Saturday, July 27, 2013

वारकरी संप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंचुप्रवेश

दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला वारकरी संप्रदायाचे लोक जात असतात. या वारकरी संप्रदायात  बहुजन समाजाच्या लोकांचा अधिक भरणा आहे. गरीब बहुजन समाज अनवाणी पायाने व जुनाट मळकट कपड्याने वारीच्या पाठीमागे चालत असतो. तो वारीत बेफामपणे नाचत असतो. त्यांच्या अंगात अध्यात्माचे भूत संचारलेले असते. वारीत नाचणारा हा वारकरी अडाणी, निष्पाप, भाबडा व अर्धशिक्षित असतो. सनातनवाद्याचा सांस्कृतिक कावा समजण्याची अक्कलदाढ वारक-यात जाणूनबुजून निर्माण होवू देण्यात आली नाही. बहुजन वारकरी  दारिद्र्याने पिचलेला, गरिबीने
खचलेला व धर्माने रंजलेला व गांजलेला असतो. वारकरी समाजात शिक्षण नसल्यासारखे आहे. त्याच्या घरात अठराविश्वे दारीद्र पाचवीला पुजलेलेच असते. भजनाच्या आहारी जावून आपल्या पिढयानाही तो भजनाच्या मार्गात ढकलत असतो. विचार करण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे दुस-यांनी सांगितले तेच खरे असे मानणारा हा वारकरी समाज टाळ वाजविन्यातच धन्यता मानीत असतो. त्यांच्या दृष्टीने दिवसरात्र अखंडनामाचा गजर म्हणजे भक्ती व अध्यात्म असते.

मात्र पंढरीची हीच वारी काही लोकासाठी धंद्याची केंद्रे झाली आहेत. शिकलेले व बोलण्यात सराईत असणारे लोक ह.भ.प. ही पदवी लावून गावोगावी कीर्तन करीत फिरत असतात. त्यातून त्याची चांगलीच कमाई होत असते. नव्हे ते त्यांचे पोट भरण्याचे साधन बनलेले असते. समाज जेवढा अध्यात्मिक व धार्मिक होईल तेवढे त्यांच्यासाठी चांगलेच असते. संताचा खरा विद्रोह ते लोकांना सांगत नाहीत. भक्तिमार्ग सांगून ते लोकांना भक्तीवेडे बनवीत असतात. समाजाच्या वाढत असलेल्या भक्तीवर वर अनेक ब्राम्हणी कलाकारांचे जीवन अवलंबून असते.

आता वारकरी संप्रदायात सनातन संस्था, विश्वहिंदू परिषद इत्यादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिलावळीने शिरकाव केला आहे. वारकरी समाज ही मोठी ताकद आहे हे आता संघाच्या लक्षात आले आहे. संघाने आपल्या विचाराचे ह.भ.प. कीर्तनकार तयार करून वारक-यात सोडले आहेत. आता याच संघीय वारक-यांनी सरकारच्या अंधश्रद्धा विरोधी बिलावर हल्लाबोल करने सुरु केले आहे. संघ व हिंदुत्ववाद्यांना आता वारक-याचे व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठावरून संघ आपला राजकीय व धार्मिक एजंडा राबविण्यास सुरुवात केली आहे.  अंधश्रद्धा विरोधी विधेयक पास झाले तर तुमच्या भजन कीर्तनावरही बंदी येईल असे सांगून वारक-यांना भडकविण्यात येत आहे.  वर्षानुवर्षे देशात अमानवीय व अघोरी प्रथा चालू आहेत. या प्रथातून बहुजन समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अमानवीय अघोरी प्रथा नष्ट करने ही काळाची गरज आहे. परंतु हिंदुत्ववाद्यांना या देशातील अंधश्रद्धा नष्ट होवू नये असे वाटते कारण तीच त्यांची बलस्थाने आहेत. अंधश्रद्धा नष्ट होणे म्हणजे हिंदुत्ववाद्याच्या बैलबंडीची चाके काढून घेण्यासारखे आहे. अंधश्रद्धा नष्ट होणे हे संघाच्या हिंदुत्ववादाला हे कधीही पेलवणारे नाही.

