बाबासाहेब आंबेडकर
हे भारताचे महान सुपुत्र होते. भारतीय नेत्यांतील त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे असून
देशातील आज पर्यंतच्या कोणत्याही नेत्यामध्ये त्यांचीच अधिक चर्चा होते. समाजकारण,
अर्थकारण, राजकारण व धर्मकारण ह्या क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय
पुढे जाताच येत नाही. खरे तर बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते.
आणि विशिष्ट जातीचा कोणताही निकष आंबेडकरांना लागू होत नाही. त्यांचे अखिल भारतीय
नेतेपद हे वादातीत आहे. जर देशात संख्येने अल्पसंख्य असलेल्या जातीचे मोहनदास गांधी
व जवाहरलाल नेहरू हे देशाचे नेते म्हणून प्रस्थापित होतात त्याच न्यायाने संख्येने
बहुसंख्य असलेल्या समाजाचे