहिलेशन आफ कास्ट, जाती का बीज नष्ट करणे के लिये उन्होने वह किताब लिखी थी. हम संघर्ष कर रहे है, स संघर्ष का मकसद है जाती तोडो समाज जोडो. हम लोग जाती को टीकाये रखना नही चाहते है बल्की जाती को खत्म करना चाहते है. इसीलिये जिस जाती के रोग से हम पिडीत है उस रोग को छिपाना नही चाहते बल्की उसे उजागर करते है। इस रोग का इलाज ढूढने के लिये हम जाती की बात करते है और जाती की बात करके हम इस देश मे जातीवाद को समाप्त करना चाहते है.
मा.कांशीरामजींच्या जाती जोडो जाती तोडो ह्या तत्वज्ञानासी सहमत नसलेले अनेक जन दिसतील परंतु ज्यांनी बाबासाहेबांचा जातीसंस्थेचे निर्मुलन हा ग्रथ
अभ्यासला असेल तर ते कांशीरामजींच्या भूमिकेशी नक्कीच सहमत होतील. कारण जेव्हा वेगवेगळया भिन्न जाती जवळ येतील तेव्हाच त्यांच्यात बंधुत्व निर्माण होईल आणि या बंधुत्वातूनच जातीजातींचे रक्तमिश्रण (आंतरजातीय विवाह) होतील. जाती संस्था नष्ट करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे असे बाबासाहेब म्हणतात. रक्तसबंधाची भावना पराकोटीस पोचल्यावाचून जातींनी निर्मिलेली फुटीरतेची भावना नष्ट होणार नाही त्यासाठी आंतरजातीय विवाह हेच एकमेव जालीम औषध होय. त्यामुळेच बाबासाहेबांचा जातीसंस्था नष्ट करण्याचा उपाय हा कांशिरामजीच्या जाती जोडो जाती तोडो या मार्गात मिळतो. कांशीरांजींनी निर्माण केलेल्या बहुजनवादी चळवळीत हिंदू समाजातील अधिकाधिक जातीचा समावेश दिसतो. एका दलित नेत्याच्या नेतृत्वाखाली हिंदूतील जातीचा गोठवडा निर्माण होणे व त्यांनी समाजव्यवस्थेतील कनिष्ठ जातीसोबत आंदोलनात सहभागी होऊन हिंदू व्यवस्थेला मारक असलेला बाबासाहेब व बुध्द स्वीकारणे ही जातींनिर्मूलनाच्या कार्यातील प्राथमिक पाय-या होत्या. त्यामुळे आजच्या पोस्ट कांशीराम युगात आंबेडकरी आंदोलन जातींनिर्मूलनाचा कार्यक्रम कोणत्या चिंतनातून पुढे नेतो? हे पाहणे आवश्यक आहे. मात्र शाळेच्या दाखल्यावरून केवळ आंबेडकरी समाजाने जात काढून टाकणे हा त्यावरचा उपाय निश्चितच नव्हे. मात्र ज्यांनी जाती निर्माण केल्या व जाती धर्माच्या आधारावर समाजव्यवस्थेवर आपले वर्चस्व कायम केले त्या ब्राम्हण-सवर्ण जातींनी तशी सुरुवात केली तर ते स्वागतयोग्यच आहे. तरीही कांशीरामजींचा जाती जोडो जाती तोडो हा जातींनिर्मूलनाचा कार्यक्रम अव्याहत चालणारा आहे.
कांशीरामजी संसदेतील भाषणात अटलजींना उद्देशून म्हणतात, आपने परिवर्तन की बात की है, लेकिन मुझे नही मालूम आप और आप की पार्टी  कोणसा परिवर्तन लाना चाहती है? आजकाल कोई भी परिवर्तन की बात करता है. ते म्हणतात, हमने लखनऊ मे पेरियार मेला लगाया था, इसका भारतीय जनता पार्टी ने दटकर विरोध किया, मुरली मनोहर जोशी जो आपके बगल मे बैठे है, उन्होने लखनऊ आकर मुझे कहा,हा मेला नही लगाना चाहिये, अगर लगांना है तो स मेले को लखनऊ के बजाय दिल्ली मे लगाना चाहिये, तब मै इनसे कहा, अब हमारी सरकार उत्तर प्रदेश मे है इसीलिये हम मेला लखनऊ मे लगा रहे है, जब हमारी सरकार दिल्ली मे होगी तब दिल्ली मे लगाया करेंगे. यावरून आपले म्हणणे मांडण्यासाठी मान्यवर कांशीरामजी हे कुणाला भीत नसत तर उलट दरडावून आपले म्हणणे मांडत असत. देशातील कोणत्याही नेत्यासमोर ते वाकले नाहीत. स्वाभिमान व ताठ मानेने जगण्याचा मंत्र कांशीरामजींच्या व्यक्तिमत्वातून नेहमी मिळत असतो. कांशीरामजिचे जीवन चरित्र हे बहुजनवादी तरुणासाठी प्रेरणादायक आहे परंतु त्यासाठी बहुजनवादी तरुणांनी गंभीरपणे कांशिरामाजीचे जीवनकार्य व त्यांच्या भाषणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.   