संघाला या देशात सांस्कृतिक साम्राज्यवाद निर्माण करावयाचा आहे. बंडखोर वारक-यांची धार बोथट करण्याची कला संघाकडे आहे. साहित्याचे वेगवेगळे व्यासपीठे तयार करून त्यांचे अध्यक्षपद बंडखोरांना देण्यात येते. बंडखोरी करू पाहणं-यांना प्रसिध्दी, पुरस्कार व फेलोशिपच्या जाळ्यात ओढून त्यांच्या विचाराची धार मोल्ड करण्यात येते. प्रिंट व टीव्ही मीडियावर संघाचा कब्जा असून धार्मिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण २४ तास टीव्हीवर चालू ठेवण्याची तजवीज करण्यात येते. त्यामुळे टीव्हीवर झळकण्यासाठी नाहीरे गटही ब्राम्हणी सांस्कृतीकरनाच्या प्रक्रियेत सामील होतो. त्यामुळे सांस्कृतिक साम्राज्यादाच्या प्रतिकारासाठी व ब्राम्हणवादाच्या पाडावासाठी आज तरी कोणताही पर्याय समोर दिसत नाही.

भारतातील मध्यमवर्ग हा संघाची शिकार बनत चालला आहे. आजचा आधुनिकतावाद हा शोषितांच्या क्रांतीला विन्मुख करणारा प्रेषित झाला आहे. शोषित समाजातील मध्यमवर्ग हा या आधुनिकतावादाचा प्रवक्ता झालेला आहे. शोषितांतील हाच मध्यमवर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढचे टारगेट आहे. आज संघात कोणालाही कवेत घेण्याची क्षमता त्याच्यात निर्माण झाली आहे. संघपरिवाराचा आक्रमक ब्राम्हणी सांस्कृतिक राष्ट्रवाद जनतेवर लादण्यात येत आहे. सांस्कृतीकरनाच्या पडद्याआडून राजकीय सत्ता हातात घेणे हाच संघाचा मुख्य एजंडा आहे. त्यामुळेच संघीय लोक बेमुर्वतपणे भारतीय राष्ट्रवादाला महत्व न देता हिंदू राष्ट्रवादाच्या पिटा-याचा जयघोष करीत असतात. या देशात जैन, बौद्ध, मुस्लीम व ख्रिश्चन राहतात हे ते विसरतात. संघाच्या व्याख्येनुसार भारतात जैन राष्ट्रवाद, बौद्ध राष्ट्रवाद, मुस्लीम राष्ट्रवाद व ख्रिश्चन राष्ट्रवाद याचे अस्तित्व आहे हे मान्य करने भाग पडते.

तुकारामाचे वंशज सदानंद मोरे सनातनांच्या कारस्थानाबाबत म्हणतात, “हिंदुत्ववादी वारक-यांना जवळ करतात, त्यांची कार्यपध्दतीच ती आहे. आपला सत्कार कुणालाही आवडनारा नसतो?. सनातन व विश्व हिंदू वाले वारक-यांचा सत्कार घडवून आणतात. त्यामुळे साहजिकच वारक-यांना ते आपलेसे वाटतात. याउलट अंधश्रद्धावादी / समाजवादी हे वारक-याच्या कधीच जवळ जावून त्यांचे प्रबोधन करीत नाहीत, त्यामुळे ते वारक-यांना आपल्या जवळचे वाटत नाही. यात मी वारक-यांना दोष देणार नाही, कारण ते फारसे शिकलेले नसतात. नवीन संकल्पना व नव्या बाबी याची त्यांना कल्पना व माहिती नसते. त्यामुळे त्यांना सांगण्याचे कार्य बुद्धीवाद्यांनी पार पाडले पाहिजे असे ते म्हणतात. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य केले. त्यामुळे तुकारामाला मानणारा वारकरी विधेयकाला विरोध कसा करणार”?. याउलट अभय टिळकासारखे ह.भ.प. वारक-यांना अधिकच्या धार्मिकतेकडे घेवून जात असतात. ते तुकाराम व नामदेवाचे खरे अभंग वारक-यांना न सांगता ज्ञानदेव, एकनाथ व भागवत धर्माचे महत्व अधिक सांगण्यात रस घेत असतात. गर्भश्रीमंत व्यापारी व राजकारणाच्या पैशाच्या माध्यमातून मोठमोठी उत्सव व संतसंमेलन घेण्याचा सपाटा नकली ह.भ.प. नी सुरु केला आहे.

