गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे.
त्यासाठी त्यांनी “एक मराठा लाख
मराठा” या नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी
केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या
१० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ
घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी
कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ
असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच
आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय.
त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे
मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष
अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही
मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच मराठ्यांची भागीदारी व
सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.