Friday, June 28, 2013

देव: काल्पनिक मिथ्यांचा बाजार


भारत हा मंदिराचा देश. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देवांची मंदिरेच मंदिरे उभारलेली आहेत. यातील काही मंदिरे अति गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे रोजचे उत्पन्न हे कोटीच्या घरात असते. देवांना कोटीचे दान देना-याचे हात कधीच तपासून बघितले जात नाही. भ्रष्टाचार, लुटून व फसवणूक करून आणलेली ही कोटीची माया ह्या देवांना खूपच आवडलेली दिसते.  मंदिराच्या उत्पन्नाचा कोणताही हिस्सा हा गरीब व आर्थिक दुर्बलांच्या
सामाजिक व आर्थिक उथ्थांनासाठी नसतो तरीही एवढा अमाप पैसा कुठे जातो?. हे एक आठवे आश्चर्यच आहे. बहुजन समाज आपल्या आयुष्याचा अमुल्यं वेळ मंदिर भेटीसाठी खर्च करीत असतो. प्रत्येक हिंदूने आपल्या आयुष्यात चारधामाच्या यात्रा केल्याच पाहिजे असा
दंडक ब्राम्हणी व्यवस्थेने घालून दिला आहे. भीतीपोटी व पुढच्या आयुष्यात जांगले जीवन मिळावे  यासाठी ते कर्ज काढून चारधाम यात्रा करतात. यमुनोत्री, गंगोत्री, बद्रिनाथ व केदारनाथ ही ती चार धामे. 16-17 जून 2013 ला या चारही धामात अतिवृष्टी झाली. देवाच्या दर्शनाला आलेल्या असंख्य भक्तापैकी जवळपास 20 हजार भक्तांना मृत्यू आला. मुख्य मंदिराची पडझड झाली. मूर्ती वाहून गेल्या तर काही ढीगा-याखाली दबल्या. नदीच्या काठावरील व पात्रातील मंदिर व शिवमूर्ती वाहून गेल्या. सभोवतालची 60 गावे वाहून गेली. 90 धर्मशाळा वाहून गेल्या. मंदिराच्या परिसरात प्रेताचा खच पडला. त्यात तरुण मुले-मुली, छोटी-छोटी बालके व वयस्क स्त्री-पुरुषाचा समावेश आहे.
देव हा सगळ्याचे कल्याण करणारा, जागृत व जीवन प्रदान करणारा, त्याच्या कृपेमुळे पापे व दू:खे नष्ट होतात, तो सर्वाचा रक्षणकर्ता. परंतु या देवाने कोणालाही वाचविले नाही. लोकांचे सरक्षण सोडाच, तो देवच नदीच्या प्रवाहात वाहून गेला. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रेताचा सडा पडला असून प्रेते सडू लागली आहेत. हे सगळे पाहून म्हणावेसे वाटते, देवा तू या जगात नाहीसच, परंतु तुझे भूत या देशातल्या ब्राम्हणी व्यवस्थेने लोकांच्या मानगुटीवर बसवून ठेवले. आणि आम्ही बहुजन मूर्ख, भोळे  व श्रध्दाळू  पटकन ब्राम्हणाच्या बोलण्यावर फसून स्वत:चा घात करून घेतो. या चारधामात एवढा नरसंहार झाला तरी या ब्राम्हनांची जमात रोज टीव्ही वर येवून बहुजन समाजाला उल्लू बनवीत आहेत. गंडदोरे, पुजा-अर्चना, भविष्य व दैवी-चमत्कार यावर दिवसभर अकलेचे तारे  तोडताना दिसतात.
जगात देव नाही हे सर्वसत्य आहे. काल्पनिक कथा लिहून त्याप्रमाणे आजच्या स्थानाच्या रचना करण्यात आल्या. देशात दरवर्षी हजारो लोक तीर्थयात्रेस जातात व  मरतात. तीर्थावरून येताना व जाताना रोड अपघातात चिरडल्या जातात. असे का होते?. देव भक्ताचा रक्षणकर्ता व भक्तांना संपत्तीने समृध्द करणारा अशी त्याची महिमा असूनही भक्तांचे जीवन धोक्यात का येते? याचा श्रध्दाधारक जनतेनी विचार केला पाहिजे. देवावर चर्चा करणे हा टिंगलवाळीचा विषय नाही तर गांभिर्याचा व सत्य वस्तुस्थिती मांडण्याचा वा सांगण्याचा विषय आहे. ज्या  घटना  डोळ्यासमोर घडतात, दिसतात व जाणवतात त्या घटनाचा व  वस्तुस्थितीचा बुध्दी व मनावर जोर देऊन चिंतन व मनन करण्याचा आहे?. आपण विज्ञानाचे फायदे लुटायचे परंतु त्याच विज्ञानाला बाजूला सारत काल्पनिक गोष्टीला कवटाळायचे व त्यावर विश्वास ठेवायचा?. विज्ञानाची दिव्यदृष्टी हीच मानवाच्या आनंदमय जीवनाची गुरुकिल्ली आहे हे गमक सामान्य भारतीयांना कळने महत्वाचे आहे. कारण सामान्य माणूस हाच नेहमी चतुरासमोर नांगी (शरण जाणे) टाकीत असतो.

देव हा काल्पनिक मिथ्यांचा बाजार आहे. देवापासून ज्यांना आर्थिक फायदा होतो, ज्यांना देवसंस्कृतीच्या नावाखाली मान-सन्मान मिळतो समाजात वरचे स्थान मिळते त्यांनी देवाचा बाजार भरविला आहे. प्रत्येक मंदिरात फसवणुकीचे तंत्र असते. मंदिरातील पुजा-यांची गुंडा गँग आलेल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लुबाडत असते. हे सत्य कोणत्याही धर्माचा तीर्थकरू नाकारू शकत नाही. देशातील काहीनी आपल्या देशवाशीयांची भोळी भाबडी नाळ ओळखलेली आहे. मंत्र पुटपुटणा-या व सामान्य जणांना त्याचा अर्थही कळू देना-या भटांचा या देशात  सुळसुळाट झाला आहे. काहींनी धार्मिक पुस्तकांचा महापुर निर्माण केला आहे. भारतीय लोकांना वास्तवा समजण्यापासून वास्तववादी बनण्यापासून धर्मवाद्याचा गट रोखू पहात आहे. प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार असतो परंतु लोकांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे जगले पाहिजे ह्या  अतिरेकी विचारनीचा उदय भारतातल्या फँसिस्टवादी शक्तींनी केला असून त्यांच्याकडून भीवविणारी व मतीगुंग करणारी साहित्यनिर्मिती होत आहे. वैदिक धर्माने प्रसविलेल्या ज्या पोथ्या आख्यायिका आहेत त्यांना कोणताच आधार नाही. अशा आधारहीन तथ्यावर आजचा बहुजन समाज जगतो आहे. भारतीय समाजात लिहण्याचा व वाचण्याचा अधिकार हा केवळ ब्राम्हणांनाच होता त्यामुळे स्वत:चे पोटभरू ब्राम्हणांनी सारे साहित्य लिहले व लोकांच्या मनावर बिंबविले यावर भारतातील कोणताही विद्वान नकारघंटा  देणार नाही. या देशात ब्राम्हणांनी कधीच जाज्वल्य बुध्दिप्रामान्यवाद जोपासला नाही. त्यांनी केवळ भयवाद लोकांना सांगितला. केवळ आणि केवळ आपल्या सोयीचा इतिहास (आख्यायिका, पोथ्या, कादंबरी, ग्रंथ) लिहीत बहुजन समाजासमोर अंधश्रध्देचे गाठोडे वाढून ठेवले. बहुजन समाज ह्याच गाठोड्यातील खाद्यावर आपल्या जीवनाची दिनचर्या पार पाडत असतो.
केदारनाथ मध्ये आलेल्या प्रलयात डोंगरावरून खाली आलेला दगड मंदिराच्या दरवाजावर अडकला त्यामुळे मंदिर हे क्षतिग्रस्त झाले नाही परंतु हेमंत कुलकर्णी सारखे पत्रकार (लोकमत दीनांक.23.06.2013) त्या प्रलयातही मंदिर  स्थिर राहत असेल तर तो दैवी चमत्कार नव्हे तर काय?. असे म्हणतात तेव्हा त्यांच्या बुध्दिकौश्यल्याचे चातुर्य लक्षात घेण्याजोगे आहे. हा सगळा खटोटोप कशासाठी?. लोकांचा देवावरचा विश्वास शाबूत राहावा यासाठी जाणून बुजून पेरलेले ते वाक्य आहे. देवावरचा लोकांचा विश्वास उडाला तर माझ्या स्वजातीयांचे काय?. ही केवळ हेमंत कुलकर्णीची नीती नाही तर अशा अनेक तत्सम पत्रकार व मीडियाकारांची स्वजातीबद्दलची तळमळ आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. उत्तराखंडमध्ये 20 हजार लोक ठार झालेत यालाही हेमंत कुलकर्णी सारखे लोक दैवी चमत्कार म्हणतील काय?. मेले ते सर्व पापी होते व वाचले ते पुण्यवान असा डांगोरा पिटण्यास हे लोक काही कमी करणार नाहीत. गंगा नदीच्या प्रलयात नदीच्या मध्ये असलेली शिवाची मूर्ती पूर्णता वाहून गेली, नदीच्या काठावरचे मंदिर पूर्णता वाहून गेले यालाही दैवी चमत्कारच म्हणावयाचा काय?. असे असेल तर देवाचे निश्चित गुणधर्म तरी कोणते? हे तथाकथित देव व धर्माच्या ठेकेदारांनी स्पष्ट केले पाहिजे.  

ईश्वर व धर्म या दोन शब्दाविरोधात गरीब श्रीमंत, अशिक्षित, शिक्षित  सारेचे बोलण्यास घाबरत असतात. जर ईश्वरा विरोधात बोललो तर माझ्यावर व कुटुंबावर कोणते संकट तर येणार नाही ना?. या भीतीनेच त्याच्या मनाची चाळण होत असते. देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत काहींनी देवाला नाकारले. त्यांचे देवाने काहीही बिघडविले नाही. उलट ते जगमान्य व्यक्ती म्हणून प्रसिध्द पावले आहेत उलट वैदिक प्रतिकाना जगात कोणतेही स्थान नाही. चार्वाक, बुध्द, कबीर, अँरिस्टाटल, गँलिलिओ, साक्रेटिस व कार्पोनिक्स यांनी देवाला कधीच स्थान दिले नाही. एक तत्ववेत्ते म्हणतात अध्यात्म हे केवळ तरकाचे तारे तोडणारे शास्त्र असून ते अनुभवजन्य ज्ञानाविरुध्द जाते. ते केवळ कल्पनावर आधारित असून बुध्दीला गुलाम बनविते. शास्त्राच्या पातळीवर येण्याचे भाग्य अजून त्याला लाभले नाही आणि विशेष गोष्ट म्हणजे आजही ते केवळ कल्पनांच्या अंधारात चाचपडत आहेत. भारतात याच काल्पनिक संकल्पनांनी वेढा घातला असून बुध्दिवाद व यथार्तवाया वस्तुनिष्ठ विचाराचा कोंडवाडा झाला आहे.


बापू राऊत
9224343464





2 comments:

  1. 1)KHANIJA TELACHE SATHE SAMPALYAWAR WINYAN KOTHE

    ASEL YAWAR PAN EKADA WICHAR KARA. AJUN FUKAT 25

    WARSHE NANTAR ?

    2)WYAKTI WAIT KIWA CHANGALI ASU SHAKATE ,PURNA JAT

    WAIT ASU SHAKTE KA?MAG RSS WALE SURWA MUSLMAN

    WAIT MHANTAT TE CHUK KA?HE AMBEDKAR WADAT BASATE

    KA?

    3)AJ BAHUSANKHYA MARATHA NETE/SAKHAR -SAMRAT

    BAHUJANANA( CHALAT AHET. MARATHA SAMAJ B.C/OBC

    YANCHYAWAR PRACHAND ATTYACHAR KARAT AHE.

    MHANUN SARNJAMI WRITTICHA HA SAMAJ PURNA WAIT

    MHANAYACHA KA?

    (EK OBC TARUN)

    ReplyDelete
  2. amhala mukhyamantri/up-mukhyamantri/gruh-mantri

    surwa surwa marathach lagtat.te chalte!pun ekhadya

    bramhanache ek sadhe widhan mhanje jatiywad

    wa !wa!

    kadhitari ase watate ki obc/bc samaj ata jagrut

    hou lagla ahe ,mhanun marathe-shahi

    tikawanyasathi muddam brahman dwesh pasrawala

    jat ahe. krupaya wachakani M.D.RAMTECHE yanchya

    blog waril marathe-shahi baddal lekh wachawet

    mhanaje maratha raj-karnyanche kutil daw-pech

    lakshat yetil.

    ReplyDelete