Sunday, June 17, 2012

हिस्ट्री / आयबीएन लोकमतला आव्हान: म.गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील श्रेष्ठत्वासाठी जनमताचा कौल घ्यावा!



हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन चॅनलच्या वतीने म.गांधी यांच्यानंतर भारतातील सर्वात थोर व्यक्ती कोण?. यासाठी जनमताचा कौल घेण्यात आला होता. जनमताच्या या कौलात महात्मा गांधीनंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे असे हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन चॅनलच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. मिसकॉलच्या माध्यमातून देशपातळीवर लोकांची मते मागविण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक १४0३८३९ एवढी मते मिळून प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

म.गांधी यांच्या नंतर श्रेष्ठ कोण?. हे हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन यांचे सर्वेक्षण करणे मुळातच चुकीचे होते. लोकांच्या मतदानाशिवाय म. गांधीना सर्वात श्रेष्ठ भारतीय ठरविनारे हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन हे कोण?. गांधीजीना श्रेष्ठ ठरविण्याचा अधिकार यांना कोणी दिला?. लोकशाही मूल्ये पायदळी तुडउन आम्ही सांगतो तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ हि उच्चवर्णीयांची हुकुमशाही केवळ या देशातच चालू शकते. जगात श्रेष्ठ व्यक्ती कोण हे ठरविन्यासाठी वेगवेगळया माध्यमातून जनमत घेण्यात येते व त्या जनमताच्या आधारेच त्या त्या व्यक्तीस श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. परंतु हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन या माध्यमांनी श्रेष्ठत्व ठरविण्याचे सर्व मापदंड फेकून दिले. जनमताच्या लोकशाही मूल्यावर या माध्यमांचा विश्वास नाही हेच यातून सिद्ध होते. जनमताचा कौल न घेता म.गांधीना श्रेष्ठत्व प्रदान करण्याचा हा निर्णय भीतीतून घेण्यात आला हे स्पष्ट आहे. जनमताच्या कौलात म.गांधी पहिल्या नंबरवर कधीच येणार नाहीत हे या चाणाक्ष मनुवाद्यांनी पुरते ओळखले होते त्यामुळेच गांधीना परस्पर श्रेष्ठ ठरविण्याचा डाव खेळण्यात आला.

सुमार लोकांच्या यादीत बाबासाहेबांचे नाव समाविष्ठ करणे हा बाबासाहेबांचा खरा तर अपमानच होता. देशातील ३० टक्के जनतेने बाबासाहेबांच्या या अपमानाचा विरोध वेगवेगळया माध्यमातून दर्शविला होता. परंतु कोणाच्याही विरोधाला न जुमानता या माध्यमांनी आपले मनसुबे पुढे रेटत नेले. यांच्या या मनसुब्यावर पाणी फेरत देशातील जनतेनेही सर्वात जास्त मिसकाल करून बाबासाहेबांचा श्रेष्ठत्वाचा जागतिक दर्जा मनूवाद्याची वसाहत असलेल्या भारतातही कायम राखला. हे या देशातील बहुसंख्य जनतेने या माध्यमांना दिलेली एक फार मोठी चपराक तर आहेच परंतु त्याहूनही आम्ही या प्रचंड विद्वत्ता असलेल्या सूर्यपुत्रावर किती प्रेम करतो हेही त्यांनी दाखवून दिले आहे..

आज बाबासाहेबांचे जीवनचरित्र व त्यांचे विचार प्रचंड प्रमाणात वाचल्या जात आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना एवढे महत्व का येत आहे?. याचे सामान्यज्ञान आजही या देशातील मनुवाद्यांनी समजून घेतलेले दिसत नाही. याउलट महात्मा गांधीला ते स्वयंघोषित सर्वश्रेष्ठत्व प्रदान करण्याचा अनाठायी प्रयत्न करीत आहेत. आज या देशात म. गांधीच्या विचाराची महत्ती फारशी राहिलेली दिसत नाही. म.गांधी हे आज फक्त कांग्रेस पुढारी व काही सामाजावाद्यापुरते मर्यादित राहिलेले आहेत. आज ते कांग्रेसचे फोटो अल्बम झालेले आहेत. निवडनुकांच्या  काळात हेच कांग्रेसी पुढारी म.गांधीचे नाव कधीच उच्चारत नसतात तर त्यांच्या तोंडी फक्त फुले शाहू आंबेडकर यांचेच नाव असते. सरकारी यंत्रणेशिवाय आज कोणीही गांधीजीचे नाव घेताना दिसत नाही.

