१ जानेवारी हा दिवस “अन्याय मुक्ती दिन वा शौर्य दिन” म्हणून बहुजन
समाजाकडून दरवर्षी साजरा केला जातो. आज जरी हा दिवस महाराष्ट्रापुरता साजरा केला
जात असला तरी भविष्यात तो देशभर साजरा केल्या जाईल. या “अन्याय मुक्ती दिनाची” नाळ
ही पुणे जवळील भीमाकोरेगाव या गावाशी सबंधित आहे. १ जानेवारी १८१८ हा दिवस हजारो
वर्षाच्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या बेडया तोडणारा होता. दुबळ्या लोकांना
अन्यायपूर्ण वागणूक देत त्यांना अधिक दुबळे बनविनार्यां शेंडीधारकांची उर्मी
उतरविणारा व अज्ञ लोकांना चिथावणी देवून स्वत: नामानिराळे राहणाऱ्या पेशवेशाहीच्या
अस्ताचा सुदिन होता. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर नावाचा महान विद्वान १ जानेवारीला
देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असोत भिमाकोरेगावाच्या स्तंभावर माथे टेकण्यासाठी
न चुकता जात असत.