Monday, February 17, 2020

शिवरायांचा आठवावा प्रताप


आज  देश कधी नव्हे एवढा धोक्याच्या वळणावर उभा आहे. देशाला अनेक समस्यांनी ग्रासले असून एक नागरिक दुसर्‍या नागरिकाकडे संशयित भावनेतून बघायला लागला आहे. रोजचे मोर्चे व आंदोलनानी रस्ते आणि चौक गजबजलेले दिसताहेत. मागण्यांचे फलक हातामध्ये धरून मार्च निघताहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात जिला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव प्राप्त झाला आहे. त्या देशात  धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढाव्यात हे देशास हीन करणार्‍या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्म व जुने इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचे कारस्थान रचनार्‍यानी एकदा तरी शिवरायाच्या राज्यरचनेचा व जनतेचा सांभाळ करण्याच्या वृत्तीचा अभ्यास करायला पाहिजे.

Sunday, February 16, 2020

राजनीति का नया अखाड़ा: बजरंगबली बनाम जय श्रीराम


राजनीति एक बड़ा अजीब खेल है। राजनीति में कब क्या होगा, इसका किसे कोई पता नहीं होता। कब  करीबी दोस्त विरोधी बन जाएगा और कब कट्टर विरोधी दोस्त बनेगा इसपर कुछ भरोसा नहीं किया जा सकता। देश में ऐसे कई उदाहरण हैं। राजनीति में कब करीबी रिश्तेदार दुश्मन बनकर चुनावी मैदान में प्रतिस्पर्धी बनेगा इसकी भविष्यवाणी करना मुश्किल है। सत्ता की लालसा ने मानवीय नैतिकता को कमज़ोर कर दिया है। सत्ता, स्वार्थ और धन राजनेताओं के जीवन का हिस्सा बन गए हैं। उन्होने सिद्धांत, मानवता, भाईचारे और विविधता में एकता को अवसरवाद, घृणा, सामाजिक विभाजन और हत्या जैसे अवसरों में बदल दिया।

Friday, February 14, 2020

राजकारणातील नवे प्यादे : बजरंगबली विरुध्द जय श्रीराम


राजकारण हा मोठा विचित्र खेळ आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. जवळचे मित्र कधी विरोधक बनतील तर कट्टर विरोधक कधी मित्र याचा काही भरोसा नसतो. असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात व देशातही बघायला मिळतात. मित्राचे असू द्या पण जवळचे नातेवाईकही कधी विरोधात जातील आणि निवडणूक मैदानाच्या आखाड्यात एकमेकाचे प्रतिस्पर्धी बनतील याचे भविष्य सांगणेही कठीण झाले आहे. सत्तेची लालसा हि माणसाच्या  नैतिकतेला निष्प्रभ करून टाकीत असते. सत्ता, स्वार्थ व संपत्ती हि राजकारण्यांच्या जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळे तत्व, मानवता, बंधुभाव आणि विविधतेतील एकतेला सुरुंग लागून त्याची जागा संधीसाधुत्व, द्वेष, सामाजिक फुट व हत्या या प्रकारांनी घेतली आहे.