महात्मा गांधी हे मनाने व विचाराने पक्के सनातनी होते. त्यांना हिंदुधर्माची सनातनी चौकट आहे तसीच कायम ठेवायची होती. त्यांची रामराज्याची संकल्पना हि महिला (Shurpnakha/शबरी व सीता) व बहुसंख्य भारतीय समाज (शूद्र शंबूक) यावर अन्याय करणारी होती. त्यांची भारतातील गरीब समाजाकडे पाहण्याची वृत्ती हि भूत दयावादाची होती. स्त्रिया संबंधीचे त्यांचे विचार जुनाट होते. तेरा वर्षाच्या कस्तुरबावर ते एखाद्या पिशाच्या सारखे शारीरीक अत्याचार करीत हे दस्तुरखुद्द कस्तुरबा गांधी यांनीच नमूद केले आहे. मुले होऊ नयेत म्हणून लोकांनी स्वच्छेने ब्रम्हचर्य पाळावे असा भंपक विचार ते मांडत असत. स्वातंत्र्यानंतर भारताच्या सामाजिक व आर्थिक क्रांतीसाठी काय करायला पाहिजे यावर गांधीनी गंभीर विचार मांडल्याचे ऐकिवात व वाचनात नाही.

उच्च वर्णीय समाज आपल्या श्रेष्ठत्वाचा वाटा हा तळागाळातून आलेल्या माणसांना देण्यास कधीच तयार नसतो. तळागाळातील माणूस कितीही बुद्धिमान व विद्वान असो त्याच्या कडे बघण्याची उच्च्वार्नियाची दृष्टी नेहमी तुच्छतेची, उपहासाची व भूतदयावादाची राहिलेली आहे. त्यांना ते आपल्या बरोबरीचे स्थान देण्यास कधीही तयार नसतात. गांधीजीला श्रेष्ठत्व प्रदान करण्याबाबतची मनुवाद्यांची मानसिकता हीच आहे.

बाबासाहेब जिवंत असतानाच एका अमेरिकन विद्वानाने म्हटले होते की जगात जे पाच बोटावर मोजन्याइतके ज्ञानवंत व विद्वान आहेत त्यात आंबेडकरांचा समावेश पहिल्यांदा करावा लागेल. जगमान्यता प्राप्त असलेले बाबासाहेब भारतातही सर्वश्रेष्ठ आहेत फक्त उच्चवर्णीय तसे मानायला तयार नाहीत. बाबासाहेब  अधिक वर्ष जगले असते तर त्यांनी या देशाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलवून टाकला असता.

म. गांधीचे मोठेपण कशात आहे?. भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतंत्र झाला ! हे केवळ गांधीजीमुळेच साध्य झाले काय?. .देशात सामाजिक न्यायाची प्रस्थापना म.गान्धीमुळे स्थापित झाली काय?. महिलांची पुरुष वर्चस्ववादी दास्यातून मुक्तता गांधी तत्वज्ञानातून होत आहे काय?. भारताची अर्थनीती गांधी तत्वज्ञानातून पुढे सरकत आहे काय?. याचे उत्तर  तथाकथित माध्यमांनी देशाला दिले पाहिजे. ब्रिटीश संसदेत मजूर पक्षाचे अटिली हे पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला अन्यथा .गांधीजिंच्या मृत्युनंतरही भारत पारतंत्र्यातच असता. इंग्रजाना जेरीस आणण्याचे काम या देशातील क्रांतीकारकांनी केले आहे. केवळ असहकाराने या देशाला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे हा अतुच्च भाबडेपणाचा कळस आहे.

भारतातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण हे ठरविन्यासाठी वरील माध्यमांनी मा. गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व त्यांचे तत्वज्ञान लोकाना उपलब्ध करून द्यावेत. लोकाना दोघांच्याही तत्वज्ञानाची उपयोगीता काय आहे याची तुलना करू द्यावीत व मग जनमताच्या चाचन्याद्वारे या दोघात श्रेष्ठ कोण हे जनतेला ठरवू द्यावे.
असे करण्यासाठी हिस्ट्री, टीव्ही १८ व सीएनएन आयबीएन चॅनलस तयार होतील?. देशाला कळू दया कोण सर्वश्रेष्ठ भारतीय आहे ते!

बापू राऊत
मो.९२२४३४३४६४


No comments:

Post a Comment