वारकरी संप्रदायावर मुख्यत: संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या विचाराचा पगडा आहे. वारकरी संप्रदायाची नाळ ही नाथपंथीयासी जुळलेली आहे. नाथपंथ हीच वारकरी संप्रदायाची गंगोत्री आहे. संत ज्ञानेश्वर हे नांथपंथीय होते. ते आपली गुरु परंपरा आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरखनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर अशी सांगतात. महाराष्ट्रातील संतपरंपरेप्रमाने ज्ञानेश्वराचे आजे गोविंदपंत यांना गहिनिनाथाचा अनुग्रह तर पणजे त्रिबंकपंत यांना गोरक्षनाथाचा अनुग्रह प्राप्त झाला होता. गोरक्षनाथ हे पूर्वी बौद्ध भिक्षू होते. काही काळानंतर त्यांनी नाथ संप्रदायाचा स्वीकार केला. त्यामुळे संतचळवळीला नाथ संप्रदायाचा वारसा आहे व नाथ संप्रदायाला बुद्धाचा वारसा प्राप्त झाला होता. त्रीपिटीक साहित्यात नाथ शब्द उपलब्ध होतो. विशेष म्हणजे नाथपंथ आणि निर्गुंणपंथाचे जे स्वानुभववेद्य ज्ञान आहे त्याचा उपदेश करताना बुध्दाला दाखविले आहे. सम्राट अशोकाने ८४ हजार विहारे बांधली होती. त्यापैकी केवळ बोधगयेचे महाविहार शिल्लक राहते हे कसे शक्य आहे?. पंढरपूरचे मंदिर, जगन्नाथाचे मंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ, पद्मनाभन मंदिर व दक्षिणेतील तसेच उत्तरेतील इतर मंदिराच्या प्रतिकृती ह्या बोधगयेच्या महाविहारासारख्या आहेत. त्यामुळे ही सर्व मंदिरे पूर्वीची महाविहारे होत. पंढरीचा विठ्ठल हा बुद्धच होय. संतांनी तर त्यांचे आराध्य दैवत विठ्ठल यालाच बुध्द मानले आहे. आज ज्याप्रकारे वारकरी संप्रदायावर संघपरिवार, सनातन संस्था व विश्व हिंदू परिषदेने कब्जा केला तसाच कब्जा बौद्ध महाविरे व बुद्ध मूर्तीवर शैव व वैष्णवानी केला व बुद्धाच्या मुर्त्यांना आपल्या पद्धतीने आकार देवून वेगवेगळया देवांची नावे देण्यात आली.

आज समाजाला प्रबोधनाची गरज आहे. ज्यांना समाजाचे प्रबोधन व्हावे व करावेसे वाटते त्यांच्याकडे पैसे नसतात. प्रबोधन करायचे म्हटले म्हणजे कोणताही मालदार व्यापारी वा पुढारी पैसे देत नाही. शिकलेला मध्यमवर्ग ही प्रबोधनासाठी पैसे देण्यासाठी का-कु करीत असतो अशा परिस्थितीमध्ये वर्गणी काढून प्रबोधन करायचे म्हटले तर पुरोगामी प्रबोधनकार पैशाची अधिक मागणी करतात तसेच समारंभ सभागृहाची वाढती किंमत अशा कैचीत प्रबोधनाची गोची झालेली आहे. याउलट प्रतीगाम्याचे आहे. त्यांना सगळ्या गोष्टी सहज मिळत असतात. पुरोगामी चळवळीच्या ह्या मर्यादा संघाने ओळखल्या आहेत. संघ त्यानुसारच आपल्या व्ह्युनितीची आखणी करून वारकरी संप्रदायात प्रवेश करता झाला आहे.


बापू राऊत

९२२४३४३४६४

4 comments:

  1. AMERIKET SUDDHA HINDU MAHINA AMERICAN SARKAR NE J

    JAHIR KELA AHE?AMERICAN SARKAR PUN JATIY MANAYCHE

    KA?

    ReplyDelete
  2. babri mashid pan bouddh stup hota.
    tajmahal pan bouddha stup aahe.
    ram va krushna he buddhache avatar hote.
    suvarnmandir pan buddha stup aahe
    ya deshatale sarva muslim sikh hidu he purvi bouddhach hote.

    buddham sharanam gacchami..........

    ReplyDelete