Saturday, November 10, 2018

केवळ विवेकी विचाराने पुढे जाता येते, कोणा भटी पंडिताच्या नव्हे !


आजच्या आधूनीक काळात “अज्ञानाचा अवतार” अशी बिरुदावली कोणाही व्यक्ति वा समूहाला आवडणारी नसते. परंतु कोणी आजच्या विकसित जीवन पध्दतीला नाकारित हजारो वर्षाच्या बुरसट रुढीमध्येच गुंतून राहत असेल त्यावर हा शब्दप्रयोग मात्र चपखल बसतो. जर कोणी विदेशी वस्तु बाळगून स्वदेशी चा नारा देत असेल त्याला मूर्खच म्हटले पाहिजे. त्याच प्रकारे विज्ञानाने सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, पृथ्वी, निसर्ग याचा उलगडा केला असतांनाही त्याच्या नावे व्रतवैफल्ये व विधी करणारेही अज्ञानांच्या रांगेत बसतात. सत्य नाकारून असत्याच्या मार्गावर चालणारे रुढीच्या गर्तेत रुतून आपल्या पिढ्यांचा सत्यानाश करतात. भारतीय बहुजन समाज अशाच द्विद्धा मनस्थितीमध्ये अडकलेला आहे. अनेक पिढ्यापासून बहुजन समाज शोषितांचे जीवन जगत आला आहे. त्यांच्यातील प्रज्ञावंतांनी स्वय: प्रकाशित होण्याचा उपदेश दिला. काहींनी तो स्वीकारला तर काहींनी नाकारला. ज्यांनी तो स्वीकारला ते लोक तर्क व विचार करू लागले. आपले 

हक्क, अधिकार, आत्मसन्मान मागण्याबरोबरच रुढी व अंधश्रध्दाना ठोकर मारत सुटले तर ज्यांनी नाकारला ते आजही व्यवस्थेचे गुलाम व ब्राम्हणवाद्यांची बिना पैशाची फौज बनून काम करीत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओबीसीना मंडल आयोगाद्वारा आरक्षण मिळत असतांनाही त्याचा विरोध करीत मोर्चे काढणारे व स्वत:स जाळून घेणारे ओबीसी विद्यार्थी. तर दूसरा म्हणजे आपली पुंजी खर्चून व कष्ट/मेहनत करीत मंदिरे बांधून ती ब्राम्हनांच्या हवाली करणारा बहुजन वर्ग. पूजापाठाच्या निमित्ताने आपला कमावलेला पैसा ब्राम्हणाच्या खिशात घालणारा परंतु मंदिरात जमा होणार्‍या करोडो रुपयाचे काय होते, यावर प्रश्न न विचारणारा भारतीय माणूस.  अशी अनेक उदाहरणे आहेत जी जागेअभावी देता येत नाही.

आता काहीसा बहुजन समाज भटांच्या शब्दांना उडवून तुडवू लागले आहेत. याचे कारण बहुजन समाजातिल ओबीसी व मराठा समुहाना त्यांच्या शब्दातील फोलपणा व कपटनीती कळून चुकलीय. आमचे मेंदू तुमच्यापेक्षाही सामर्थ्यवान झाले आहेत या जाणीवेची ती निष्पत्ती आहे. तो म्हणू लागलाय, तुमच्या पुराणातील, वेदातील व  धर्मशात्रातील वांगी आमच्या अनुभवापुढे वाळलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे आहेत. ते वेद-पुराणी कागदी घोडे व त्यातला शब्दांच्छल आम्हाला आता मूर्ख बनवू शकत नाही. कारण आमचे अनुभव तुमच्या काल्पनिक भाकडकथाना पुरून उरत आहेत.   

