टिळक व गांधी या दोहोंमध्ये एक मूलभूत फरक होता. अस्पृश्योद्वार झाल्याशिवाय भारत
स्वातंत्र्य होणार नाही ही गांधीची ढोंगी विचारसरणी तर ब्राह्मणांनी कौन्सिलात गेल्याशिवाय
देशोद्वार होणार नाही ही टिळकांची जातीश्रेष्ठतेची भूमिका. देशाच्या राजकारणांची व
ब्रिटीशविरोधातील आंदोलनाची सर्व सूत्रे ही आपल्या हातामध्ये असावी याची सुप्त धडपड
दोघांच्याही अंतरंगात होती. रानडे व गोखले यांचेकडून राजकीय सूत्रे आपल्या हातात घेवू
पाहण्याची टिळकांची नीती तर राष्ट्रीय राजकारणातून टिळकांना घालविण्याची गांधीची व्युव्हरचना, दोघांची ही पध्दत वेगळी असली तरी उद्देश मात्र एकच होता आणि
तो म्हणजे ‘एकमेकांना राजकारणातून घालविण्याचा’.