Tuesday, December 27, 2016

भीमा कोरेगावच्याही पलीकडे .......

१ जानेवारी हा दिवस “अन्याय मुक्ती दिन वा शौर्य दिन” म्हणून बहुजन समाजाकडून दरवर्षी साजरा केला जातो. आज जरी हा दिवस महाराष्ट्रापुरता साजरा केला जात असला तरी भविष्यात तो देशभर साजरा केल्या जाईल. या “अन्याय मुक्ती दिनाची” नाळ ही पुणे जवळील भीमाकोरेगाव या गावाशी सबंधित आहे. १ जानेवारी १८१८ हा दिवस हजारो वर्षाच्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या बेडया तोडणारा होता. दुबळ्या लोकांना अन्यायपूर्ण वागणूक देत त्यांना अधिक दुबळे बनविनार्यां शेंडीधारकांची उर्मी उतरविणारा व अज्ञ लोकांना चिथावणी देवून स्वत: नामानिराळे राहणाऱ्या पेशवेशाहीच्या अस्ताचा सुदिन होता. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर नावाचा महान विद्वान १ जानेवारीला देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असोत भिमाकोरेगावाच्या स्तंभावर माथे टेकण्यासाठी न चुकता जात असत.
काय होता भीमाकोरेगावचा संग्राम? भीमा कोरेगावचा संग्राम हा पेशवे विरुध्द महार असा होता.  लढाईच्या रणात पेशव्याचे २८००० हजार सैनिक विरुध्द ५०० महार सैनिक असा सामना होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली पेशव्यांनी दिलेली वागणूक अन्यायकारक व क्लेशदायक होती. पेशव्याकडून क्षणोक्षणी महार सैन्याचा अपमान करण्यात येत होता. तरीही, तुम्ही आम्हास चांगली वागणूक दिल्यास व आपल्यासोबत लढण्याची संधी दिल्यास आम्ही इंग्रजाविरुध्द लढू असा प्रस्ताव महार सैनिकांनी दुसऱ्या बाजीराव पेशवा समोर ठेवला होता. परंतु हा प्रस्ताव अपमानास्पद पध्दतीने धुडकावून लावण्यात आला. त्यामुळे अन्याय व अपमानाचा बदला घेण्यासाठी पेशव्याविरुध्द लढण्याचा निर्णय घेण्यात आला. खरे तर हजारो वर्षाची सांस्कृतिक गुलामी नष्ट करून पेशव्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वाला नेस्तनाबूत करण्याची ती एक नामी संधी प्राप्त झाली होती.
१ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या संग्रामात इंग्रजाच्या वतीने महार व दुसरे बाजीराव पेशवे यांच्यात भिमा नदीजवळ वसलेल्या कोरेगाव येथे युध्द झाले. या युध्दात केवळ ५०० महार सैनिकांनी पेशव्याच्या २८००० हजार सैनिकांचा दणदणीत पराभव केला. या लढाईत २२ महार सैनिक ठार झाले. याच सैनिकांची नावे पुणे जवळील कोरेगाव येथे उभारलेल्या विजयस्तंभावर कोरलेली आहेत. उरलेल्या पेशव्यांच्या सैनिकांचा सोलापूर व आष्टीच्या लढाईत पुन्हा धुव्वा उडविला व संपूर्ण पेशवाई संपुष्टात आणून आजपर्यंत अस्पृश्य समाजावर पेशव्यांनी केलेल्या संपूर्ण अन्यायाचा बदला घेतला.
बॉम्बे गझेटियर ई.स.१८८४-८५ प्रकाशित झालेल्या महार जातीच्या संदर्भात लिहिल्या गेले की, पेशवे काळात केवळ महाराच्या शरीराचाच स्पर्श नव्हे तर शरीराच्या सावलीचा देखील स्पर्श होऊ नये यासाठी नियम व शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. अशा बावचळटलेल्या संस्कृतीधारकांना धडा शिकविणे व त्यांच्या मस्तावलेल्या सत्तेचा अस्त करने ही फार मोठी  क्रांतिकारी कामगिरी होती. ही ऐतिहासिक कामगीरी महार सैनिकांनी लीलया पार पाडली. याच युद्धानंतर पेशवेशाहीचा अस्त होवून एका समतेच्या युगास प्रारंभ झाला. मानवी हक्क व अधिकार मागण्याच्या कार्याचा शुभारंभ पेशव्याच्या अस्तानेच सुरु झाला. ब्रिटीश काळात अस्पृश्य समाजासाठी काही प्रमाणात शिक्षणाची दारे उघडी झाली. ब्रिटीश मिलिटरी मध्ये महत्वाची पदे प्राप्त झाल्यामुळे काहीना आपला विकास साधता आला. हे सर्व होण्यास भीमा कोरेगावचा संग्रामच कारणीभूत होता. तर बाबासाहेब आंबेडकरानी मनुवादी व्यवस्थेवर शेवटचा हाथोडा मारून मनुस्मृतीच्या बाजारू व दुष्ट व्यवस्थेला शेवटची मुठमाती दिली. भिमाकोरेगावच्या युध्दात ज्यानी पराक्रम करून नव्या युगाचा प्रारंभ केला त्या वीरांना केवळ सलामी देण्यासाठीच नव्हे तर त्या पराक्रमाची साक्ष सतत जागृत ठेवून भूतकाळाची पुनरावृत्ती परत परत होवू नये म्हणून बहुजनाकडून जागृत व जागता पहारा तेवत ठेवण्यासाठीच बाबासाहेब न चुकता भीमा कोरेगावला जात असत.
