Wednesday, April 8, 2020

महात्मा ज्योतिबा फुले : एक थोर समाजक्रांतिकारक


लोकहितवादी, महादेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर हे महात्मा फुल्यांच्या समकालीन सुधारक होते. परंतु हे सुधारक हे बहुजन समाजाविषयी केवळ शब्दामधून उसासे व सहानुभूती दाखवत. हे सुधारक आपल्या सुधारकी विचाराच्या विरोधी कृतीही करीत असत. पण ज्योतिबा फुले अशा सुधारक फळीतील नव्हते. 'बोले तैसा चाले' हा त्यांचा बाणा होता.  ब्राम्हणेत्तराना जागे करण्याबरोबरच ब्राम्हण महिलावर होणार्‍या अन्यायाच्या निर्मूलनाला सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य समजले.

Thursday, April 2, 2020

प्लेग, टिळक, चाफेकर बंधू आणि आजचा कोरोंना


आज संपूर्ण जगाला कोरोंना विषाणूनी वेढलेले आहे. शक्तीशाली व विकासात अग्रेसर समजले जाणारे अमेरिका, इटली, स्वीडन, स्पेन, फ्रांस, जर्मनी, कॅनडा व ब्रिटन हे देश या कोरोंना विषाणूने पुरे हबकले आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे मोडायला लागले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्य सोईनी सशक्त असलेल्या या देशात लाखो लोक विषाणूनी संक्रमित होवून हजारो जन मृत्यूमुखी पडत आहेत. हा विषाणू जगासाठी एक धोक्याची घंटाच असून जगाची आर्थिक स्थिती व समीकरणे बदलविणारा  ठरू शकतो.