Monday, July 15, 2013

कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने

अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा या महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.

धर्मवाद्याकडून या देशातील भोळा व भाबडा तसेच अविकसित बुद्धीचा माणूस हजारो वर्षापासून पिळला जात आहे. ज्या वारक-यांचे गा-हाने सरकार ऐकत आहे ते मलाईदार वारकरी आहेत. वारक-यांच्या नावे जमा होणा-या पैशावर डल्ला मारणारे हे मलाईदार वारकरी नेते आपली वारक-यांच्या माध्यमातून होणारी कमाई कधीही सोडणार नाहीत. पंढरीला  जाणा-या वारक-यावर नजर टाकली असता आपल्याला काय दिसते?. भाबडे वारकरी, गरीबिने पिचलेले, पायात चपला नसणारे, अशिक्षितपना त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसतो, आर्थिक कुचबणेमुळे त्यांच्या चेह-यावर खड्डे पडलेले व पोट आत गेलेले.
वारक-यांना रस्त्यात जेवण व पाणी पुरविणे हे पुण्य नव्हे तर त्यांना सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मजबूत करून त्यांच्यात स्वत:च्या बुद्धीने विचार करण्याची क्षमता निर्माण करने हे खरे पुण्य होय. वारक-याच्या नावे अन्यायी व सोयीची व्यवस्था कायम ठेवू पाहना-या धर्मवाद्याच्या षडयंत्राला चाप देवू शकणारे सरकार महाराष्टाच्या भूमीवर येणार नाही हेही तेवढे सत्य आहे. सत्तेमध्ये असणारे राजकीय नेतेचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतात.
तसे बघितल्यास अंधश्रद्धा विरोधी बिल हे अर्धवटच आहे. कारण त्यात टीव्ही वर दाखविण्यात येणारे ज्योतिष्यशास्त्र व धार्मिक चानेल वरील बुवाबाजीचा अंतर्भाव नसून भट-भटजींना मोकळे सोडण्यात आले आहे. परिणामी पावसाळी अधिवेशनात बहुप्रतीक्षित जादूटोणाविरोधी विधेयक बारगळणार असल्याची शक्‍यता अधिक आहे. एकूणच तथाकथित सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे आपले घुटने टेकले आहे असेच दिसते

2 comments:

  1. Dear sir-

    1)Andhasradhe mule Bahujanan-che nukasan hot asel

    tya-pesha kititari nukasan aj,sakhar-samrat,

    shishan-samrat,Sar-panch,Patil lok.karat ahet

    adhi asha lokana turun-gat ghalnyacha jalim

    kayda karawa.
    2)Shetakryan sarkhe zukate map dile jate

    ( karjamafi wagaire) pun tycha fayada,fukt

    kahi Saran-jami shetkryana hoto.Bhumihin,

    Shet-majur yanchi kalaji hi Sarnjami sarakare

    karat nahit.
    3)Ya surawa goshtim-mule samjache 99%,nuksan

    hote ,Te band karun mug andha-shradha kinwa

    bhatjni-mule honyarya tatha-kathit nuksanakade

    pahata yeil.

    (Anil Redij-Mahalung)

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला दोन्ही बाबीकडे लक्ष केन्द्रित करावे लागेल. सरंजामशाही, शिक्षण सम्राट व साखर सम्राट जसे बहुजन समाजाच्या कल्याणास घातक आहेत त्याच प्रकारे धर्मवादी/सनातनवादी बहुजनांच्या कल्याणास मारक आहेत. त्यामुळे या दोन्ही द्रुष्ट प्रवृत्तींना नष्ट करावयाचे असल्यास एकाच कालावधीत समान चळवळी चालवाव्या लागतील. फक्त बहुजन समाजाने जागरूक राहून बहुजन समाजाच्या सक्षमीपणास विरोध करना-या ज्या ज्या धर्मवादी व सरंजामशाहीवादी संघटना आहेत त्या त्या संघटंनेविरोधात लढना-या संघटनांना सहकार्य करणे व सहभागी होणे आवश्यक आहे.

      Delete