परंतु मनुवादी व्यवस्थेचे परत पुनरुज्जीवन करण्याचे कार्य विनायक सावरकर यांच्या हिंदू महासभेने व गोलवळकराच्या स्वयंसेवक संघाने एका प्रोजेक्टच्या स्वरुपात हातात घेतले. या कार्यात भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मधील ब्राम्हण्यवादी ब्राम्हणांचा फार मोठा सहभाग होता. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला व कार्याला नेस्तनाभूत करण्याचा मोठा प्रयत्न केला. आंबेडकरोत्तर काळात व्यवस्थेविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या लोकामध्ये फोडा, झोडा व पाडा या नीतीचा अवलंब करण्यात आला.
आज केवळ भिमाकोरेगावला जावून विजयी स्तंभावर माथा टेकविण्याचे काम केले जाते. परंतु त्यातून व्यवस्थेविरोधात लढण्याची उर्जा मात्र घेतली जात नाही. स्वत:च्या आत्ममग्न ग्लानीमध्ये मश्गुल असणे ही एक जीवनी झाली असून मनुस्मृतीची संथगतीने होणाऱ्या प्रवेशाकडे डोळ्यांनी आपली झापडे बंद केली आहेत. मनुस्मृतीची ही चोरपावले देशाला व बहुजनाला नेस्तनाबूत करू लागली तरीही एक विचारधारा, सारखेच आदर्श व झेंड्याचा एकच रंग असलेले मात्र एकाच पथावर मार्गक्रमण करताना दिसत नाहीत. विभाजनात पराभवाची बीजेच पेरलेली असतात हे तत्व समजूनही वेगळ्या वाटा. केवळ फुले-आंबेडकरांचे नाव घेणे, त्यांच्या नावाने सभासंमेलने घेणे म्हणजे “फुले-आंबेडकरी विचार” असे मानने हे एका खोट्या मृगजळासारखे आहे. खरे फुले आंबेडकरवादी तर ते असतात जे त्यांच्या विचारावर चालून ध्येयाकडे आगेकूच करतात. परंतु आज मुखवट्यांच्या बाजारात फुले-आंबेडकरवादी शोधूनही सापडत नाही हे एक सत्य आहे.   दलालांच्या रांगेतील संधीसाधू लोक “फुले आंबेडकरवादी” कसे काय होवू शकतात? फुले आंबेडकरी विचाराच्या विरोधी छावणीमध्ये जावून “फुले आंबेडकरवाद” नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या द्रोह्याना फुले-आंबेडकरवादी कसे म्हणायचे? आपल्या मताची(व्होट) किंमत लावणारे लोक हे आंबेडकरद्रोही आहेत असे का म्हणू नये?. असे लोक वा नेते एकतर फुले-आंबेडकरवादालाच मुर्ख समजत असावेत किंवा ते स्वत:च महामुर्ख असल्याचे सिद्ध करीत असावेत. फुले आंबेडकरवाद पेलण्यास जनताच सक्षम नसेल तर त्या जनतेच्या भविष्याचा शेवट हा वैशालीच्या लीच्छ्वी लोकासारखाच होवू शकतो. याची जाणीव नसणारे लोक येवू पाहणाऱ्या मनुवादाचा पहाड कसा रोखू शकतील?
ज्या कारणामुळे बहुजन आपले स्वराज्य गमावून बसले ती कारणे आजमितीस कायम शाबूत आहेत. गरीब व दुबळ्या लोकांना न्याय, शिक्षण, आर्थिक सक्षमता, रोजगार व समान हक्क देण्यावर बंधने येवू घातली आहेत. गरीब व दुबळ्याना गुलाम करण्याची उर्मी आजही कायम आहे. लोकशाहीला श्रीमंताची, साधूंची व धर्मसंस्थांची बटिक बनविले गेले आहे. राजकीय संदर्भात आम्ही  जे तुकडे टाकू तेच केवळ चघळत बसा अशी व्यवस्था निर्माण केली गेली. अज्ञ लोकांना चिथावणी देवून शेंडीधारी लोक स्वत: नामानिराळे राहू पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भीमाकोरेगावला जावून केवळ माथा टेकविन्यात काय हाशील? तर भीमा कोरेगावच्याही पलीकडे काय जळते हे पाहण्याची व जाणण्याची आज मोठी गरज आहे.

बापू राऊत,
मो.न. ९२२४३४३४६४,

ई-मेल: bapumraut@gmail.com

8 comments:

  1. samosa khanar ka?

    ReplyDelete
  2. vada pav khanar ka?

    ReplyDelete
  3. केळ घ्या केळ .

    ReplyDelete
  4. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला .*
    *देशी कुत्र्यांनी विचारलं, मित्रा तुमच्याकडे काय कमतरता होती ज्यामुळे तू इथं आलास?*
    *तो म्हणाला,*
    *आमच्याकडचं राहणीमान , वातावरण, खाणं पिणं, जीवनचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीने झकासच आहे.*
    *पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठेही नाही.*

    ReplyDelete