Sunday, February 14, 2021

गटातटांचे चौकीदार आणि बैल सिहाची गोष्ट

सहाव्या शतकातील ही गोष्ट आहे.जी  आजच्या परिस्थितीवर लागू होते. ही गोष्ट आहे  चार बैल  व एका सिहाची. एका शेतामध्ये चार बैल एकत्र चारा खायचे. शेतामध्ये आलेल्या एका सिहाचा त्यांनी मुकाबला करून पळवून लावले. जेव्हा सिंह एका बैलाजवळ जायचा तेव्हा त्याच्या विशिष्ट खुनेणे इतर तीन बैल जवळ येवून आपल्या शिंगांनी पळवून लावीत. त्यांच्या एकसंघ राहण्यामुळे सिहाला शिकारच करता येत नव्हती. परंतु काही कारणामुळे त्यांच्यात फुट पडली. आपसातच तुला पाहून घेईन या वृत्तीने व एकमेकांचा संपर्क सोडून  ते चार बैल शेताच्या चार कार्नरवर जावून चारा खावू लागले. सिहाला तेच हवे होते. मग त्याने एकेक करीत चारही बैलांना खावून टाकले. ही कथा बहुजनांना बरेच काही सांगू इच्छिते. परंतु "बहुजन है की वह मानता ही नही, क्योकी वह ठहरे है आज के बैल.   बहुजनांच्या समस्या व त्यांच्या आर्थिक  स्थितीवर नजर टाकली तर दिसणारे दृश्य भयावह असल्याचे दिसते. त्यांच्या विविध समस्यावर मुकेपणाचे सावट पसरलेले आहेत. सामाजिक समस्या हा चर्चेचा विषय न होता त्यावर न बोललेच बरे! अशी सर्वांगीण मानसिक स्थिति झाली आहे.