ब्राम्हणी वेद-पुराण-गीतेनी हिंदू म्हणवून घेणार्‍या बहुजन समाजावर फार अन्याय केला. चांगल्या गोष्टीचे श्रेय त्यांनी आपल्या पूर्वजांना दिले आणि वाईट गोष्टीचा ठपका बहुजनांच्या पूर्वजांच्या माथी मारला. त्यांनी अन्यायाला न्याय आणि न्यायाला अन्याय ठरविण्याची किमया केली. स्वत:च्या अत्यंत दुष्ट, क्रूर पूर्वजांना त्यांनी सज्जन म्हटले तर बहुजनातील सदाचरणी लोकांना त्यांनी दुष्ट म्हणून नोंद केली. अशी कितीतरी पापे केली. म्हणून ब्राम्हनानी लिहलेल्या कोणत्याच साहित्यावर विश्वास ठेवता येत नाही. ठराविक लोकांनीच डोके वापरावे व इतरांनी केवळ माना हलवून कृती करावी अशी ब्राम्हणनीती आजही वापरली जाते.  बहुजनांनी आता पुढचे पाऊल उचलत ब्राम्हणी संस्कृतीतिल सत्य शोधले पाहिजे. चोखंदळ वाचक बनून खर्‍या खोट्याची चाचणी केली पाहिजे. नागपुरी सांघिय विचाराचा पराभव जेवढा जास्त लवकर होईल तेवढ्याच गतीने भारतीयांचे सहजीवन सुखकारक होईल.     

शिक्षण घेतले नाही तर लोक आपल्याला गावंढळ म्हणतात. तसेच तर्क व विचारांचे आहे. भटी लोक  म्हणतात म्हणून त्यांचेच म्हणणे पुढे सरकवयास लागलो तर विज्ञानाच्या भाषेत आपल्याला निर्बुध्द व बेअक्कल ठरवतील. बहुजनातील एखाद्याने आपल्या विवेक बुध्दीने पुराणातील/ वेदातील एखाद्या गोष्टीचे सत्य विवेचन करुण सांगितल्यास तो आपल्या धर्मविरोधी आहे असा कांगावा बहुजनातीलच लोक करावयास लागतात. विरोधी प्रतिक्रिया देण्यासाठी मग ते भावे, कुलकर्णी, जोशीच्या व्हाट्सअप वरील लेख फारवर्ड करतात. बहुजनातील अशा परावलंबिना समजावून सांगणे फार कठिन काम असते. काहीजन तर ब्राम्हनांच्या बोलण्याला फार पवित्र मानतात. ब्राम्हणाची एक विशिष्ट कार्यपध्दती असते. बहुजनातील बोलू शकणार्‍या व धडपड्या व्यक्तिला हेरून त्याला धार्मिक संस्थानचे विश्वस्थ, बजरंग दल वा एखाद दुसर्‍या संघटनाचा पदाधिकारी बनवून त्याला आपल्या कार्यसिध्दीसाठी राबवून घेत असतात.

काही प्रश्न आहेत, जसे की, वेदातिल वा शास्त्रातील एखादा मंत्र भटाने म्हटला तर एखाद्या बाईचे सिझरीनने होणारे ऑपेरशन नार्मल पध्दतीने होईल काय? किंवा मंत्राचा जप केल्याने परीक्षेत पास होता येईल का? मंत्राने पाऊस पाड़ता येवून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखता येतील काय? ब्राम्हण व शुद्र यांच्या रक्ताचा रंग वेगवेगळा का नसतो? भूकंपात शेजारी असलेल्या एखाद्या जोशीचे घर जसेच्यातसे राहून शूद्र सोमदेचे घर मात्र जमीनदोस्त होते. असी काही उदाहरणे अनुभवात आहेत का? निसर्ग असमानता मानत नाही तर मग ही पुस्तकीय असमानता कोणी निर्माण केली? आजकाल महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत. हवन, मंत्रोपचार व पूजापाठ यानेच आरक्षण मिळत असेल तर मग असे आंदोलन करण्याची गरजच का भासते? ब्राम्हणाला हवे तेवढे पैसे देवून त्यांच्याकडून चांगले वेदोक्त मंत्र व हवन करुण घेवून आरक्षण पदरात पाडुन घ्यावे. परंतु हे कसे शक्य आहे? असा प्रश्न विचारणारे ब्राम्हणाकडून सत्यनारायन घालून, मंदिरात दान करुन, सिध्दविनायकाला फेरे घालून, लालबागच्या गणपतिला लोटांगण घालून हवे ते प्राप्त होते असे जर म्हणत असतील तर ते जागतिक महामूर्ख नव्हेत का?
एखादी कुमारिका लग्न न करता केवळ नवसाने व पुजेने पुत्रप्राप्ति करायचा हट्ट धरत असेल तर तुम्ही तिला काय म्हणनार? तीर्थ करून व देवाचा प्रसाद खाउनही जर अपघाताने माणसे मरत असतील तर तो दोष कोणाला देणार? जर तो दोष माणसाचा असेल तर मग देवाचे दर्शन व्यर्थ ठरत नाही का? धर्म व राम मंदिरे याच्या नावावर सत्तेत राहू पाहणारी मंडळी बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनवून ठेवून त्यांच्याकडून हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून घेतात.

