पत्रकार तथा लेखक गौरी
लंकेश यांची हत्या करण्यात आली. मन स्तब्ध व अस्वस्थ झाले. भारतात एका नव्या “नरसंहारक”
संस्कृतीचा विकास झाला. या नरकासुराना कसे रोखायचे?
कोण रोखणार? आता तर बोलण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्यच पूर्णत: हिरावून घेतल्या
गेले आहे. आमच्या विरोधात बोलाल वा लिहाल, तर खबरदार. तुमचाही आम्ही लंकेश करू. असा
हा सरळ धमकीवजा इशारा आहे.
ज्या बीजातून या नरसंहारकांचा उदय होत आहे त्या बीजांची नांगी ठेचायला एखादा क्रांतिकारक कधी जन्म घेईल?. समोर फार कठीण काळ येवू घातलेला आहे. हतबलता, भीती, मरणाची सांशकता क्षणोक्षणी स्पष्ट जाणवू लागली आहे. यापुढे कसे व्यक्त व्हावे? हा गहन प्रश्न असला तरीही आम्ही बुद्ध, चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम व ज्योतिबाच्या विचाराचा वारसा चालविनारच.............
No comments:
Post a Comment