आजच्या आधूनीक काळात “अज्ञानाचा अवतार” अशी बिरुदावली कोणाही
व्यक्ति वा समूहाला आवडणारी नसते. परंतु कोणी आजच्या विकसित जीवन पध्दतीला नाकारित
हजारो वर्षाच्या बुरसट रुढीमध्येच गुंतून राहत असेल त्यावर हा शब्दप्रयोग मात्र चपखल
बसतो. जर कोणी विदेशी वस्तु बाळगून स्वदेशी चा नारा देत असेल त्याला मूर्खच म्हटले
पाहिजे. त्याच प्रकारे विज्ञानाने सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, पृथ्वी, निसर्ग याचा उलगडा केला असतांनाही त्याच्या
नावे व्रतवैफल्ये व विधी करणारेही अज्ञानांच्या रांगेत बसतात. सत्य नाकारून असत्याच्या
मार्गावर चालणारे रुढीच्या गर्तेत रुतून आपल्या पिढ्यांचा सत्यानाश करतात. भारतीय बहुजन
समाज अशाच द्विद्धा मनस्थितीमध्ये अडकलेला आहे. अनेक पिढ्यापासून बहुजन समाज शोषितांचे जीवन जगत आला आहे. त्यांच्यातील
प्रज्ञावंतांनी स्वय: प्रकाशित होण्याचा उपदेश दिला. काहींनी तो स्वीकारला तर काहींनी
नाकारला. ज्यांनी तो स्वीकारला ते लोक तर्क व विचार करू लागले. आपले