बहुसंख्येच्या बळावर सत्ताधारी बनून देशात परिवर्तन आणणे हे तर बाबासाहेबांचे स्वप्न. हे स्वप्न साकार करण्यासंदर्भात कांशिरामजी म्हणतात, आज हमारे पास सेपरेट इलेक्टोरेट नही है, इसीलिये हमे अपने बलबुते पर मेजारीटी (सरकार) बनाणी होगी, मै समजता हू की राजसत्ता एक साधन के रूपमे काम करेगी. देश मे सामाजिक परिवर्तन लाना यह हमारा साध्य (उद्देश) है. इस साध्य को सफल बनाने के लिए साधक का काम वह लोग करेंगे जिसे इस समाज व्यवस्था के आधार पर गीराया गया है, अपमानित किया गया है, पिछाडा गया है. उनको हमे जोडना है ताकी उनमे हम परिवर्तन ला सके. परिवर्तन हमे सिर्फ सामाजिक दिशा मे ही नही बल्की हर दिशा मे लाना होगा. कांशीरामजी म्हणतात, भारतीय जनता पार्टी और कांग्रेस परिवर्तन की बात करती है मगर परिवर्तन मे उनकी दिलचस्पी नही है, वो मनुवाद को सपोर्ट करती है और मै समजता हू की जो मनुवादी है, वो परिवर्तन लाने के लिये नही बल्की परिवर्तन को रोकनेवाली विचारधारा को आगे बढाते है।
मनुवादी प्रसारमाध्यमे फुले-आंबेडकरवादी चळवळी कडे नेहमी शत्रूत्वाच्या भावनेने बघत असतात. फुले आंबेडकरी चळवळीच्या कोणत्याही कार्यक्रमाकडे त्यांचे कमेरे फिरत नसतात. एवढेच नव्हे तर ज्या दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी होत असते त्याकडे ते जाणूनबुजून पाठ दाखवीत असतात मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या दसरा मेळाव्याकडे मीडियाचा जमावडा जमलेला असतो. याबाबत कांशीरामजी म्हणतात, मनुवादी मिडिया और मनुवादी पार्टीया इनका आपस मे गठजोड है. मनुवादी मिडिया हमेशा बहुजन समाज के मनमे भ्रम फैलाता है. मनुवादी मिडिया बहुजन समाज को कमजोर करना चाहता है। जनतेला उद्देशून ते म्हणतात, आप लोगोको  मनुवादी राजनीतिक पार्टीयोको को गद्दीसे उतार फेकना होगा, अगर ऐसा आप करते हो, तो इस मनुवादी मिडीया भी अपने आप खात्म हो जायेगा और बहुजनवादी मिडिया स्थापित होगा.
मा. कांशीरामजींच्या तत्वज्ञानानुसार व्यावहारिक तडजोडीचा मार्ग मोकळा ठेवून इतराचे शिरकाण करीत स्वत:ची शक्ति वाढविली पाहिजे. राजकारण हे स्वप्नाच्या सहाय्याने पुढे जाऊ शकत नाही तर त्याला  आदर्शवादाची जोड असल्याशिवाय शक्तीशाली राजकारण निर्माण होऊ शकत नाही. आज आपण पोस्ट कांशीराम युगात वावरत आहोत, २१ व्या शतकात फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होत कांशीरामजींच्या कार्यशैलीला आधार समजून आपण पुढे गेलो तर आपल्या महामानवांनी केलेल्या कष्टाचे चीज होईल. परंतु आपण सारे विघटीत राहत असू तर त्याचा फायदा निश्चितच आपल्या शत्रुना होतो हे भान राखत
सा-यांनी एकत्रपणाचा डाव मांडला तर आपल्या विजयाला कोण रोखणार बरे!
बापू राऊत
मो.न.९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment