Saturday, July 27, 2013

वारकरी संप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंचुप्रवेश

दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला वारकरी संप्रदायाचे लोक जात असतात. या वारकरी संप्रदायात  बहुजन समाजाच्या लोकांचा अधिक भरणा आहे. गरीब बहुजन समाज अनवाणी पायाने व जुनाट मळकट कपड्याने वारीच्या पाठीमागे चालत असतो. तो वारीत बेफामपणे नाचत असतो. त्यांच्या अंगात अध्यात्माचे भूत संचारलेले असते. वारीत नाचणारा हा वारकरी अडाणी, निष्पाप, भाबडा व अर्धशिक्षित असतो. सनातनवाद्याचा सांस्कृतिक कावा समजण्याची अक्कलदाढ वारक-यात जाणूनबुजून निर्माण होवू देण्यात आली नाही. बहुजन वारकरी  दारिद्र्याने पिचलेला, गरिबीने

Friday, July 26, 2013

वारीतील सनातनी वाटमारे

पांडुरंगाच्या प्रती असलेल्या अपार उत्साहाची उधळण करत विविध रिंगणं, परिक्रमा आटोपून देशभरातल्या दिंड्या, पालख्या येत्या १९ तारखेला पंढरपुरात विसावतील. महिना-दीड महिन्याचा पायी प्रवास करणारी पावलं परतीच्या प्रवासाला लागतील. यावर्षी पंढरीच्या दिशेने जाणार्या पावलांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, दिवसेंदिवस वाढत जाणार्या या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे.
शंका असल्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे, बोगस वारकरी. आता तुम्ही म्हणाल! बोगस वारकरी हा काय प्रकार आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर घडतोय. बहुजन देव, यात्रा, उत्सव यांना प्रथम नाकारायचे, बदनामी करायची तरीही

Wednesday, July 17, 2013

रामासामी पेरियार:दक्षिणेतील महात्मा फुले

 देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे  अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात ( विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत  होवू न देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.

Monday, July 15, 2013

कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने

अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा या महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.

Sunday, July 7, 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला



जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे हे सुध्दा अनाकलणीय आहे.  तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे जातीयवाद्यांनी आखले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर. एस. एस. च्या पिलावळीने आखलेल्या योजनेचा हा एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध घ्यावा.