भारतात बाम्हणेत्तर लोकांना शिक्षण घेण्याची मुभा व लिहन्याचा अधिकार कधी  प्राप्त झाला? याचे ऊतर शोधले पाहिजे. तेव्हाच ही सर्व शास्त्रे व धर्मग्रंथ आमची कशी? बहुजनांच्या पूर्वजानी जी लिहलीच नाही ति शास्त्रे त्यांची कशी होवू शकतात? यावर ते प्रश्न निर्माण करू शकतील. ज्यानी ती लिहली त्यांची ती पोट भरण्याची साधने झालेली आहेत. आपण आपल्या डोळ्यावरची झापडे बाजूला सारली की राम, रावण, कृष्ण, अर्जुन, पांडव, कौरव, वेद, पुराणे, पूजापाठ यातले सत्य व खोट्या गोष्टीचा बनावटपना आपोआप उघड होईल. मग कोणत्याही भावे, देशपांडे व जोशी सारख्याच्या लेखावर, व्हाट्सएप पोस्टवर व पुस्तकावर अवलंबून राहायची गरज भासनार नाही.  भट्ट लक्ष्मीधर (इ.स. ११५०) आणि हेमांद्री यांच्या अनुक्रमे कृत्यकल्पतरूचतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांनी  कर्मकांड व विधी यात बहुतांश लोकांना गुंतवून ठेवले होते.  दुसरे कोणतेही काम करण्यास वेळच मिळनार नाही, एवढी कर्मकांडे त्यात भरलेली होती. आजच्या काळात दादरी साळगावकर, पुणेरी व बनारसी भट हे काम इमानइतबारे करून बहुजन समाजाला धर्मभोळा, संकष्टीधारी, पूजापाठी व अंधश्रद्धाळू बनवीत आहेत.
“इडा पीडा टळो व बळीचे राजी येवो”  ही म्हण शेकडो वर्षापासून शेतकरी व बहुजन समाजातील लोक म्हणत आले आहेत. बळी हा  शेतकर्‍यांचा राजा. परंतु हेच शेतकरी आपल्या राजाचे बलिप्रतिप्रदेला ब्राम्हनांच्या साथीने बळीचे पोट फाडण्यासाठी व त्याला मारणार्‍या वामनाची पुजा करायला पुढे सरसावतात. खंडोबा हे बहुजणांचे कुलदैवत परंतु या खंडोबाला ब्राम्हन कधीही आपले दैवत समजत नाही. असे का? यावर शेतकरी समाजाच्या लोकांनी विचार करायला पाहिजे.

ब्राम्हनी विचार हे रूढी म्हणून भारतीयांना आधुनिक विचारापासुन रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.  सामाजिक दू:खाची मूलभूत कारणे आता मानवी दृष्टीपासून लपलेली नाही. त्यवरचे उपाय हे कोणत्याही धर्मशास्त्रात सापडणारे नसून ते योजनाबध्द प्रयोगापासून मिळणार्‍या तार्किक अनुमानावर व वैज्ञानिक जाणिवातूनच मिळतात. त्यामुळे विवेकानेच पुढे जावून आपली प्रगति साधता येईल, ती कोना भटब्राम्हणानी लिहलेल्या धर्मशास्त्रातून वा गूढ रुढीतून नव्हे, असा विचार केल्यास सर्व समाजाची भरभराट होईल यात कोणतीही शंका उरत नाही.

बापू राऊत

2 comments: