Monday, November 18, 2019

शिवसेना-राष्ट्रवादी-कांग्रेस युती किती सम, किती विषम ?


शिवसैनिकाला महाराष्ट्राचा “मुख्यमंत्री” बनविणारच असे वचन शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचे उध्दव ठाकरे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेत ५०-५० टक्केचा हिस्सा मागत भाजपाकडे अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आणि महायुतीच्या बिघाडीला सुरुवात झाली.  दरम्यान भाजपाला पूर्णचंद्राची सवय झाल्यामुळे आणि सत्तास्पर्धेमध्ये समान विचारधारेचा कोणीही प्रतिस्पर्धी नको असल्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीला केराची टोपली दाखविलेली दिसते. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सहकार्य मिळाले तरच त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता येते. परंतु सत्तास्थापनेत आड येणारी बाब म्हणजे विरोधाभासी विचारधारा आणि त्याचा परंपरागत मतदारावर होणारा परिणाम होय. त्यामुळे सरकार बनले तरी ते टिकेल आणि चालेल काय? याची सांशकता सगळेच व्यक्त करू लागलेले दिसतात.