देशात दरवर्षी कृष्णजन्मोत्सव
येतो, तो येतो एक नव्या जागृत मानवतेची, प्रेमाची व
बंधुत्वाची उमेद घेवून. कट्टर धर्मांधतेला, असहिष्णूतेला व
अमानवीय मूल्यांना नष्ट करणारा हा उत्सव केवळ उत्तर भारतापुरता मर्यादीत न राहता
विदेशात या उत्साहाचे लोन पसरले आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सवदिनी देशात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांची रेलचेल असते. हा उत्सव कृष्ण मंदिरात व परंपरा प्रेमींच्या घरात साजरा होतो.
एवढेच नव्हे तर रस्त्यावरून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात येवून मोठ्या तल्लिनतेने नागरिक यात
सहभागी होत उत्साही होवून नाचत असतात. हीच तर आहे
धर्मस्वातंत्र्याची व आपला उत्सव जबाबदारीने पार पाडण्याची पध्दत.
सद्सदविवेकबुध्दीच्या स्वातंत्र्याचा आणि दुसर्याच्या धर्मतत्वाना मान देत आपला धर्म
मुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याचा तो एक अधिकार आहे.
Sunday, August 25, 2019
Saturday, August 17, 2019
अनुच्छेद 370 वरील जनमताचे पडसाद
5 ऑगस्ट 2019 ला भारत
सरकारने कलम 370 व 35 अ रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वातंत्र्यानंतरच्या
काळातील घेतलेल्या काही धाडसी निर्णयापैकी एक होता. जवाहरलाल नेहरूच्या काळात
झालेले संस्थानांचे विलीनीकरण, इंदिरा गांधीच्या नेतृत्वात 1971 ला पाकिस्तान सोबत युध्द
करून निर्माण केलेला नवीन बांगला देश व बँकाचे राष्ट्रीयकरण आणि व्ही.पी.सिंग
यांनी मंडल आयोग लागू करण्याचा घेतलेला महान निर्णय. याच कळीत नरेंद्र मोदीचा
निर्णय सुध्दा चपलख बसणारा आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत बहुसंख्यांक समूहाने ढोल ताशाद्वारे
केले. परंतु ज्यांच्यासाठी तो निर्णय होता
Subscribe to:
Posts (Atom)