Wednesday, September 6, 2017

मराठा आंदोलनाचे “पानिपत”

कोपर्डी प्रकरणातून मराठा आंदोलनाचा जन्म झाला. असा साधारण समज परंतु एकूणच स्थिती बघितली तर त्यात काहीही तथ्यांश दिसत नाही. तरीही कोपर्डी हे आंदोलनाचे तात्कालिक कारण आहे. कोणत्याही जाती जमातीची महिला असो. तिच्यावर अन्याय झाल्यास जो अपराधी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे कोणताही सुज्ञ माणूस म्हणू शकेल. महिलावरील अत्याचाराला जातीच्या चष्म्यातून बघणे हाच एक मोठा जातीयवाद आहे. भारतीय मानसिकतेमध्ये असा जातीयवाद ठासून भरलेला आहे. “एक मराठा लाख मराठा” या शब्दांशामध्ये जाती अभिमानाचा फार मोठा दर्प दडलेला आहे. तो या मराठा मोर्च्याच्या दृश्याने उघड झाला.

तरीही विचाराचा वारसा चालविनारच.............

पत्रकार तथा लेखक गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. मन स्तब्ध व अस्वस्थ झाले. भारतात एका नव्या “नरसंहारक” संस्कृतीचा विकास झाला. या नरकासुराना कसे रोखायचे? कोण रोखणार? आता तर बोलण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्यच पूर्णत: हिरावून घेतल्या गेले आहे. आमच्या विरोधात बोलाल वा लिहाल, तर खबरदार. तुमचाही आम्ही लंकेश करू. असा हा सरळ धमकीवजा इशारा आहे.