महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांचा ज्वर संपून त्याचे निकाल २५ ऑक्टोबर
२०१९ ला जाहीर झालेत. हे निकाल अंदाजाला
पराभूत करून अचंभीत करणारे निघाले. कारण
ज्याप्रकारे मतदान संपल्याबरोबरच सार्या न्यूज चॅनेल्सनी आपापले एक्झिट पोल
दाखविले त्यावरून दोन्ही राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळण्याचे दावे करण्यात आले
होते. हे दावे कोणत्या बळावर केले हे स्पष्ट नसले तरी भाजपाला लोकसभेच्या विजयावर आधारित
हे एक्झिट पोल होते हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे या न्यूज चॅनेल्सनी आत्मपरिक्षण
करायला शिकत संतुलित राहायला पाहिजे हे सांगणा-या या निवडणूक निकालाने भारतीय
मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये असेही स्पष्ट बजावल्याचे दिसते.
Sunday, October 27, 2019
Wednesday, October 2, 2019
बेडसे लेणी: निसर्गाच्या कुशीतील प्रेक्षणीय स्थान
पवना नदीच्या जवळ व पठारी मैदानातील ३०० फुट उंचीच्या डोंगरमाथ्यावर लेण्याचा समूह
असून त्यांना बेडसे लेणी असे संबोधले जाते. बेडसे लेण्यांमध्ये चैत्यगृह, एक मोनास्ट्री, दोन स्वतंत्र गुहा असून काही अपूर्ण गुहा आहेत. या अपूर्ण गुहा
म्हणजे दगडाच्या कडकपणामुळे आकार येत नसल्याकारणाने सोडून दिलेला अर्धवट भाग. गुहेच्या
समोर काही कुंड असून त्यापैकी एका कुंडाच्या समोर “पाणी पिण्यासाठी” असे
ब्राम्हीलिपीत लिहलेले आढळते. लेण्याच्या वरच्या बाजूस
पत्र्यासारखे दिसणारे दगडी छत असून स्थापत्य कलेचा तो अप्रतिम नमूना आहे. ह्या बेडसे लेणी, पुणे जिल्ह्यातील मावळ
तालुक्यात असून भाजे लेणी पासून ९ कि.मी. अंतरावर आहेत. लोकांना कार्ला आणि भाजे
लेण्यांविषयी बरीच माहिती आहे. वास्तविकता मावळ प्रदेशातील ह्या लेण्यांचा त्रिकोण
(कार्ला-भाजे-बेडसे) बेडसे लेण्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. बेडसे लेण्या जवळच पवना
धरणाला लागून लोहगड,
Subscribe to:
Posts (Atom)